Nashik Burning Bus : नाशिक सिन्नर रोडवर काल रात्रीच्या सुमारास बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सिन्नर घाटात बस ने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळत आहे


या बसने अचानक घेतला पेट


ही खाजगी बस नाशिकहून कोल्हापूरला निघाली होती. यावेळी या बसने अचानक पेट घेतला. घाट चढत असतानाच बसने पेट घेतल्याची माहिती सिन्नर midc पोलिसांनी दिली आहे. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दिलासादायक बाब अशी की, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत


वाहतूक काही काळ ठप्प


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते, आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने बस जळून खाक झाली आहे. बसने पेट घेतल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.


30 ते 35 प्रवासी बसमध्ये


अधिक माहिती अशी की, रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन लक्झरी बस निघाली होती. स्लीपर कोच असल्यामुळे 30 ते 35 प्रवासी या बसमध्ये होते. शिंदे पळसे येथील टोलनाका सोडल्यानंतर बस मोहदरी घाटात आली. याच वेळी गाडीच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस घाटातच रस्त्याच्या कडेला नेली. यानंतर प्रवाशांना एक-एक करत गाडीपासून दूर जाण्याचे आवाहन त्यांनी केले.


महत्वाच्या इतर बातम्या :


डी-गँगशी संबंध असलेल्या दोघांना अटक, छोटा शकीलच्या सोबतीने गैरव्यवहार, NIA ची कारवाई 


 


NIA : डी-गँगशी संबंधित NIA चौकशीचा चौथा दिवस, संबंधित सदस्य चौकशीसाठी NIA मुख्यालयात हजर


 


ED आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी NIA मुख्यालयात; सुमारे 18 जणांची चौकशी


 


अंडरवर्ल्डसाठी मनी लॉंड्रिंग करणाऱ्या दोन आरोपींचे राजकीय नेत्यांशी लागेबांध, NIA चा खळबळजनक दावा