एक्स्प्लोर

Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनातील महत्वाच्या अपडेट्स

LIVE

Key Events
Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Background

Maharashtra Monsoon Assembly Session : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.  17 आणि 18 ऑगस्ट रोजी दोन दिवस कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात हंगामा होण्याची शक्यता आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला होता. आरोग्य व्यवस्था तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याचं चित्र दुसऱ्या दिवशी पाहायला मिळालं होतं. आज तिसऱ्या दिवशी अधिवेशनात राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत, रस्त्यांची दुरावस्था, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासह अन्य मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडू शकतात.

दुसऱ्या दिवशी काय काय घडलं...

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा, संपूर्ण माहिती घेऊन काही वेळात देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन केलं  

विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, विधानपरिषदेत गोंधळ
 
आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल

पहिल्या दिवशी 25 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 17 तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं. तसेच जगदीप धनखड यांचंही उपराष्ट्रपती निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींचं अभिनंदन केलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मदत देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागणीत याची तरतूद करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी मदत मिळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यावरुन देखील आज तिसऱ्या दिवशी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 

25  ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Session) 17 ते 25 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडामुळं महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

काळ्या अन् पांढऱ्या दाढीवाल्यांवरुन भुजबळांची टोलेबाजी! विधानसभेत फडणवीसांसोबत रंगली जुगलबंदी 

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक; अजित पवारांची फुल बॅटिंग

16:35 PM (IST)  •  22 Aug 2022

Maharashtra Monsoon Session : नवं सरकार बेकायदेशीर, स्वत:च्या स्वार्थासाठी निर्णय घेणारं; आदित्य ठाकरे यांचा आरोप

वॉर्ड रचना असेल किंवा आरेचा निर्णय असो, या सरकारने स्वत:च्या स्वार्थासाठी हे निर्णय घेतला आहे. हे सरकार तात्पुरतं असून बेकायदेशीर आहे असं शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. 50 थर लावून हे सरकार आल्याचं सांगितलं जातंय, पण यामध्ये खालच्या थराचा बळी घेऊन हे थर लावण्यात आले आहेत असंही ते म्हणाले.

15:02 PM (IST)  •  22 Aug 2022

नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो- मुख्यमंत्री

थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेतला. निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला, तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो- मुख्यमंत्री

15:01 PM (IST)  •  22 Aug 2022

BMC वॉर्डसंदर्भात सुनील प्रभू काय म्हणाले...

 227 वॉर्ड करण्याबाबत अंतिम निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता, याविरोधात आम्ही कोर्टात दाद मागितली होती. कोर्टानं याबाबात चार आठवडे स्टेटस को दिला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय होणारं आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही, असं सुनील प्रभू यांनी म्हटलं आहे. 

13:18 PM (IST)  •  22 Aug 2022

नगराध्यक्ष याच्यावर अविश्वास ठराव आणायचा याची तरतूद कुठे: भास्कर जाधव काय म्हणाले....

भास्कर जाधव काय म्हणाले....

नगराध्यक्ष याच्यावर अविश्वास ठराव आणायचा याची तरतूद कुठे आहे. नगराध्यक्ष चुकीचा आहे, त्याला बोलावण्याचा अधिकार कुठे आहे? त्या नगराध्यक्ष याने कसेही वागावे, अशी माणसे निरंकुश होतात आणि ती होणार नाही असे सांगत येत नाही.  दीड वर्षांपर्यत ठराव आणता येत नव्हता आणि जर काही अयोग्य वाटलं तर जिल्हाधिकारी याला पाठवावा लागत होते. मग राज्यकर्त्यांकडे अविश्वास ठराव मांडावा लागतो. नियमावलीत करून हे चालणार नाही कायद्यात तरतूद द्या. मुख्यमंत्री तुम्ही हे विधेयक थांबवा. तुमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे तुम्ही ते मंजूर करून घ्याल. 13 कोटी महाराष्टात 56 ते 57 टक्के लोक शहरात राहतात. शहरात राहणाऱ्या लोकांचे जीवन नरक यातनेसारखे झाले आहे. नगरविकास विभागाची स्वतंत्र यंत्रणा काय आहे? त्यांचा स्वतंत्र अधिकारी वर्ग नाही

13:10 PM (IST)  •  22 Aug 2022

विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे  जयंत पाटील, अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा गटनेते आमदार अनिल पाटील, विधानपरिषदेचे पक्ष प्रतोद शशिकांत शिंदे, आमदार दिलीप बनकर, आमदार यशवंत माने, आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम, आमदार संदिप क्षिरसागर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विक्रम काळे, आमदार अनिकेत तटकरे तसेच विधीमंडळ पक्ष कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Sarpanch santosh Deshmukh Case : बीड सरपंच प्रकरणात 3 जणांना अटक; A to Z Updates माझावरBeed Santosh Deshmukh Case : बीड प्रकरणी आरोपींवर सक्त कारवाई झाली पाहिजे : Anjali DamaniaSuresh Dhas On Beed Santosh Deshmukh Case : Sudarshan Ghule हा केवळ प्यादं! मुख्य आरोपी 'आका' आहे : Suresh DhasBeed Santosh Deshmukh Case : बीड हत्या प्रकरणी मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
शिक्षक की हैवान... अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला, दरवाजा बंद केला अन्...; मुंबईत खळबळ
Ajmer Dargah : अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
अजमेर दर्ग्यात पीएम मोदी चादर चढवणार; दर्ग्याचे वेब पोर्टल अन् यात्रेकरूंसाठी 'गरीब नवाज' ॲपही लॉन्च केलं जाणार
Guardian Ministers List : उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
उत्तर महाराष्ट्रातील मंत्र्यांना कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळणार? समोर आली संभाव्य यादी
Human Metapneumovirus Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या व्हायरसचा उद्रेक; भारतात येण्याचा धोका आहे का? केंद्र सरकारने कोणती माहिती दिली??
Ind vs Aus 5th Test : सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
सेनापती जायबंदी, मैदान सोडले, पण मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली; ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला वळवळण्याची संधीच दिली नाही!
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
अजित पवार दोन जिल्ह्याचे पालकत्व घेणार! वादात सापडलेल्या धनंजय मुंडेंचाही जिल्हा ठरला; पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर
कोहली आऊट झाल्यावर... ; नाना पाटेकरांच्या वक्तव्यानं सोशल मीडियावर खळबळ, पण नेटकरी करतायत मीम्स व्हायरल
कोहली आऊट झाल्यावर... ; नाना पाटेकरांच्या वक्तव्यानं सोशल मीडियात खळबळ, पण नेटकरी करतायत मीम्स व्हायरल
Las Vegas Tesla Truck Blast Case : नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
नाताळच्या दुसऱ्या दिवशी भांडण अन् सहा दिवसांपूर्वी बायकोशी घटस्फोट! अमेरिकन जवानाने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हाॅटेलसमोर ब्लास्ट केला!
Embed widget