Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 25 Jan 2022 09:27 PM
पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलनाच्या तयारीत आहे.  मोठ्या संख्येने विद्यार्थी  सध्या रस्त्यावर उतरले आहेत.  मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. 

मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर लढणार

 


मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार आहे. मनसेसोबत युती न करण्याचा पक्षाचा निर्णय झाला आहे. आरपीआय आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेण्याचं भाजपने ठरवलं आहे.

झारखंडच्या काँग्रेस जनरल सेक्रेटरीपदी अविनाश पांडे यांची नियुक्ती

झारखंड काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी अविनाश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या संबंधीचे पत्रक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव केसी वेणुगोपाल यांनी काढलं आहे. 

वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा जवळ मोटार नदीत कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातातील मृतांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट केली आहे. मृतांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणांचा समावेश होता. अशा होतकरू तरुणांचा मृत्यू दुर्दैवी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा आघात असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्री  ठाकरे यांनी सहवेदनाही प्रकट केली आहे. 

बार्शीतल्या फटे स्कॅम प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे याला न्यायालयीन कोठडी 

बार्शी येथील फटे स्कॅम प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 27 जानेवारीपर्यंत असलेली पोलीस कोठडी संपण्याआधीच पोलिसांनी घेतली न्यायालयीन कोठडी. 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक, त्यामुळे पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पोलिसांनी मागितली न्यायालयीन कोठडी. बार्शी सत्र न्यायालयाकडून विशाल फटे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळेंना कोरोनाची लागण

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळेंना कोरोनाची लागण झाली आहे. दोन महिन्यांत त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

खोटी माहिती देत अनुदान लाटल्याबद्दल पुण्याच्या झील शिक्षण संस्थेतील तीन संचालकांना अटक

खोटी विद्यार्थीसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटल्याबद्दल पुण्यातील झील शिक्षण संस्थेच्या तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे.  पुण्यातील कात्रज भागातील नऱ्हे आंबेगाव भागात या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. संभाजी काटकर (वय 70 वर्षे),  चंद्रकांत कुलकर्णी (वय 61 वर्षे) आणि  युवराज भंडारी (वय 39 वर्षे) अशी या तीन संचालकांची नावे आहेत. विद्यार्थ्यांची बनावट संख्या दाखवून झील संस्थेने सरकारचे नऊ लाख रुपये लाटल्याचं आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलं आहे. मात्र या संस्थेने त्यांच्या सर्व महाविद्यालयांमधे मिळून साडे चार कोटी रुपयांचे अनुदान बनावट विद्यार्थ्यी संख्या दाखवून लाटल्याच पोलीसांचा अंदाज आहे.

खोटी विद्यार्थी संख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटणाऱ्या पुण्यातील झील शिक्षण संस्थेच्या तीन संचालकांना अटक

खोटी विद्यार्थीसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटणाऱ्या पुण्यातील झील शिक्षण संस्थेच्या तीन संचालकांना अटक करण्यात आलीय. पुण्यातील कात्रज भागातील नर्हे आंबेगाव भागात या संस्थेचे मुख्य कार्यालय आहे. संभाजी काटकर ( वय 70) , चंद्रकांत कुलकर्णी (वय 61) आणि युवराज भंडारी (वय 39) अशी या तीन संचालकांची नावे आहेत. विद्यार्थ्यांची बनावट संख्या दाखवून झील संस्थेने सरकारचे नऊ लाख रुपये लाटल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात दिसून आलय. मात्र या संस्थेने त्यांच्या सर्व महाविद्यालयांमधे मिळून साडे चार कोटी रुपयांचे अनुदान बनावट विद्यार्थ्यी संख्या दाखवून लाटल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

जिल्हा नियोजन निधी वाटपाच सूत्र बदलणार

जिल्हा नियोजन निधीवरून अनेक मंत्री आणि आमदारांच्या तक्रारीनंतर वित्त मंत्री अजित पवार निर्णय  घेणार आहे.  जुन्या सूत्रानुसार प्रत्येक जिल्ह्याला कमी जास्त निधी मिळत असल्याच्या तक्रारी  आहेत.  हा निधी वाटप करण्यासाठी सन 2010 ला ठरवलेल्या सुत्रांनुसार निधी वाटप केला जातोय.  मात्र 10 वर्षात अनेक जिल्ह्यांची लोकसंख्या वाढली असून मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. 

1 फेब्रुवारीपासून तमाशाचे फड पुन्हा रंगणार;रघुवीर खेडेकरांनी दिली माहिती

येत्या 1 फेब्रुवारीपासून तमाशाचे फड पुन्हा रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. खेडेकरांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली..

ट्विट करत पूनम महाजन यांनी दिले संजय राऊतांना प्रत्युत्तर

भाजप खासदार पूनम महाजन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. "स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टुन दाखवू नका". असं ट्विट करत पूनम महाजन यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय आणि विधान भवनाला आकर्षक रोषणाई

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी इमारतींना रोषणाई करण्यात येतेय. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मंत्रालय आणि विधान भवनाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे.

वर्ध्याच्या तिरोडामधील सेलसुरामध्ये चारचाकी गाडीचा भीषण अपघात; वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

 वर्ध्याच्या तिरोडामधील सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. आणि या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय. हे सर्व सावंगी इथल्या दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी होते. त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे ते पार्टी करण्यासाठी ते देवळीवरून वर्ध्याला येत असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा इथल्या नदीच्या पुलावरून खाली कोसळली. आणि या अपघातात गाडीतील सात जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Coronavirus : चिंता वाढली! देशभरात Omicronचा कम्युनिटी स्प्रेड; वाढती रुग्णसंख्या, WHO म्हणतं...


Coronavirus Update : कोरोना व्हायरस (Coronavirus) नं गेल्या दोन वर्षांत सर्वांची धाकधुक वाढवली आहे. आतापर्यंत या व्हायरसबाबत अनेकांच्या मनात अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. काही लोकांचा तर असाही समज आहे की, कोरोना पर्व आता संपलं आहे. पण हा समज चुकीचा आहे. कारण देशात दररोज 3 लाखांहून अधिक दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होत आहे. 


कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं WHO नं नवा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ म्हणतं की, कोरोनाचा ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरियंट नाही,  BA.2 सारखे स्ट्रेन भविष्यात अनेक दिसून येतील. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंट आता देशात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संक्रमित ठिकाणी भेट न देता, कोरोना पॉझिटिव्ह होईल. 


6 फेब्रुवारीपासून कोरोनाचा जोर वाढणार 



इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासच्या एका अभ्यासानुसार, 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे. म्हणजेच, पुढील 2 आठवड्यांपर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असतील. अभ्यासात म्हटलं आहे की, 'आर-व्हॅल्यू', जे कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार दर सांगते, ते 14 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान आणखी कमी होऊन 1.57 वर आलं आहे. जर हा दर एकापेक्षा कमी झाला तर असं मानलं जातं की, जागतिक महामारी संपली आहे.


सांगली: जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात राडा, निविदेच्या वादातून हाणामारी


सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या सांगलीतील निवासस्थानी राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका निविदेच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीने ही तक्रार दाखल केली आहे. 


आरोच्या निविदेवरून दोन गटात  वाद झाल्याची चर्चा आहे. निविदेवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून हाणामारी आणि तोडफोड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे पती नंदू कोरे, कुटुंबातील अन्य आणि जिल्हा परिषद सभापती आणि काही सदस्यांमध्ये वाद झाला.  जिल्हा परिषद अध्यक्षाच्या  निवासस्थानात दारू पिऊन येऊन सभापती आणि काही सदस्यांनी मला आणि माझ्या भावास मारहाण केल्याचा आरोप नंदू कोरे यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या  निवासस्थानाततील खुर्च्या, कुंड्याची देखील तोडफोड करण्यात आली. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.