Maharashtra Breaking News LIVE Updates : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 04 Jan 2022 06:32 PM
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

महाराष्ट्रातील थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं आहे. 

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने घेतले शनी दर्शन

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने शनी दर्शन घेतले आहे. देवस्थानच्या वतीने दोघांचा सत्कारदेखील करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आल्याने शनीशिंगणापूरमध्ये भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. 

सिंधुताई सपकाळ यांची प्रकृती चिंताजनक, गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू

सिंधुताई सपकाळ यांच काही दिवसांपूर्वी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमधे हर्नियाचे ऑपरेशन झाले असुन त्यानंतर त्या गॅलीक्सी हॉस्पिटलला भरती आहेत.  सध्या त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असुन त्यांची परिस्थिती नाजुक आहे.

आर्थिक आरक्षणा संदर्भातल्या क्रीमी लेयर मर्यादेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

आर्थिक आरक्षणा संदर्भातल्या क्रीमी लेयर मर्यादेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच ईडब्ल्यूएस साठी नॉन क्रिमी लेयर मर्यादा 8 लाख रुपयेच राहील असे प्रतिज्ञापत्र दिले आहे.  त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट केंद्राच्या या निर्णयाला मान्यता देतं का हे पाहावे लागेल

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने खळबळ

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने खळबळ. बॉम्बशोध पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय पिंजून काढले , अज्ञाताकडून खोडसाळपणा केल्याचे समोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास. अर्धा तास श्वान पथकाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची झाडाझडती. दूरध्वनीवरून खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू 

पुण्यात गेल्या 24 तासात 1104 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 151 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 1104 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 151 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 512689 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एका कोरनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 3790 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 6819 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रातील वाक्यरचना अत्यंत चुकीची : रामदास आठवले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत वापरलेली वाक्यरचना अत्यंत चुकीची असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मंत्रालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत खात्याच्या मुख्य सचिवांशी बोलणेही झाले आहे. महामानवांच्या  यादीत अण्णाभाऊंचा समावेश करण्याचा निर्णय होणार असल्याचे आठवले म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी ही चुकीची वाक्यरचना लिहिली त्यांनी माफी मागितली पाहिजे असेही आठवले यावेळी म्हणाले.

: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरूवात ; 2 इमारतींचे पाडकाम सुरू

मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरूवात झाली आहे. आजपासून 2 इमारतींचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. 





दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं दिल्लीत विकेंड लॉकडाऊन करण्याचा केजरीवाल सरकारचा निर्णय




'नितेश राणे हेच परब यांच्यावरील हल्याचे मुख्य सूत्रधार', राज्य सरकारचा हायकोर्टात आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी वादाच्या भावर्‍यात आडकलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश राणे हेच परब यांच्यावरील हल्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी पार पडणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, अशी माहिती - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

मुंबई मनपाचे वरातीमागून घोडे, वर्ष सरताना दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 39 कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय

मुंबई महापालिकेचे पुन्हा एकदा वरातीमागून घोडे दिसून आले. कारण दहावीचं वर्ष सरताना विद्यार्थ्यांसाठी टॅब खरेदीचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यासाठी तब्बल 39 कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. मात्र प्रत्यक्षात टॅब मिळेपर्यंत परीक्षाही होऊन गेलेली असणार आहे. मार्च महिन्यात दहावीची बोर्डाची परीक्षा होणार असून येत्या काही दिवसांत पूर्वपरीक्षाही सुरू होणार आहे. तसेच, दहावीचे वर्गही आता संपत आलेले आहेत.

OBC वर माझा फारसा विश्वास नाही : जितेंद्र आव्हाड

मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते. तर लढायला होते ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचंच नसतं. कारण ओबीसींवर ब्राह्मान्य वादाचा पगडा बसला आहे. पण त्यांना हे माहिती नाही की, चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही येऊ दिले जात नव्हते. हे तुम्ही विसरलात. त्यामुळे ओबीसीवर माझा फारसा विश्वास नाही असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.   

शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी

आज शेअर बाजार ने सुरू होताच चांगले संकेत दिले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स २०० अंकांनी तर निफ्टी ६२ अंकांनी वधारला. निफ्टीने 17700 चा टप्पा सुरुवातीच्या काही मिनिटांत ओलांडला. निफ्टीने 17700 चा टप्पा 11 डिसेंबरनंतर पुन्हा ओलांडला आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 97.48 अंक म्हणजे जवळपास 0.16 टक्क्यांनी वधारला. तर, निफ्टी 65 अंकांनी वधारला आणि 17681 अंकावर ट्रेड करत होता. 

ओमयाक्रॉन व्हेरियंटचं निदान करणाऱ्या किटला आयसीएमआरची मंजुरी



...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत

'मुंबईतील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार पोहोचला तर शहरात लॉकडाऊन सारखी कठोर पावलं उचलावी लागतील', असं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. तसेच मुंबईतील दैनंदिन रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचंही याच मुलाखतीत बोलताना इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

गणेश नाईक यांच्या आरोपांचा बाण शिवसेनेच्या वर्मी?

भाजप नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडावरून केलेल्या टीकेनंतर राज्याच्या नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेला मोठा दिलासा दिला आहे. नवी मुंबई शहरातील ५०० चौरस मीटर पेक्षा मोठे असलेले भूखंड सुरक्षित राहणार आहे. 500 चौरस मीटर पेक्षा मोठ्या भूखंडावर महानगर पालिकेने आरक्षण न टाकता त्यावर सिडकोचा अधिकार राहील असा आदेश नगरविकास खात्याने काढला होता. या आदेशाविरोधात न नवी मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. विधीमंडळ अधिवेशनातही या प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

तब्बल 12 तासांच्या तुरुंगवासानंतर आमदार राजू कारमोरे यांची तुरुंगातुन सुटका

तब्बल 12 तासांच्या तुरुंगवासानंतर आमदार राजू कारमोरे यांची तुरुंगातुन सुटका. पोलिसाद्वारे 50 लाख रूपये व सोनसाखळी चोरिच्या भूमिकेवर वर आमदार ठाम आहेत. ते पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार आहेत.





महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांचा संपाचा मागे

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे. सोमवारी संपकरी निवासी डॉक्टरांसोबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांबरोबर व्हिडीओ कन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाल्याने निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला आहे.

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंची हायकोर्टात धाव


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली, ''माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे जाणवत असून स्वत:ला घरी विलगीकरणात ठेवले आहे.'' केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलंय.


पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीच्या कॉकटेल डोसचा परिणाम काय? रुग्णालयाच्या चाचणीत केला मोठा दावा


Coronavirus Precaution देशभरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकार, प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना महासाथीच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून बुस्टर डोस (Precaution) लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याआधीच हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयाने महत्त्वाचा दावा केला आहे.
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशीचा कॉकटेल डोस अधिक प्रभावी ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


हैदराबाद येथील AIG रुग्णालयात झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लशीचा एक-एक डोस Mix&Match पद्धतीने देण्यात आल्यानंतर तब्बल चारपटीने अॅण्टीबॉडी विकसित झाल्या आहेत. रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी म्हटले की, 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या बुस्टर डोस (Precaution) लसीकरण मोहिमेत या कॉकटेल डोसचा वापर केल्यास अधिक फायदा होईल असा दावा करण्यात आला आहे. हे संशोधन ICMR ला सोपवण्यात येणार आहे. 


Corona Vaccination Day-2 : 15+ लसीकरणाचा दुसरा दिवस; पहिल्या दिवशी 40 लाख मुलांना लसीचा डोस, आतापर्यंत 54 लाख जणांचं रजिस्ट्रेशन


Covid Vaccination : देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा दुसरा दिवस आहे. सोमवारी पहिल्या दिवशी जवळपास 40 लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात आली. तर आतापर्यंत 54 लाखांहून अधिक मुलांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केलं आहे की, रात्री 8 वाजता जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 40 लाखांहून अधिक मुलांनी पहिल्या दिवशी कोरोनाची लस घेतली आहे. देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरणाच्या आकड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आनंद व्यक्त केला आणि मुलांचा आत्मविश्वास वाढवला. 


पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "कोविड-19 पासून मुलांचं संरक्षण करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लसीचा डोस घेणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांना शुभेच्छा. त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा. येत्या काही दिवसांत मी सर्व तरुणांना लसीकरण करून घेण्याची विनंती करतो."

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.