Maharashtra Breaking News LIVE Updates: भंडारा जिल्ह्यात सात महिन्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यू
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
चिंता वाढली! ग्रामीण महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, जुन्नरमध्ये सात नवे Omicron रुग्ण
जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या ओमायक्रॉननं ग्रामीण महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण समोर आले आहेत. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशींचे दोन्ही डोस घेतले होते. सातही जण 2 आणि 3 डिसेंबरला यूएईमधून परतले होते. बाधितांच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.
रेशनच्या गहू तांदळाचा काळाबाजार! मुंबईत मोठी कारवाई; आठ ते महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.दहा कोटींचा माल जप्त
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेत आरे कॉलनी परिसरामध्ये आरे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येत असलेल्या रेशनिंगच्या दुकानात वाटल्या जाणाऱ्या गहू, तांदळाचा मोठा साठा करून काळाबाजारी करणारे गोदामावर छापा टाकला. या कारवाईत आठ ते दहा कोटींचा माल जप्त केला असल्याची माहिती आहे. तर 20 लोकांना ताब्यात घेतलं आहे. आरे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की आरे परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाचा रेशनिंगच्या मोठा साठा जमा करून त्या ठिकाणाहून मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काळाबाजार केला जात आहे. याच माहितीच्या अनुषंगाने आरे पोलिसांनी रेशनिंग इंस्पेक्टरला सोबत घेऊन आरेमध्ये असलेल्या एका गोदामामध्ये मध्यरात्री छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी सहा ट्रकसोबत मोठ्या प्रमाणावर गहू तांदूळ जप्त केला आहे.
आरे पोलिसांनी माहिती मिळाली होती की आरे परिसरामध्ये शासनाचा गहू तांदूळ भरलेला सहा ट्रक माल एका खाजगी गाड्यामध्ये भरून विकला जाणार आहे. याच माहितीच्या आधारे आरे कॉल पोलिसांनी छापा टाकून सहा गाड्या जप्त केल्या. सध्या आरे पोलिसांनी रेशनिंगचा सर्व गाड्यांना जप्त करून कारवाई करत आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात घेतले दगडूशेट गणपतीचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात घेतले दगडूशेट गणपतीचे दर्शन, दिवसभरात करणार अनेक विकासकामांचे उद्घाटन.
भंडारा जिल्ह्यात सात महिन्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यू
भंडारा जिल्ह्यात 7 महिन्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यू झालाय. कोरोनाग्रस्त 80 वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. कोरोना दूसरी लाट ओसरत असतांना कोरोनानं मृत्यु झाल्याने भंडारा जिल्हा प्रशासनाची चिंता वाढलीय. ज्यामुळं जिल्ह्यातील कोरोना मृत्युची संख्या 1134 वर पोहचलीय.
यवतमाळमध्ये आक्रोश महामोर्चा काढल्या प्रकरणी 500 मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल
यवतमाळच्या काळी दौलत येथील एका तरुणाच्या हत्येच्या घटनेनंतर मृतकाच्या परिवाराला न्याय आणि आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी पुसद शहरात शुक्रवारी गोर सेनेच्यावतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली होती आणि पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती तरीही जिल्हा प्रशासनाचे आदेश झुगारून हजारोंच्या संख्येने गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुसद येथे एकत्र येऊन मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.
औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीत गॅस सिलेंडरचा स्फोट; दोन जण जखमी
औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी भागातून एक मोठी बातमी समोर येत असून, एका कंपनीच्या बाहेर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. अचानक झालेल्या स्फोटमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाळूज एमआयडीसीच्या गट नंबर एम-१२१ मधील प्रभाकर इंजिनीअरिंग कंपनी समोर दुचाकीला वेल्डींग करताना सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली आहे.
#BreakingNews : सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण येथे ओमायक्रॉनचे तीन रुग्ण, काही दिवसांपूर्वीच परदेशातून आले होते कुटुंब
#BreakingNews : सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, फलटण येथे ओमायक्रॉनचे तीन रुग्ण, काही दिवसांपूर्वीच परदेशातून आले होते कुटुंब