Rajasthan : राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेसारख्या पवित्र स्थळाला कलंकित करणारे शिक्षक आणि शिक्षिकेचे अनेक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने या दोघांनाही तडकाफडकी निलंबित केले आहे.


अनेक अश्लील व्हिडीओ, कपडे बदलले पण कृती तशीच राहिली 


हायस्कुलच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.या व्हिडिओंमध्ये आरोपी शिक्षक आणि शिक्षिका दोघेही वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत असले तरी त्यांची कृती सारखीच असल्याचे दिसून आले. कधी या कोपऱ्यात कधी त्या कोपऱ्यात ते गैरकृत्य करताना दिसत आहेत. अनेकवेळा ते दुसऱ्या महिला शिक्षिकेच्या आगमनामुळे थांबताना, संकोच करताना दिसले. मात्र, दुसरी शिक्षिका गेल्यानंतर पुन्हा तेच गैरकृत्य करताना दिसले.






व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन


व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाळेच्या कार्यालयात शिक्षक आणि शिक्षिका अश्लील कृत्ये करताना दिसत आहेत. शिक्षण विभागाने जारी केलेल्या निलंबनाच्या पत्रात या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या सत्यतेला दुजोरा मिळाला नसला तरी शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत घटनेचा तपास सुरू केला आहे.


कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली


या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप दिसून येत आहे. शनिवारी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले व पोलीस ठाण्याचे प्रभारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले. शिक्षक व शिक्षिकेला तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली. अशा घटनांमुळे शैक्षणिक वातावरण आणि मुलांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.






शिक्षण विभागाची चौकशी सुरूच आहे


या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या शिक्षक व शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, चौकशीच्या निकालाच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. या घटनेबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे शाळांमधील नैतिकता आणि शिस्तीच्या महत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण मंदिराचे पावित्र्य अबाधित राहावे यासाठी अशा प्रकरणांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या