Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 19 Nov 2021 09:23 AM
नाशिकमध्ये कार आणि दुचाकीचा अपघात, एकाच कुटुंबातील तीन ठार तर एक जखमी

नाशिकच्या देवळा तालुक्यात इर्टीगा कार आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून त्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाले आहेत. शेतीचे काम आटोपून घराकडे परततांना पती-पत्नीसह मुलावर काळाचा घाला. 

नाशिकच्या पेठ तालुक्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या


नाशिकच्या पेठ तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यानी  आत्महत्या  केली आहे. आगारातील गहिनाथ गायकवाड या चालकाने आज दुपारी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. गेल्या काही दिवसांपासून सूरु असलेल्या एसटी  आंदोलनातही गायकवाडांचा  सहभाग होता. गहिनाथ गायकवाड मूळचे बीडचे रहिवाशी असून त्यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. 

देशवासियांना संबोधित करताना काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  "देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत." असं मोदींनी म्हटलं आहे. 

बळीराजापुढं नमलं केंद्र सरकार; तिनही कृषी कायदे मागे, पंतप्रधानांची मोठी घोषणा

PM Narendra Modi Address to Nation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत.  माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे. 

पार्श्वभूमी

मोठी बातमी...! तिन्ही कृषी कायदे मागे... पंतप्रधान मोदींची घोषणा


PM Narendra Modi Address to Nation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत.  माझ्या सरकारनं शेतकरी हिताला प्राधान्य दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून मदत केली जात आहे. 


काय म्हणाले मोदी...


देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. 


Petrol-Diesel Price Today : सलग 15व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरातील दर काय?


Petrol-Diesel Price Today, 19 November 2021 : भारतीय तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. देशात सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 


भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 


केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. दरम्यान, अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच मंगळवारी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 4 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 रुपये प्रति लिटरनं स्वस्त करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.