Maharashtra Breaking News LIVE Updates: एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
माजी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय एजन्सींचं 'ओएसडी' व्हावं तर सोमय्यांनी 'प्रवक्ता', नवाब मलिकांचा टोला
Nawab Malik Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी ट्वीट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना टोला लगावला आहे. सकाळी ट्वीट करत नवाब मलिक यांनी फडणवीसांचे नाव न घेता म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय एजन्सींना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत आहेत. मी असं सुचवतो की त्यांनी स्वत:ची नियुक्ती ओएसडी म्हणून करावी. त्यांना मुख्यमंत्री म्हणून अशा नियुक्ती करण्याचा भरपूर अनुभव आहे आणि किरीट सोमय्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी, असं मलिकांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut: हिंमत असेल तर 105 आमदारांनी राजीनामे द्यावेत; शिवसेनेचे अमित शाह यांना प्रतिआव्हान
Shivsena Leader Sanjay Raut : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपातील राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिआव्हान दिले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह याच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये असे राऊत यांनी म्हटले.
मुंब्र्यात नायजेरियन ड्रग पेडलरवर पोलिसांची झडप, सोबत 4 अजून पेडलर्सला देखील अटक
तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणाऱ्या इझोबियालो सुंडे या नायजेरियन ड्रग पेडलरला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या महिला साथीदारासह आणि तीन अंमली पदार्थ तस्करांना पोलिसांनी अटक केली असून या सर्वांकडून अंदाजे 20 लाखांचे एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. शमा सय्यद, फिरोज खान, हिदायत अन्सारी, सय्यद अली उर्फ राजू असे अटक करण्यात आलेल्या इतर ड्रग्ज पेडलर्सची नावे आहेत. मुंब्रा येथील खडी मशीन परिसरात काही जण एमडी ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक हर्षद कोळी यांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून इझोबियालो सुंडे याला आणि शमा सय्यद या दुकलीला अटक केली. यासोबतच दुसऱ्या गुन्हयात फिरोज खान, हिदायत अन्सारी, सय्यद अली उर्फ राजू या त्रिकुटाला अटक केली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेट्रो सिटी म्हणून झपाट्याने विकसित होत असलेल्या ठाण्यात तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणारे अनेक ड्रग्ज माफिया आपले बस्तान मांडत असल्याचे याआधीही समोर आले आहे.
एसटी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकारला मान्य
जवळपास 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंना मान्य असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे.
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी जवळपास सहा तासांपासून मंत्रालयात बैठक सुरु
आहे. बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महा व्यवस्थापक माधव काळे , संधटनेचे अजय गुजर उपस्थित आहे.
आकोल्यात मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आज मोसमातील सर्वात किमान तापमानाची नोंद करण्यात आलीय. आज कृषी विद्यापीठात परिसरात 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने पुढचे तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय. यामुळे पोल्ट्री चालक आणि शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवन प्रभावित झालं आहे.
नवाब मलिक चक्रव्यूह मे फसने वाला नही चक्रव्यूह तोडणे वाला आदमी है..- नवाब मलिक
ईडी वाले से नवाब मलिक डरने वाला नहीं....
देशात केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग...
नवाब मलिक चक्रव्यूह मे फसने वाला नही चक्रव्यूह तोडणे वाला आदमी है..-नवाब
अमित शहा यांच्यावर टीका-
पहिले तुम्ही हिंमत दाखवा मग आम्ही दाखवू,आम्ही वचन देतो तुम्ही राजीनामा द्या 105 चा आकडा 55 होईल...
आपण ईडी ला घाबरत नसून प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना देखील वानखेडे नादी लागल्यावर नवाब मलिक यांनी काय करून टाकलं त्यामुळे मालिकांच्या आम्ही नादी लागणार नाही अशी भावना तयार झाली असल्याचे सांगत नवाब मालिकांनी अमित शहा यांना राज्यातील भाजप आमदारांच्या राजीनाम्या बाबत हिंमत दाखवण्याचे आव्हान दिलय,राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या 105 वरून 55 वर येईल असे नवाब मलिक म्हणाले..