एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा एकदा फास्ट ट्रॅकवर! पालघर जिल्ह्यात प्रकल्पाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात 

Bullet Train : महाविकास आघाडी सरकार कडून शिंदे-भाजप सरकार येताच बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा एकदा फास्टट्रॅक वर आलेला दिसतोय.

Bullet Train : राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) असताना मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्प (Bullet Train Project) काही प्रमाणात लाल फितीत सापडला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार कडून शिंदे भाजप सरकार येताच बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा एकदा फास्टट्रॅक वर आलेला दिसतोय. पालघर जिल्ह्यात सध्या बुलेट ट्रेन साठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

जिल्ह्यात 71 गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प 

मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन या प्रकल्पासाठी भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात 71 गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून जिल्ह्यातील 218 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. सध्या 70 टक्क्यांपेक्षाही अधिक जमीन संपादित करण्यात आली असून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला आहे. शिंदे आणि भाजपचे सरकार येताच या प्रकल्पाचा वेग आणखी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे 2027 पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचा दावा सरकार करून करण्यात आला आहे   तरी अजूनही काही प्रकल्प बाधित शेतकरी व्यक्त करीत असून इतरांनी जमिनी दिल्या, आता आमची इच्छा नाही, तरीही सरकार जोर जबरदस्ती करून या जमिनी घेऊ पाहत आहे, त्यामुळे नाईलाज असल्याचे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आत्ता आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या, त्यामुळे बाधित आदिवासींच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असं मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येते

विरोधकांकडून प्रकल्पाला जोरदार विरोध 

बुलेट ट्रेनची घोषणा होताच विरोधकांकडून या प्रकल्पाला जोरदार विरोध होऊ लागला होता. मात्र सध्या सर्वच राजकीय पक्ष आणि जिल्ह्यात प्रखर विरोध करणाऱ्या संघटना या प्रकल्प विरोधात मावळ झालेल्या दिसतात. त्यामुळे बुलेट ट्रेन भूसंपादन आणि सर्वेक्षणासाठी होणाऱ्या कामांना वेग आला आहे . अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाचा मोबदला घेतला असून उर्वरित शेतकरी लवकरच आपली जागा बुलेट ट्रेनसाठी देतील असा विश्वास प्रकल्पाकडून व्यक्त करण्यात आला आहे . 

शेतकऱ्यांचं योग्य पुनर्वसन केल जावं
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झाल्यानंतर विरोध असलेले शेतकरी ही आता आपल्या जमिनी प्रकल्पासाठी देण्यास तयार झाले आहेत. मात्र जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांनी जागा दिल्याने आमच्यावर दबाव येत असल्याचा दावा विरोध करणारे शेतकरी करू लागले आहेत आम्ही आमच्या जमिनी दिल्या तर योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसन केल जावं अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून सरकार समोर ठेवण्यात आली आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM TOP  630 AM 26 November 2024 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सSanjay Bhor on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या पठ्ठ्याने कारण सांगितलंRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्तीRashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Embed widget