एक्स्प्लोर

ढ पोरं अधिकारी झालेत, MPSC घोटाळ्यावरुन अजित पवारांचा हल्ला

एमपीएससी परीक्षा घोटाळ्याच्या बातमीनंतर, विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला.

मुंबई: एबीपी माझाने दाखवलेल्या एमपीएससी परीक्षा घोटाळ्याच्या बातमीनंतर, विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला. घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेट सरकारला माहित आहे. हे सगळं रॅकेट उद्ध्वस्त करायला हवं. सरकारने तातडीने कारवाई केली पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले. 200 पेक्षा जास्त डमी उमेदवार आहेत, तर  एक हजार पेक्षा जास्त मुलं बोगसरित्या शासकीय सेवेत भरती झाली आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. अजित पवार : मुलं मरमर अभ्यास करतात, ढ पोरं दुसऱ्यांना परीक्षेला बसवतायत आणि पास होत आहेत. राज्याच्या प्रशासनात हे बोगस लोकं कामाला लागलेत. त्यांना कमी केलं पाहिजे. बोगस परीक्षार्थींमुळे बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वासच उडेल. त्यातून ते नाउमेद होतील आणि असंतोष निर्माण होईल. बोगस लोक क्लासवन अधिकारी झाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. पात्रता नाही, लायकी नाही ते शासकीय सेवेत लागले आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रकरण गंभीर आहे. बऱ्याच कालावधीपासून हा घोटाळा सुरु आहे. एवढा मोठा घोटाळा आहे, पण सरकार त्याची दखल घेत नाही.  जिल्ह्या-जिल्ह्यात विद्यार्थी मोर्चे काढत आहेत. या विषयावर चर्चा झालीच पाहिजे, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. काय आहे प्रकरण? महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या 15 सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये 400 जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी 40 जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे. 40 जणांपैकी 15 जणांना काल राज्याच्या विविध भागातून अटक करण्यात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा गेली आठ वर्षे महाराष्ट्रात सुरु आहे. एमपीएससीच्या परिक्षेत 1 हजारहून अधिक उमेदवारांनी डमी उमेदवार बसवून, नोकरी मिळवल्याचं उघड होवू लागलं आहे. उमेदवार पुरवणारी टोळी प्रत्येक डमी उमेदवारीसाठी 20 लाख घेत होती. सध्या सेवेत असेलेले अधिकारी परिक्षा देत होते. परिक्षार्थी मुली, महिलांचं लैगिंक शोषण सुरु होतं, ज्या तरुणाने हा घोटाळा उघडकीस आणलाय, त्याच्यावर दोन वेळेस जीवघेणे हल्ले झाले आहेत. संबंधित बातम्या बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणारे 15 अधिकारी अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Embed widget