Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 18 Jan 2022 09:30 PM
मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद

 


मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

कला संचालनालयाकडून घेणाऱ्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या तारखा जाहीर

कला संचालनालयाकडून घेणाऱ्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी इंटरमिजिएट परीक्षा तर 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा घेण्यात येणार आहे 

डॉ. अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड

डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. 4 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे. 

गोव्याहून हावडाकडे निघालेली अमरावती एक्सप्रेस रुळावरून घसरली

गोव्याहून हावडाच्या दिशेने निघालेली अमरावती एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजता घडली. रेल्वेच्या लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.सुदैवाने रेल्वेतील सगळे प्रवासी आणि कर्मचारी यांना कोणतीही इजा झाली नाही. अमरावती एक्सप्रेस इंजिनची पुढील चाके रुळावरून घसरली. चाके रुळावरून घसरल्याचे लोको पायलटच्या ध्यानात येताच त्वरित त्याने रेल्वे थांबवली.त्यामुळे अनर्थ टळला.दूधसागर आणि करंजोल दरम्यान रेल्वे मार्गावर ही घटना घडली.ही रेल्वे सकाळी साडे सहा वाजता वास्कोहून हावडाला निघाली होती.

'नाना पटोलेने समोर यावं, त्याला डांबरी रस्त्यावरच तुडवून काढू', पिंपरीच्या महापौर माई ढोरेंची जीभ घसरली 

नाना पटोले यांच्या मोदी बद्दलच्या व्हायरल व्हिडीओतील वक्तव्याचा पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी समाचार घेतला आहे. 'पंतप्रधान पदाच्या व्यक्तीची नाना पटोलेला किंमत कळत नसेल तर प्रदेशाध्यक्ष करण्याच्या तो लायकीचा नाही. नाना पटोलेने फक्त समोर यावं, डांबरी रस्त्यावर तुडवून त्याला त्याची जागा दाखवू. यासाठी पुरुषांची देखील गरज नाही आम्ही महिलाच त्याला पुरेशा आहोत.' असं ढोरे म्हणाल्या.

आरोपी विशाल फटे याला 10 दिवसांची पोलीस कोठडी

बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणातील आरोपी विशाल फटेला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत त्याला 10 दिवसांची पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे.

साक्री नगरपंचायत मतदान प्रक्रिये दरम्यान 2 गटात हानामारी

साक्री नगरपंचायत मतदान प्रक्रिये दरम्यान 2 गटात हानामारी झाली आहे. मतदार मतदानासाठी आणल्याचा राग येऊन भाजपा च्या पदाधिकाऱ्यास विरोधकांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

फटे स्कॅम प्रकरणातील आरोपी विशाल फटेला बार्शी न्यायालयात हजर

बार्शीतील फटे स्कॅम प्रकरणातील आरोपी विशाल फटेला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आरोपी विशाल फटे याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कोर्टात हजर केले. यावेळी बार्शी कोर्टाबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त देखील होता.

आजी-माजी सैनिकांचे कुटुंबियांसमवेत दरेवाडीत धरणे आंदोलन

आजी-माजी सैनिकांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि गाव गुंडापासून होत असलेल्या त्रासाबाबत दाद मागण्यासाठी सैनिकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत अहमदनगरच्या दरेवाडी येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. 

नारायण राणेंच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते मग नाना पटोलेंच्या वक्तव्यावर का नाही: चंद्रकांत पाटील

 


नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी राज्य सरकारला सवाल विचारला आहे. नारायण राणेच्या वक्तव्यावर कारवाई केली जाते मग नाना पटोलेंच्या वक्तव्यावर का नाही असा सवाल विचारत राज्य सरकारची 'हम करे सो कायदा' ही प्रवृत्ती आहे अशी टीका त्यांनी केली. 

12 आमदारांच्या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली, उर्वरित युक्तिवाद उद्या

12 आमदारांच्या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली आहे. उर्वरित युक्तिवाद उद्या होणार आहे.  आज महाराष्ट्र सरकारने आपला युक्तिवाद पूर्ण केला उद्या निलंबित आमदारांच्या वतीने होणारी प्रतिवाद होणार आहे. 

अनिल देशमुखांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला

अनिल देशमुखांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. डिफॉल्ट जमीनासाठी देशमुखांनी अर्ज दाखल केला होता . विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश आर.एन. रोडके यांच्यापुढे  सुनावणी झाली. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची कोर्टानं वेळेत दखल न घेतल्याचा दावा केला होता . 

शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.  एन. डी. पाटील यांच्या दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार दाखल 


नाना पटोले यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. 

करुणा मुंडे यांच्या औरंगाबाद येथील बैठकीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारली

करुणा धनंजय मुंडे यांच्या औरंगाबाद येथील बैठकीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारली. कोरोनाचं कारण देत नाकारली परवानगी. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आयोजकांनीही मान्य करत कार्यक्रम पुढे ढकलला आहे. 

नाना पटोले यांच्या प्रतिमेला संतप्त भाजप कार्यकर्त्यांकडून पंढरपुरात जोडे मार आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राग मनात धरून आज भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात पटोले यांच्या प्रतिमेला बांगड्यांची माळ घालून जोडे मार आंदोलन केले. यावेळी महिला कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्रीकांत देशमुख, माऊली हळणवर यांच्यासह भाजप पदाधिकारी आज सकाळी मोठ्या संख्येने शिवाजी चौकात जमा झाले. यानंतर नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यास सुरुवात झाली. या आंदोलनानंतर या कार्यकर्त्यांनी पटोले यांची प्रतिमा जाळून आपला संताप व्यक्त केला. 

बीडचे आमदार बाळासाहेब आजबे अपघातातून बालंबाल बचावले





बीड : रात्री शिरूर कासारहून आष्टीकडे येत असताना कल्याण अहमदनगर हायवेवरील हातोला नजीक आमदार बाळासाहेब आजबे यांच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीला अपघात झाला आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने आजबे थोडक्यात बचावले बाळासाहेब आजबे हे प्रचार दौरा आटोपून आष्टीकडे परतत असताना त्यांच्या फॉर्च्युनर गाडीस रानडुक्कर आडवे आल्यानं त्याची जोरदार धडक बसून गाडीच्या डावीकडील भाग तुटला. मात्र चालकाने वेळीच प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला.

 

 





भाजी ए भाजी य्य...तंत्रज्ञानाच्या मदतीने भाजी विकण्याची अनोखी पद्धत, भाजी पाला विक्रेत्यासांठी गॅजेट

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

कोरोना रुग्णसंख्या कमी होईल का? तज्ज्ञ म्हणतात...

Covid Cases in India: मागील चार दिवसापासून कोरोनाच्या रुग्णसंख्यात वाढ होत आहे. दररोज अडीच लाखांच्या पुढेच कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. अशा स्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी रुग्णसंख्येत घटही होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता इथून पुढे कोरोना रुग्णसंख्या कमी कमी होत जाईल का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोनाची उच्चांकी लाट अद्याप आलेली नाही. संसर्गाच्या मागील दोन लाटीप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी कोरोना लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

नाना पटोलेंना 'ते' वक्तव्य भोवणार? भाजप आक्रमक

मोदींबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटू लागलेत. मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो असं वक्तव्य पटोले यांनी भंडाऱ्यात केलं होतं. मात्र वादानंतर  पंतप्रधानांबाबत नव्हे तर एका गावगुंडाबद्दल बोललो असं स्पष्टीकरण पटोले यांनी दिलंय. मात्र या मुद्यावरुन भाजप आक्रमक झालीय. पटोलेंवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत केलीय. तर याच मुद्यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारलाही लक्ष्य केलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जशी कारवाई केली तशी कारवाई पटोलेंवर करावी असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्यामुळे आता पटोलेंवर कारवाई होणार का याकडं लक्ष लागलंय. 

ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांसाठी आज मतदान

Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 


105 नगरपंचायतीपैकी पालघर-तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार-धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, यवतमाळ-झरी-जाणणी, गडचिरोली-मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.  उरलेल्या 95 नगरपंचायतीपैकी माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान होणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 


105 नगरपंचायतीपैकी पालघर-तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार-धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, यवतमाळ-झरी-जाणणी, गडचिरोली-मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.  उरलेल्या 95 नगरपंचायतीपैकी माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान होणार आहे.


ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे 106 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या जागा खुल्या गटात समजल्या जाणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर 27 टक्के जागा या खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या.  21 डिसेबंरला झालेल्या 11 नगरपंचायतीच्या निवडणुका आणि आज होणाऱ्या निवडणुका यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे, 19 जानेवारीला होणार आहे. मतदानाला सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु झालं असून आणि संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान असेल. 


नाना पटोले यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, भाजप आक्रमक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल  करण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.


नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले


भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 



हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.