एक्स्प्लोर

Maharashtra Rain Updates: मुंबईला ऑरेंज, तर ठाणे, नाशिकला रेड अलर्ट; राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला आहे, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची हवामान विभागाची माहिती.

Maharashtra Mumbai Rain Updates: दोन दिवस पावसानं मुंबईला (Mumbai Rain) झोडपल्यानंतर आज मात्र, उसंत घेतली आहे. मुंबईच्या अनेक भागांत पावसानं विश्रांती घेतली आहे. तर, काही भागांत हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज मुंबईला ऑरेंज अलर्ट (Orange Alert For Mumbai) देण्यात आला आहे. तसेच, नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या 48 तास एमएमआरसाठी रेड अलर्ट होता आणि तसाच मुसळधार पाऊसही पडला. मात्र सहानंतर हा अलर्ट कमी करत ऑरेंज केला आहे. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसानं हजेरी लावली. आज मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुपारपर्यंत मुंबईतील अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडसाठी आज देखील रेड अलर्ट कायम असून अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याशिवाय नाशिक, सातारा आणि पुण्यातील घाट माथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाल्यानं पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर विदर्भात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबईला ऑरेंज अलर्ट 

मुंबईसाठी आज देखील ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकल्यानं पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. मोठा पाऊस होणार नसला तरीसुद्धा खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पावसामुळे वसई विरार जलमय, 12 तासांपासून लाईट नाही 

वसई, विरार, नालासोपारामधील काही भाग 12 तासांपासून पाण्याखाली आहे.  तिथल विद्युत सप्लाय बंद असल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत.  कालच्या पावसामुळे वसई विरार जलमय झालं होतं. अनेक सखल भागातील सोसायट्यांमध्ये पाणी जमा झाल्याने सोसायटीच्या मीटर बॉक्सपर्यंत पाणी गेले होते. त्यामुळे महावितरणाने खबरदारी घेत वीज सप्लाय बंद केला होता. ज्या सोसायटीचे पाणी उतरले तेथील ट्रान्सफार्म सुरु करण्यात आले. मात्र अजही वसई विरार आणि नालासोपारातील काही भागातील पाणी ओसरलं नसल्याने वीज नाही आहे. जवळपास 12 तासांपासून काही ठिकाणी वीज नाही आहे. 

नाशिकला रेड अलर्ट, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोदाकाठावरील मंदिरना पाण्यानं वेढा द्यायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं आहे  नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याबरोबरच पानवेली देखील रामकुंड परिसरात वाहून आले आहेत. संपूर्ण रामकुंड परिसर पानवेलींनी व्यापला आहे.  सध्या गंगापूर धरणांतून  2557 क्युसेक  वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे. टप्प्याटप्प्यानं या विसर्गात वाढ केली जाणार असल्यानं नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे.

साताऱ्यात मुसळधार 

साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरी

पालघरमध्ये आजही अधून मधून पाऊस सुरू असून जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची पाणी पातळी 118.60 मीटर पर्यंत पोचली असून हे धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातून मिळून 8475 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सध्या सूर्या नदीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा 

मुंबईसह कोकणात कोसळणाऱ्या पावसामुळे कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकणात येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई मडगाव अप डाऊन  जनशताब्दी एक्सप्रेस दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई ते मडगांव वंदे भारत एक्सप्रेस अप डाऊन दोन्ही रद्द करण्यात आल्या आहेत. पण, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसणार आहे. मुंबईतून गणेश चतुर्थी निमित्त येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत.

पाहा व्हिडीओ : Monsoon Superfast: राज्यात पावसाचा हाहाकार, नद्या ओव्हरफ्लो, अनेक ठिकाणी पूर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Rain Updates: मुंबईवरील अतिवृष्टीचं संकट कधी दूर होणार? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची अपडेट, कमी दाबाचा पट्टा सरकायला सुरुवात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात
CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget