एक्स्प्लोर

आधी प्रवेशावरुन गोंधळ, मग विधेयकावरुन विरोधकांचा सभात्याग; विधीमंडळ अधिवेशनाची वादळी सुरुवात

विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु झालं असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

मुंबई : आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच अधिवेशनासाठी हजर राहता येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. परंतु, अनेकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल न मिळाल्याने त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे विधानभवन परिसरात कर्मचारी आणि नेत्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेकांना विधानभवन परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागला.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी, कर्मचारी, पत्रकार पोलीस कर्मचारी यांचे कोरोना रिपोर्ट पाहून ते नेगेटिव्ह असतील तरच त्यांना प्रवेश देण्यात येणार होता. तसं नियोजनही करण्यात आलं होतं. यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवस असूनही अनेकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स आलेले नाही. त्यामुळे विधिमंडळ परिसरातील काउंटर्सवर सर्वांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. यातील रिपोर्ट नेगेटिव्ह आले तरच त्यांना विधिमंडळात प्रवेश मिळणार आहे. परंतु, ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील त्यांच्याबाबत काय निर्णय घेण्यात येणार, हा प्रश्न अनुत्तर्णीत आहे.

आमदारांना लवकर विधानभवनात सोडा, अजित पवार यांची सूचना

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात कमालीचा संभ्रम पाहायला मिळाला. कारण अनेकांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल मिळाले नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल होताच, तेथे उपस्थित असलेल्या सर्व आमदरांनी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. सर्व प्रकार ऐकून घेत अजित पवारांनी सर्व सिच्युएशन आपल्या हातात घेतली. सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेत अजित पवारांनी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना बोलावून घेतलं. तसेच सर्व आमदारांचे रिपोर्ट्स अद्याप का आलेले नाहीत, याबाबत विचारणा केली. तसेच काही आमदारांनी वैयक्तिक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे जर त्यांच्याकडे त्या चाचण्यांचे अहवाल असतील आणि ते नेगेटिव्ह असतील, तर त्यांना आतमध्ये सोडा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच भाजप आमदारांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच, भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. हातात बॅनर घेऊन भाजप आमदार पायऱ्यांवर उपस्थित होते. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी भाजप आमदारांच्या वतीने करण्यात आली. मराठवाड्यातील भाजप आमदरांनी ही मागणी केली. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांसमोर हात जोडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन थांबलं.

दरम्यान, विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु झालं असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे 38 आमदार विधिमंडळाच्या या अधिवेशनाला गैरहजर राहणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget