एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon Rain LIVE : अखेर मुंबईत मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती

Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्याच्या विविध भागत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. 

Key Events
Maharashtra Monsoon Rain Live Updates IMD Weather Alerts Mumbai Rains Latest News Maharashtra Monsoon Rain LIVE : अखेर मुंबईत मान्सूनचं आगमन, हवामान विभागाची माहिती
Maharashtra Monsoon Rain Live Updates

Background

Maharashtra Monsoon Updates LIVE : गेल्या काही दिवसांपासून अडकलेली मान्सूनची (Monsoon) गाडी रूळावर आली असून मान्सूननं हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. अखेर मान्सून कोकणात दाखल झाला आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. काल (शुक्रवार) राज्यातील अनेक भागांत पावसानं (Rain Updates) दमदार हजेरी लावली. मुंबईसह (Mumbai) उपनगरांत पावसाच्या सरी कोसळताना दिसल्या. तसेच, राज्यातील नाशिक, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली.  

मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. 

भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अचानक वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली आहे. 

अनेक भागात  मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यात महाबळेश्वरला जाणाऱ्या पसरणी घाटात धुक्याची चादर पसरलेली पसरली असून अनेक ठिकाणी घाटरस्ते या धुक्यात हरवले होते. या धुक्यातून वाट काढत पर्यटक मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. 

कोकणात मान्सूपूर्व पावसाची हजेरी 

कोकणातही पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. उत्तर रत्नागिरीत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळल्याचं पाहायला मिळालं. काल (गुरुवारी) संध्याकाळी चिपळूण, खेड, दापोलीतही पावसानं दमदार हजेरी लावली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली भागात मान्सून पूर्व पावसानं दमदार हजेरी लावली. 

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चांदवड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. गारपीट झाल्यानं शेतातील उभ्या पिकांना फटका बसणार आहे. 

औरंगाबादला वादळी पावसानं झोडपलं

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागाला वादळी पावसानं झोडपून काढलं. औरंगाबाद शहराजवळ चित्तेपिंपळगाव येथे वादळी वाऱ्यामुळं हॉटेलमधील खुर्च्या आणि टेबल अक्षरश: उडाले. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 

येत्या 24 तासांत मान्सून कोकणात, हवामान खात्याचा अंदाज 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार,  पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचं दिसत आहे. 

राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या  48 तासात मान्सून दाखल होणार आहे. तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. पुढील चार दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात

पुणे शहरात संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. कोथरुड, डेक्कन, सदाशिव पेठ, जंगली महाराज रोजवर या परिसरात पावसानं हजेरी लावली.  वादळी  वाऱ्यासह अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने बळीराजा सुखावला आहे. गेले काही दिवस रेंगाळला मान्सून महाराष्ट्राच्या प्रवेशद्वार आलेल्या सिंधुदुर्गात दाखल झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी 10 मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत सरासरी 22 मि.मी. पाऊस झाला आहे.

20:26 PM (IST)  •  11 Jun 2022

Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू

Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. आडगाव जावळे येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, यावेळी सांडू शामराव नजन यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांची बहीण सरुबाई शहादेव लांडे ( वय 40 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत केकत जळगाव येथे गजानन दराडे (वय 27 वर्षे ) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातील उटाडेवाडी येथील शेतकरी संजय उटाडे ( वय 40 वर्षे) शेतात ठिबक सिंचनचे पाइपलाइन करत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

18:17 PM (IST)  •  11 Jun 2022

कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर पावसाची दमदार हजेरी

कोल्हापूरच्या पन्हाळा गडावर मुसळधार पाऊस झाला आहे. जिओ ग्रेड पद्धतीने नवीन बांधलेल्या रस्त्यावरून पाणी नेबापूरमध्ये गेले आहे. गतवर्षी आलेल्या महापुरात पन्हाळा गडावरील हाच रस्ता खचला होता. आज आलेल्या पावसाने नेबापूरमधील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. 
 
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget