Maharashtra Monsoon Assembly Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session Live Updates : पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. यासंदर्भातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Aug 2022 02:00 PM
मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा हे सगळ्यांना माहीत; मिटकरींचा हल्लाबोल

भाजप नेता मोहित कंबोज यांनी केलेल्या सूचक ट्वीटचे (Mohit Kamboj) राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा आहे, हे सगळ्यांना माहीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी म्हटले. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्वीट कंबोज यांनी केले होते.


सविस्तर बातमी येथे वाचा.

आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे

Maharashtra Monsoon Assembly Session : "हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "हे डरपोकांचं विधान आहे. मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही. आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?" राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला (Maharashtra Monsoon Assembly Session) आजपासून सुरुवात झाली. त्यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध करताना आदित्य ठाकरे बोलत होते.


सविस्तर बातमी येथे वाचा.

'आले रे आले, गद्दार आले...'; शिंदे गटाच्या आमदारांना विरोधकांनी डिवचले

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधीमंडळ अधिवेशनाला पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस सरकार सामोरे जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच विरोधकांनी विधानभवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला. शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना 'आले रे आले, गद्दार आले' अशी घोषणाबाजी केली. 


सविस्तर बातमी येथे वाचा.

विधिमंडळाचं अधिवेशन दिवसभरासाठी स्थगित



सरकारमध्ये निष्ठेला स्थान नाही, आदित्य ठाकरेंचा निशाणा

विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेताही शिवसेनेचाच, राजाच्या विधान परिषदेतील ऐतिहासिक चित्र

विधिमंडळातून विरोधी पक्षनेते अजित पवार लाईव्ह



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं जीवन प्रेरणादायी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीनं देशाची मान उंचावली - मुख्यमंत्री LIVE

मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव



महाराष्ट्रात सामूहिक 'राष्ट्रगीत गायन'

Maharashtra Monsoon Assembly Session Live : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांचं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन 

Maharashtra Monsoon Assembly Session Live : अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आमदारांचं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं शिवरायांना अभिवादन



आमदार आदित्य ठाकरे लाईव्ह

विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध



शिंदे सरकार म्हणजे गद्दार सरकार : आदित्य ठाकरे लाईव्ह

Maharashtra Monsoon Assembly Session Live : हे गद्दार सरकार, ते कोसळणारच : आदित्य ठाकरे

Maharashtra Monsoon Assembly Session Live : हे गद्दारांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू : आदित्य ठाकरे

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची घोषणाबाजी

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. थोड्याच वेळात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.





Maharashtra Monsoon Assembly Session Live : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांची घोषणाबाजी

Maharashtra Monsoon Assembly Session Live : अधिवेशानाला सुरुवात होण्याआधी विरोधक आक्रमक, विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी, 'स्थगिती सरकार हाय हाय', घोषणा देत विरोधकांकडून निषेध



शिवसेना आमदार आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.





मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले आहेत. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे.


 





पार्श्वभूमी

Maharashtra Monsoon Session Live Updates : राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतरचं एकनाथ शिंदेचं हे पहिलंच पावसाळी अधिवेशन असणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. राज्याच्या विधीमंडळाचे बुधवारपासून अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरू होणार असून त्या निमित्ताने शिवसेनेतील ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे. 


शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून घमासान 


गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो  कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहायला मिळणार आहे. अधिवेशनात सत्तेत असलेली महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर दिसणार आहे. मंत्र्यांनी नुकताच शपथ घेतली आणि नुकतेच खातं वाटप झालेलं आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणार असल्याचं चित्र दिसणार आहे.


अधिवेशनात गाजणाऱ्या मुद्दे कोणते असतील?


1) मुसळधार पावसानं केलेलं शेतीचं नुकसान 
2) पूरपरिस्थिती 
3) रखडलेले प्रकल्प 
4) वादग्रस्त आमदार आणि मंत्री 
5) राज्यावरचं कर्ज 
6) मागच्या सरकारच्या कामांची चौकशी
7) राज्यपाल नियुक्त 12 नावांवरून गदारोळ





17 ते 25 ॲागस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी




येत्या 17 ऑगस्टपासून ते 25 ऑगस्टपर्यंत अधिवेशनाचा कालावधी असणार आहे. या कालावधीत शुक्रवारी, 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी आहे. दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या आहेत. 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. सुरुवातीला शोक प्रस्ताव, नवीन मंत्र्याची ओळख आणि शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि त्यामध्ये रंगेल ते सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये घमासान होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचं पहिलं पावसाळी अधिवेशन असल्यानं शिंदेसमोर प्रश्न अनेक पण वेळ कमी असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर सत्ताधाऱ्यांची मदार असणार आहे तर अजित पवार, सुनिल प्रभू आणि नाना पटोलेंवर विरोधी पक्षाची मदार असणार आहे. सत्तेत असताना महाविकास आघाडीची एकजूट आता विरोधी पक्षात आल्यावरही कायम असेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. जे चित्र विधानसभेत पाहायला मिळाणार तशीच आक्रमकता विधानपरिषदेतही दिसणार यांत काही शंका नाही.


सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन


राज्यात आज सकाळी 11 वाजता  सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.