Maharashtra Live Updates 30 July 2022 :उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप, मुंबई उच्च न्यायालयात याचिका
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
उस्मानाबादचे धाराशिव नाव बदलण्यास आक्षेप घेण्यात आला असून या संबंधीची विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आली आहे. शेख इस्माईल मसूद शेख व इतर 16 जणांनी मंत्रिमंडळाच्या 16 जुलै 2022 च्या उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्हा असे नामांतराच्या करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ऍड. सतीश बी. तळेकर यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील दोन शहरांचा प्रामुख्याने नावे बदलण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या या घेतलेल्या दोन्ही निर्णयांना आव्हान देण्यात आलेले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नावाचा विरोध करणारी याचिका यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आली आहे.
याचिकेत अक्षेप काय आहे ?
हा राजकीय हेतूने निर्णय आहे
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केल्याप्रमाणे याअगोदर 1998 साली उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धारशिव करण्यात आले होते. हा निर्णय शासनाने 2001 साली रद्द केला. राज्य शासनाने घेतलेला सदर नामांतर निर्णय हा फक्त राजकीय हेतूने घेतलेला निर्णय आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाच्या विरोधात आहे. फक्त राज्यामध्ये सत्तांतर झाले म्हणून असे नामांतरचे निर्णय घेता येणार नाही. तसेच नामांतराचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात आहे असे याचिकेत नमुद केले आहे.
या जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांनी 16 जुलैचा उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यास अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. सदर याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर सोमवारी 1 ऑगस्ट रोज़ी सुनावणी साठी ठेवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?, असे केदार दिघे म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बाबत केलेले वक्तव्य म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा अवमान, राज्यपालांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
वसई रेल्वे स्टेशनच्या सिनिअर तिकिट तपासकाने रेल्वेमध्ये साप पकडून प्रवाशांचा जीव वाचवला आहे. गुरुवार दिनांक २८ जुलै रोजी ञिवेंद्रम निज्जामुद्दीन या ट्रेन क्रमांक २२६३३ मध्ये कोच क्रमांक एस-५ येथील बोगी क्रमांक १८१३१९ यात केरळवरुनच एक साप ट्रेनमध्ये शिरला होता. माञ तो सापडत नव्हता. गाडी कोजी कोट या रेल्वेस्टेशनवर सुमारे अर्धा तास थांबवण्यात आली होती. माञ तेव्हा ही साप सापडला नाही. सायंकाळी गाडी वसई स्टेशनला आल्यावर एका प्रवाशांने ट्रेनमध्ये साप बघितल्याच सांगितलं. स्टेशन व्यवस्थापक एच.एम. मीना यांनी ट्रेनमध्ये पाहणी केल्यावर, सिनिअर तिकिट तपासक सुरेश कुमार यांनी सापाला सुखरुप बाहेर काढण्याच आश्वासन दिलं. त्यांनी लोखंडी रॉडच्या साहय्यानं सापाल ट्रेनमधून सुरक्षीत बाहेर काढून जंगलात सोडून दिलं. सुरेश कुमार हे बिहार राज्यातील पिरा गांवचे रहिवाशी असून, लहानपणा पासून ते गावात साप पकडत असल्याने त्यांना साप पकडण्याची माहिती होती. त्याचा त्यांना यावेळी उपयोग झाला. साप पकडल्यामुळे ट्रेनमधील प्रवाशांचा जीव भांडयात पडला.
सत्ता संघर्षाच्या लढाईत अस्तित्वात आलेलं सरकार पहिल्या सरकार चे काम रद्द करत हे काही नवीन नाही याच रद्द झालेल्या कामावरून बीड जिल्हा नियोजन समितीने आता कोर्टामध्ये धाव घेतली असून बीड जिल्ह्यातील स्थगिती दिलेल्या 178 कामा संदर्भात सरकारला 5 ऑगस्ट पर्येंत आपलं म्हणणं मांडायचं आहे..
