Maharashtra Weather:राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून सध्या श्रिलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. परिणामी तापमानात बदल होत असून राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान होते. गारठा कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात 1-3 अंशांनी घट झाली आहे. दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचं सांगितलंय. (IMD Forecast)


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वारे  राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. याचा परिणाम राज्याच्या तापमानावर होत असून गेल्या काही दिवसात होणारा तापमानातला चढउतार हे यामागचे कारण आहे.


हवामान अंदाज काय?


राज्यात  येत्या 24 तासांत पुढील तीन दिवसांसाठी तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. महाराष्ट्रात येत्या 3 दिवसात किमान तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. 2-3 अंशांनी राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान वाढेल. त्यानंतर त्यापुढील दोन दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही. असं हवामान विभागानं सांगितलंय. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा उतरलेला होता. अनेक भागात तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले जात हेाते. तापमानाच्या चढउताराने सध्या नागरिक सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाने हैराण आहेत. कमाल तापमान चढेच आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. आता गारठा कमी होणार असून 2-3 अंशांनी तापमानात वाढ होणार आहे.


आज तापमानाचा पारा किती?


छ. संभाजीनगर 16 अंश
पुणे- 15-17
जळगाव- 12.8
कोल्हापूर- 15.8
मुंबई कोलाबा- 21.4
सांताक्रूझ- 18.1
नाशिक- 11.9
परभणी- 11.7
रत्नागिरी 20.3
सातारा- 14.6


हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 3-4 दिवस राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात कोरड्या वाऱ्यांचा जोर कायम राहणार आहे. सध्या सकाळचा गारवा आणि दुपारचं ऊन नागरिकांना जाणवू लागलं आहे. येत्या दोन दिवसांत थंडी थोडी वाढेल, पण त्यानंतर हळूहळू तापमान वाढू लागेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान तापमानात घट होत असली, तरी कमाल तापमान वाढल्यामुळे सकाळच्या गारव्यानंतर दुपारी उन्हाचा चटका सहन करावा लागतोय.


हेही वाचा:


मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर