Breaking News LIVE Updates : बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
Gadchiroli Naxal: गडचिरोलीत पोलीस चकमकीत कमांडर मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षल्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु, गृहमंत्र्यांकडून कौतुक
मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा
दरम्यान या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.
Amravati Violence : अमरावतीत हिंसाचारानंतर संचारबंदी, इंटरनेट सेवा तीन दिवस बंद राहणार
अमरावती: महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये 'बंद' दरम्यान हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आला असून पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबाबत माहिती दिली. तसेच वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. अमरावतीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.त्रिपुरामधील घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र या बंदलाही हिंसक वळण लागलंय. सकाळी दहाच्या सुमारास जमाव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला. या जमावाने काही वेळातच दगडफेक आणि घोषणाबाजी सुरु केली. जमावाने यावेळी दुकानांना लक्ष्य केलं. दुकानांवर दगडफेक करत तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमावाला नियंत्रित करण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
बाबासाहेब पुरंदरेंची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
अमरावतीच्या ग्रामीण भागातही संचारबंदी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ला सहकार मंत्री अमित शहा भेट देणार
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला सहकार मंत्री अमित शहा भेट देणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. सत्तेत असताना मी ही बराच वेळा भेट दिलीय. अमित शहा हे सहकार मंत्री आहे त्यामुळे ते व्ही एस आय ला भेट देऊ शकतात त्यात काहीही चुकीचे नाही. 'व्ही एस आय' ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली चांगली संस्था आहे.
तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता - चंद्रकांत पाटील
भाजप हे सॉफ्ट टार्गेट होतेय, राज्यात काही झालं की भाजपचा हात आहे बोललं जातं आहे. परवाच्या तोडफोडीत कोणाचा हात होता? हे ही संजय राऊत यांनी सांगून टाकावं. कालची प्रतिक्रिया हिंदू मार नही खायेगा अशीच होती, उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. 1993 च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला नसता तर मुंबईत हिंदू जिवंत राहिला नसता. पण आता हिंदुहृदयसम्राट यांचे वारसदार काही बोलणार नाही का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय. ते पुण्यात बोलत होते.