महाराष्ट्रात सध्या खास महिलांच्या विरोधात अपराधांच्या केसेससाठी विशेष कोर्ट स्थापन करावं ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ या नागपूरच्या उमरेड इथे एका अकरा वर्ष मुलीवर एका महिन्याच्या कालावधीमध्ये दहा लोकांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणी भेटी द्यायला आल्या होत्या
बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या भागात सर्व्हे केला आहे. डॉक्टरकडे परदेशातून आलेल्या नातेवाईकामुळे फ्लू ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिरज तालुक्यातील दंडोबा हिल्स आणि खंडेराजुरी परिसरात तासभर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. ढगफुटी सदृश्य पाऊसाने दंडोबा हिल्स परिसरातील ओढे, नाले' विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या. सांगली जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील डफळापुर जवळील कुडनूर या गावी मराठी मुलांची शाळेमध्ये हॅन्ड ग्रँड बॉम्ब सापडला आहे.. शाळेची मुलं बॉल खेळत असताना खिडकीतून आत गेल्याने ते चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले होते.. त्यांना ते नजरेस पडल्यानंतर गावातील नागरिकांना सांगितले.. ही माहिती उपसरपंच गुलाब पांढरे यांना कळाले त्यांनी पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांना सांगितले.. पोलीस पाटील यांनी जत पोलीस यांना कळवल्यानंतर लगेच पोलीस पथक व सांगलीतील बॉम्ब पथक दाखल झाले आहे.. ह्याआधी 2017 ला अशीच घटना कुडनूर मध्ये दोन बॉम्ब सापडले होते.. बॉम्ब पथक आणि सांगली व त्यांची टीम लिओ डॉग हे दाखल झाले होते.. बॉम्ब ताब्यात घेऊन अधिक माहिती घेण्यासाठी सांगलीला रवाना झाले आहेत.. त्यामुळे डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व खळबळ माजली आहे..
बेळगावातील कोल्हापूर सर्कल येथून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोर्चा काढला.मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे आणि फलक घेतले होते.भारत माता की जय,वुई वॉन्ट जस्टिस अशा घोषणा मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्या.प्रवीण नेट्टारू यांची हत्या म्हणजे गृह खात्याचे अपयश आहे.कर्नाटकात काही ठराविक कार्याने प्रेरित होवून कार्य करणाऱ्या व्यक्तींना काही संघटनाच्या कडून लक्ष केले जात आहे असा आरोपही मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केला.पी एफ आय,सी आय एफ आणि एस डी पी आय संघटनाच्यावर बंदी घालण्याची मागणी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पोलीस खात्याला दिलेल्या निवेदनात केली आहे.
बीड पोलिसांनी परळी अंबाजोगाई रोडवर एका हॉटेलमध्ये छापा टाकून त्या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 30 जनावर कारवाई केली असून यामध्ये तब्बल साठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे पंकज कुमावत यांच्या पथकाने ही कारवाई केली असून जुगार खेळणाऱ्यावर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना (Covid19) महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यावर्षीचे सण हे निर्बंधमुक्त असणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. यानुसार, दहीहंडी (Dahi Handi 2022) आणि अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2022) या सणाला सार्वजनिक सुट्टी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल संविधानिक पद, कुणाचाही अवमान होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
31 वर्षापूर्वी म्हणजे 30 जुलै 1991 ला नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मोवाड इथे एक धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनं मोवाडवासीयांना (Mowad) हादरुन सोडलं होतं.
31 वर्षापूर्वी वर्धा नदीनं रौद्ररुप धारण केलं होतं. वर्धा नदीच्या या महापुरात तब्बल 204 गावकऱ्यांना जलसमाधी मिळाली होती. मोवाडसह वर्धा नदीच्या काठावरील 12 गावांसाठी या पुराचा फटका बसला होता. या महापुराला 31 वर्ष पूर्ण झाली असून, अजूनही तेथील अनेक आश्वासने अपूर्ण आहेत.
राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
राज्यपालांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम केलं : उद्धव ठाकरे
'राज्यपालांच्या खुर्चीचा मान खुर्चीत बसणाऱ्यांनी राखला पाहिजे' : उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, राज्यपाल आणि शिंदेगटाबाबत काय बोलणार याची उत्सुक्ता शिगेला
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेत शिवारात बिबट्यांकडून (Leopard) होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नायगाव येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी सावधगिरीचा पवित्रा घेत बिबट्याशी दोन हात करत झुंज दिली. त्यानंतर मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आल्याने बिबट्याने तेथून ठोकली.
लोणावळ्यात गेल्या पंधरा दिवसांत दोन ठिकाणी दोन अपघात झाले. त्यात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे शहराच्या पर्यटन उद्योगाला गालबोट लागलं आहे. आठवडाभरापूर्वी आपटी येथील एका खासगी बंगल्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारे सापडले होते. यापूर्वी लोणावळा आणि परिसरातील खासगी बंगल्यांमध्ये जुगार, सट्टा, पार्ट्या करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकानं अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच पथकानं शुक्रवारी मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचने आंततराष्ट्रीय ड्रग तस्करांचा भांडोफोड केला आहे. अफगाणिस्तान येथून भारतातील पंजाब, दिल्ली यांसारख्या इतर राज्यांमध्ये हेरॉईन तस्करी सुरु होती. पोलिसांनी या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत एका अफगाणी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे.
धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवनाचे उदघाटन संपन्न झालं आहे. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे, गुलाबराव देवकर यांनीही हजेरी लावली.
मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सकाळी सात वाजेपासून सुरू केली असून माहूर तालुक्यातील दत्त मांजरी, खुपटी, वानोला, मांडवा, पाचोंदा या गावातील अतिवृष्टीमुळे शेतपीक जमिनीच्या नुकसानीची पाहणी करत पूढे हद्दगाव तालुक्यातील करमुडी, पिंपरखेड या भागातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.अजित पवार यांच्या समवेत माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ही सारथी बनून त्यांच्यासोबत आहेत.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजस्थानच्या (Rajasthan) एका 16 वर्षीय तरुण गोलंदाजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यामुळे या युवा गोलंदाजाचे नशीब पालटले आहे. व्हिडीओमध्ये हा मुलगा कोणत्याही प्रकारची सुविधा नसतानाही चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तरुण गोलंदाजाचा हा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले. आता या युवा गोलंदाजाचे नशीब पालटले असून शुक्रवारी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी युवा गोलंदाज भरत सिंगची भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
रायगडमधील उरण येथील गोडाऊनमध्ये आढळला गव्हाचा साठा... जासई येथील गोदामामध्ये आढळला गव्हाचा मोठा साठा... गोडाऊनमध्ये आढळल्या गव्हाच्या शेकडो गोणी... उरण तहसील पथक करणार गोणींची शहानिशा, पोलीसांनी तहसील विभागाला दिली घटनेची माहिती... अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही...
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रेल्वेच्या इंजिनांचे भाग तयार करणारी एक इंजिनिअरिंग कंपनी आहे. या कंपनीत पीडित महिला ही गेल्या सहा वर्षांपासून कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते. या महिलेचा तिच्या ऑफिसमध्ये इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या दोघांनी अश्लील शेरेबाजी करणे, शरीराला चुकीचा स्पर्श करणे, बदनामी करणे अशा पद्धतीने छळ केल्याचा आरोप या महिलेने केलाय.
देशात एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतोय, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूही डोकं वर काढताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत 20 हजार 408 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 20 हजार 409 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 32 रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात 20 हजार 958 कोरोनारुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
30th July 2022 Important Events : जुलै महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 30 जुलै. संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 30 जुलैचे दिनविशेष.
30 जुलै : International Friendship Day
संपूर्ण जगभरात विविध देशांत विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. 27 एप्रिल 2011 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेत 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा प्रस्ताव अधिकृतरित्या संमत करण्यात आला. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.
1962 : ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा सुमारे 8,030 किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
1994 : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्या हे गाजलेले साहित्य आहे. (जन्म: 8 ऑगस्ट 1926)
सन 1909 साली अमेरिकन वैमानिक आणि शास्त्रज्ञ राईट बंधू (Wright brothers) यांनी सैन्यांसाठी पहिले विमान तयार केले.
सन 1928 साली पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :
- Important Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
- 28th July 2022 Important Events : 28 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
- 29th July 2022 Important Events : 29 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -