Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील पहिलं फुल स्पॅन प्रिकास्ट बॉक्स गर्डर लॉन्च
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Petrol, Diesel Price Today, Petrol Diesel Rate 25 November : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्रानं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करत सर्वसामान्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर दिलासा दिला होता. त्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी ऐतिहासिक उंची गाठली असून देशातील सर्व महानगरांतील किमती स्थिर आहेत.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
ST Workers Strike : एसटी संपाबाबत सरकारची घोषणा; एबीपी माझाचा अंदाज ठरला खरा, संप मिटणार?
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात आला असून एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारणतः ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. एबीपी माझानं यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच वृत्त प्रकाशित केलं होतं. गेल्या बऱ्याच काळापासून एबीपी माझानं एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. अखेर एबीपी माझानं दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु, असं असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांनी मात्र अद्याप संप मागे घेतलेला नाही. सरकारने दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करणार आणि आज (गुरुवारी) यावर भूमिका स्पष्ट करणार असं आमदार सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे चेंडू आता संपकऱ्यांच्या कोर्टात असून एसटी कर्मचारी संप मागे घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय, अनिल परबांची घोषणा
एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली असून साधारण: ज्यांना 12,500 रुपये पगार आहे, त्यांना आता 17,500 रुपये पगार मिळणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील पहिलं फुल स्पॅन प्रिकास्ट बॉक्स गर्डर लॉन्च
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील पहिल्या फुल स्पॅन प्रिकास्ट बॉक्स गर्डरचे लॉंचिंग आज करण्यात आले. गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कास्टिंग यार्डमध्ये हे महत्वपूर्ण काम आज केले गेले. 40 मीटर लांबीचा हा अखंड तुकडा उचलून बुलेट ट्रेन साठी उभारण्यात आलेल्या पिलरवर आज ठेवण्यात आला. या प्रिकास्ट गर्डरचे वजन 970 मेट्रिक टन असून त्यामध्ये 390 घनमीटर काँक्रीट आणि 42 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनसाठी तयार केलेला हा बॉक्स गर्डर आजपर्यंतचा भारतात बनवण्यात आलेला सगळ्यात जास्त वजनाचा गर्डर आहे. हा संपूर्ण गर्डर एकसंध असून त्याचा कोणताही भाग जोडण्यात आलेल्या नाही. येणाऱ्या काळात बुलेट ट्रेन साठी अशाच प्रकारे पीलर्स उभारून त्यावर प्रिकास्ट बॉक्स गर्डर ठेवण्यात येतील.
लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती, त्रास होऊ लागल्यानं 17 कर्मचारी रुग्णालयात दाखल
लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती समोर आलीय. गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागल्यामुळं 17 कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासनानं घराडा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. तर कर्मचाऱ्यांपैकी एकाला चिपळूण मधील लाईफ केअर मध्ये केलं दाखल. रुग्णालयात दाखल झालेले सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वायू गळतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती, त्रास होऊ लागल्यानं 17 कर्मचारी रुग्णालयात दाखल
लोटे एमआयडीसीमधील घराडा केमिकलमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती समोर आलीय. गॅस गळतीमुळे कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागल्यामुळं 17 कर्मचाऱ्यांना कंपनी प्रशासनानं घराडा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. तर कर्मचाऱ्यांपैकी एकाला चिपळूण मधील लाईफ केअर मध्ये केलं दाखल. रुग्णालयात दाखल झालेले सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वायू गळतीचे प्रमाण वाढू लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.
बुलढाणा: चिखली येथील इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाच्या हत्या प्रकरणी तिघांना अटक
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहराच्या जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या मालकाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजलीय. जिल्ह्यातील देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी मोठ्या शिताफीने तापस चक्र फिरवून घटनेतील आरोपीना अटक करण्यात यश मिळविले आहे. आज जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चवरिया यांनी ही माहिती दिलीय.
पुण्यात गेल्या 24 तासात 90 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात गेल्या 24 तासात 90 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 4,96,326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 864 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 4411 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.