Maharashtra Breaking News LIVE Updates : परमबीर सिंह भारतातच, सुप्रीम कोर्टात त्यांच्या वकिलाची माहिती
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
धुळे आगारातून सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या
धुळे आगारातून आज सकाळी सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना न जाणून घेतात प्रशासनातर्फे बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, धुळे एसटी आगारातून आज तब्बल 14 दिवसांनंतर लालपरी मार्गस्थ करण्यात आली. परंतु, या बसेस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली. यात एक एसटी चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
किरीट सोमैयांची वाट अडविण्याचा शिवसैनिकांकडून प्रयत्न
पिंपरी चिंचवडमध्ये आलेले भाजप नेते किरीट सोमैयांची वाट अडविण्याचा शिवसैनिकांकडून प्रयत्न. शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन परतत होते. तेंव्हा अचानक शिवसैनिक तिथं पोहचले, काळे झेंडे दाखवत या शिवसैनिकांना गेट समोर ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. सोमय्या विरोधात शिवसेना या आधी ही आक्रमक झाल्याचं आपण पाहिलंय, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. शेवटी पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला केलं आणि सोमैयांना वाट मोकळी करून दिली.
वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी
मुंबई - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
एस टी कामगार मराठी नाहीत का ? - सदाभाऊ खोत
राज्यभरातून एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानात येत आहेत. उद्या आम्ही या सरकारचा तेरावा घालणार आहोत आणि परवा एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत. आम्ही सर्व कर्मचारी आझाद मैदानात तर कुटुंबीय अनिल परब यांच्या घरासमोर बसतील. परिवहन मंत्र्यांच्या मनात खोटं आहे. त्यांचे मन साफ नाही. त्यांच्या मनात कामगारांबद्दल आस्था नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. शिवसेनेची लोक लाठ्या काठ्या घेऊन हा संप मोडायला निघाली आहेत. एस टी कामगार मराठी नाहीत का ?मागणी मान्य नाही झाल्यास सर्व एस टी कामगार वांद्रे इथल्या परिवहन मंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब बसणार आंदोलन करणार, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छता पुरस्कार विजेत्या विटा, लोणावळा, सासवड, नवी मुंबई वासियांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
राष्ट्रीय पातळीवरच्या स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्रानं सर्वाधिक पुरस्कार जिंकून देशात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून सांगली जिल्ह्यातील विटा, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवड नगरपालिकांनी अनुक्रमे पहिले तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकांचं विशेष अभिनंदन केले आहे. नवी मुंबई महापालिकेनं विशेष पुरस्कार जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही कौतुक केले आहे. ‘स्वच्छेतेतून आरोग्याकडे, आरोग्यातून विकासाकडे’ सुरु असलेली राज्याची वाटचाली अशीच सुरु राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
परमबीर सिंह भारतातच, सुप्रीम कोर्टात त्यांच्या वकिलाची माहिती
मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंह हे भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दिली.
Maharashtra Latest News : केडीएमसीत सेनेचा भाजपला धक्का; पाच ते सहा विद्यमान नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
केडीएमसीत सेनेचा भाजपला धक्का. 'मिशन लोटस'ला शिवसेनेच्या 'मिशन धनुष्यां'नं टक्कर दिली आहे. केडीएससीमध्ये शिवसेनेचं 'मिशन धनुष्य' सुरु झालं असून केडीएससीचे भाजपचे पाच ते सहा विद्यमान नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. केडीएमसी निवडणुकांआधी नगरसेवकांचा भाजपला रामराम. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
Maharashtra Jalgaon Co-operative Bank Counting : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसासाठी 144 कलम लागू...
21 ते 23 तारखे दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून या तीन दिवसात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, रैली, धरणे , आदी एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त जमा होता काम नये , हा आदेश बुलढाणा जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात करण्यात आला आहे
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिखाधिकारी यांनी जिल्ह्यात 144 कलम लागून करण्यात आले असून जर आदेशाचे कोणी उलनघन केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पुसदमध्ये तरुणाची हत्या
पुसदच्या मेडिकेयर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूला असलेल्या खुल्या मैदानात घडले हत्याकांड. सैय्यद मोबीनोद्दीन खतीब (वय 34 वर्ष अंदाजे) रा. वसंत नगर,पु सद असे मृतकाचे नाव. जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय.
पुसद पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे