Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मंत्री हरीश चौधरी यांची पंजाबचे प्रभारी नेमले गेले आहेत. त्यांच्या सोबतीला दोन सहप्रभारी पंजाबमधली सत्ता राखणं काँग्रेससमोरचं मोठे आव्हान असणार आहे
गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसा पत्रव्यवहार सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयासोबत सुरु केला आहे. ते देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी ही नोटिस बजावण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. जेष्ठ आर्थो सर्जन डॉक्टर शेखर भोजराज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत.
लातूरमधील विलासराव देशमुख महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. नवजात बालकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला. या बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राज्यात शिवसेना भाजपचा सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष आता अगदी तालुका पातळीवर जाऊन पोहोचलाय. जिओ केबल टाकण्यासाठी शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
नवरात्रीशिवाय होणार्यी गर्दीचे तुळजाभवानी मंदिरात सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील आठ दिवसांपासून दररोज सव्वालाख भाविकांचे दर्शन घेत आहेत. कोरोना आपत्कालीन परिस्थिती निवळल्यानंतर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. मागील आठ दहा दिवसांपासून दीपावलीच्या सुट्ट्या आणि कोरोना नंतरचे दर्शन घेण्याची भाविकांची आतुरता या दोन्ही बाबीमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दररोज दर्शनासाठी सव्वा लाख भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांच्या चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि पारंपारिक कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
सिंधुदुर्गात ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री बांदा, मालवण तसेच इतर ठिकाणी वाहनांची अचानक तपासणी केली गेली. माळवण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे रात्री मालवण पोलिसांनी अचानकपणे नाकाबंदी मोहीम राबवत पर्यटकांच्या वाहनांसह सर्व वाहनांची कसून तपासणी केली. अवैध धंदे व गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने ऑल आउट ऑपरेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही तपासणी मोहीम राबवली. वाहनांची तपासणी करून त्यांच्या नोंदी घेतल्या जात होत्या. पर्यटक व वाहन चालकांनीही तपासणी मोहिमेत यावेळी सहकार्य केले.
बैलगाडा शर्यती प्रकरणी पुन्हा सुप्रीम कोर्टात सरकार, बंदी हटवण्याबाबत महाराष्ट्र सरकारची याचिका ऐकायला सुप्रीम कोर्ट तयार, येत्या सोमवारी होणार प्रकरणाची सुनावणी, बई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात
हायकोर्टाने २०१७ च्या दरम्यान बंदी घातलेली..
दशकभरापासून रखडलेला आयकर नोटिशीचा मुद्दा केंद्र सरकारने निकाली काढला. काल आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेत केंद्रसरकारने इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी किमतीमध्ये प्रतिलिटर एक रुपया 47 पैशांची वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयी मंत्रिमंडळ समितीने हा निर्णय घेतला. केंद्राने अशा पद्धतीने दरवाढ केल्यामुळे साखर कारखानदारीला मोठे बळ मिळणार आहे. डिसेंबर २०२१ पासून सुरु होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात तेल कंपन्या वाढीव दराने इथेनॉल खरेदी करतील. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत सध्या असणाऱ्या 62 रुपये 65 पैसे प्रति लिटर वरून 63 रुपये 45 पैसे करण्यात आली आहे सी हेवी मोलॅसिस पासून तयार होणाऱ्या इथेनॉल ची किंमत 45 रुपये 69 पैसे प्रति लिटर वरून हे चाळीस रुपये 66 पैसे तर बी हवे पासून बनणाऱ्या इथेनॉल ची किंमत 57 रुपये 61 पैसे पासून 59 रुपये आठ पैसे वाढवण्यात आली आहे.
आसाम भाजपच्या आमदारांचा अभ्यास वर्ग उद्यापासून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे सुरू होणार आहे. या वर्गाचं उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते उद्या होईल. त्यानिमित्ताने नड्डा आज मुंबईत येणार आहेत. दुपारी तीन वाजता मुंबई विमानतळावर मुंबई भाजपच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे मुक्कामी असतील. उद्या सकाळी आसाम भाजपच्या आमदारांच्या वर्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल.
वाशीम जिल्हा आज कोरोना मुक्त झाला आहे तब्बल २० महिन्या नंतर जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा स्वास सोडला आहे वाशीम जिल्ह्यात 41769 इतके रुग्ण बाधित आढळले होते तर 41129 डिस्चार्ज करण्यात आले तर उपचारा दरम्यान 629 जणाचा मृत्यू झाला. वाशीम जिल्ह्यात पहिला रुग्ण ३ एप्रिल 2020 मध्ये सापडला होता त्यानंतर रोग प्रतिबंधक कायद्यानुसार कडक अंमलबजावणी केल्याने पहिल्या लाटेत रुग्ण कमी आढळले होते
गडचिरोली:- गडचिरोलीच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने नक्षल्यांचं पत्र आलं आहे. "एकनाथ शिंदे यांना मारण्याची तथाकथित धमकी हा त्यांनीच स्वतःच रचलेला स्टंट " या पत्रकात भाकपा(माओवादी) चे काही घेणेदेणे नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हा फक्त लोकप्रियता मिळविण्याचा प्रकार असल्याचं मत. आपले महत्व वाढविण्याकरीता मंत्री व दलाल नेते वेळोवेळी असे स्टंट करीत असतात. यातुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही सुटलेले नाहीत. त्यांनीही स्वतःची हत्या करण्याचे स्वतःच खोटे कारस्थान एनआयए' व्दारे रचून लोकप्रियता मिळवली होती. उध्दव ठाकरे सरकार व शिंदे गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यास सपशेल फेल ठरले असल्याचं मत, आम्ही तथाकथित धमकीच्या पत्राचा निषेध करत जनतेला अश्या स्टंटच्या मागे दडलेला हेतू लक्ष्यात घेऊन सजग व्हावे असे आवाहन ही ह्या पत्रात करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला 18 वर्षीय युवक बुडाला आहे. तर त्याचे अन्य दोघे साथीदार सुखरूप बाहेर आले आहेत. हा प्रकार काल सायंकाळी घडला. अर्जुन पाताडे सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील राहणारा मुलगा माडखोल धरणावर पोहण्यासाठी गेला असता बुडाला. काल उशिरा ही घटना घडण्याने शोधकार्य करण्यासाठी अडथळे येत होते. मात्र आज त्याच शोधकार्य सुरू आहे. तालुक्यातील अनेक युवक या धरणावर कायम पोहण्यासाठी जात असतात. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने धरणावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा उभी केली नसल्याने वारोवार याठिकाणी अश्या घटना घडत असतात.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थ्याचा रात्री खून झाला आहे. हा विद्यार्थी MBBS च्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेत होता. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या झाल्याचं समजतेय. डॉ अशोक पाल असे विद्यार्थ्यांचे नाव असल्याचं समजतेय. हा विद्यार्थी मूळचा ठाण्याचा रहिवसी आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस तपास घेत आहेत.
पार्श्वभूमी
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई
एसटी महामंडळाकडून काल 376 आज 542 अशी आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरेंवर मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया, बुधवारी रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवाब मलिकांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी भाजप नेते आणि एनसीबीविरोधात आरोप करायला सुरुवात केली आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश
फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६५०० कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश
२०१४ ते २०१९ या काळात पायाभूत सुविधांकरता करता ६५०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती...
मात्र, पुन्हा २०२० मध्ये विवीध ठिकाणच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा २३०० कोटींची कामे करावी लागत आहेत...
२०१४ ते २०१९ या काळात झालेल्या पायाभूत सुविधा विकासांच्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
आधीच ६५०० कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत, याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला...
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना फडणवीस सरकारच्या काळातील विद्युत यंत्रणेच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी आता लागल्याने सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटणार आहे...
पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला हिरवा कंदील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्यात 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. अनेकदा प्राध्यापक भरती व्हावी यासाठी संघटनांकडून आंदोलने देखील करण्यात आली. त्यानंतर आता टप्याटप्याने ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून प्राध्यापक भरती बाबत माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -