Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागातील इमारत कोसळली

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 03 Feb 2022 11:50 PM
पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर येथील इमारत कोसळली

पुण्यातील येरवड्यातील शास्त्रीनगर भागात लेन नंबर आठमधे एक रहिवाशी इमारत कोसळली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यू झालाअसून अनेकजण जखमी आहेत.

लोकसभेत सुजय विखे आणि सुप्रिया सुळे यांची जोरदार जुगलबंदी...

सहकाराबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर टीका केली...


त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्यात.. यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते... हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते...


खाल्ल्या मिठाला जागावं.. माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे..

बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बंडातात्या कराडकरांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे, मास्क बाबत वेगळी चिथावणी देणे या कलमांखाली बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कल्याण - म्हारळ गावातील बियर शॉपसह दूध डेअरीमध्येही चोरट्यांचा डल्ला

कल्याण तालुक्यातील म्हारळ गावातील  बियर शॉप व शेजारी असलेल्या दूध डेरीमध्ये चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना घडली  आहे. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत .याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. म्हारळ  गावातील नाक्यावरच मयुरेश्वर बियर शॉप व त्याच्या शेजारी बालाजी डेअरी दूध विक्रीचे दुकान आहे. काल पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटयांनी आधी बियर शॉपचे शटर उचकटून शॉपमधील रोकडचा गल्ला व बियरचा बॉक्स लंपास केला.चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तसेच शेजारी असलेल्या बालाजी डेअरीचे शटर फोडून त्या डेअरीतील गल्ल्यात असलेली 26 हजारांची रोकड लंपास केली आहे.

आयुक्तांचे स्वच्छता पाहणी अभियान

आझादीच्या 75 व्या अमृत महोत्सव आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत ठाणे महापालिका हद्दीतीतील आनंद नगर टोल नाका ते तीन हात नाका पर्यंत ठाणे महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या ठिकाणी मोठी वाहतूक वर्दळ रस्ता असून इथे अश्या प्रकारची स्वच्छता मोहीम घेणे मोठे आव्हान असल्याने इथे स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याच स्वच्छता मोहिमेची आज ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी पाहणी केली. ही स्वच्छता मोहीम अशाचप्रकारे ठाण्यातील इतर वर्दळीच्या ठिकाणी देखील सुरू करून दिवा मुंब्रा अशा भागात देखील स्वच्छता करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे तसेच शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनरचा मोठा त्रास होत असून असे अनधिकृत बॅनर देखील महापालिकेकडून काढण्यात येणार आहेत.

केजरीवाल ही भाजपची B टीम, काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला

अरविंद केजरीवाल हा एक (imposter) बहरुपीया आहे. अरविंद केजरीवाल ही भाजपची B टीम आहे. जिथे जिथे भाजप निवडणूक हरणार असते तिथे भाजप अरविंद केजरीवालला उभ करते. गोवाची जनता अरविंद केजरीवालला ओळखून आहे. 


गोवा भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. स्वःता मुख्यमंत्री प्रमोद सावंत वर भ्रष्टाचाराचे आरोप तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली तर मलिक यांना हलवले गेलं पण प्रोमद सावंत मुख्यमंत्री पदावरच राहिले. हा आहे खरा भाजपचा चेहरा.. 

माजी खासदार गजानन बाबर अनंतात विलीन

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर अनंतात विलीन झाले. पोटाच्या विकाराचे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 78 वर्षाचे होते. निगडीच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. 1974 साली बाबरांनी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापित केली. महापालिकेत तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडून आले होते. साताऱ्यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ते सलग पंधरा वर्षे उपाध्यक्ष होते. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय नव्हते. अशातच त्यांना पोटाच्या विकार जडला आणि त्यांचं निधन झालं.

पुण्यातील भिडे बाबा पूल पाडला जाणार

पुण्यातील बाबा भिडे पूल पाडला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने  मूळ मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाडून नवीन उंचीचा पूल बांधण्यात  येणार आहे.  नदीपात्रातील रस्ता देखील होणार बंद होणार आहे. गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील मुळा मुठा नदीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी 4 हजार 727 कोटी खर्च केले जाणार आहेत. बाबा भिडे पुलासह सर्व कॉजवे काढावे लागणार, त्यामुळे नदीपात्रातील रस्ते बंद होणार आहेत. त्यामुळे आता परिसरातील रस्त्यावर वाहतुकीचा ताण निर्माण होऊ शकतो. 

सातवा वेतन आयोग आणि इतर विविध मागण्यांसाठी परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

पुणे महानगरपालिकेच्या (PMPML) महानगर परिवहन महामंडळातील शेकडो कर्मचारी आज रस्त्यावर उतरले आहेत. सातवा वेतन आयोग आणि इतर विविध मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिकेसमोर आंदोलन सुरू केले. शेकडोंच्या संख्येने एकत्र आलेले हे कर्मचारी पुणे महानगरपालिकेला घेराव घालून आंदोलन करणार आहेत.

दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार, चार मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार ऑफलाईन परीक्षा





ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील घरी आणण्यात आले आहे

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे पार्थिव त्यांच्या जुहू येथील घरी आणण्यात आले आहे. पार्थिव थोड्याच वेळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी दोनच्या सुमारास विलेपार्ले पूर्व परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणलं

नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणलं, कणकवली पोलिसांकडून राणे यांची चौकशी सुरू 

तेल्हारा तालूक्यातील पंचगव्हाण फाट्यावर 15 लाखांच्या बनावट नोटा जप्त

तेल्हारा तालूक्यातील पंचगव्हाण फाट्यावर 15 लाखांच्या बनावट नोटा जप्त. तेल्हारा पोलिसांची आज पहाटेची कारवाई. दोन आरोपी अटकेत. दोनपैकी एक आरोपी वाशिम जिल्ह्यातील मानोराचा. तर दुसरा आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचा. जिल्ह्यातील बनावट नोटांचं रॅकेट समोर येण्याची शक्यता.

BMC Budget 2022 : मुंबईकरांना काय मिळणार?

BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचं बजेट आज ऑनलाईन सादर होणार आहे. त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला काय गिफ्ट मिळणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन कोणतीही नवी करवाढ किंवा शुल्कवाढ न करण्याकडे सत्ताधारी शिवसेनेचा कल असणार आहे. तसंच मुंबईकर मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांचीही घोषणा होणार असल्याचं समजतं. खड्डेमुक्त रस्ते, सक्षम आरोग्य यंत्रणा, पूरमुक्त मुंबई यासाठी यंदाच्या अर्थसंकल्प तरतूद केली जाणार असल्याचं कळतंय. 


निवडणुकीच्या तोंडावर आज आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजही मुंबई महापालिकेचे ऑनलाईन बजेट सादर होणार आहे. यंदाच्या वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात 3 हजार कोटींपर्यंतची वाढ होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, आशियातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेचं बजेट काय असणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काय असणार? करवाढ, शुल्कवाढ होणार का? मुंबईत कोणत्या प्रकल्पांवर सत्ताधाऱ्यांचा कल असेल? याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.  


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Nashik Manmad : शेंडी डोंगरावरून तीन गिर्यारोहक दरीत कोसळले, दोघांचा मृत्यू तर एक जखमी

Narayan Rane to meet Nitesh Rane : नारायण राणे आज कणकवलीत दाखल होण्याची शक्यता

बदली, बदला, बदनामी! अनिल देशमुख आणि परमबीर सिंहांचे नवे गौप्यस्फोट

बदली, बदला, बदनामी! पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल परब यादी पाठवायचे, ईडीसमोर अनिल देशमुखांचा जबाब, तर सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्र्यांचा दबाव, परमबीर सिंहांचा ईडीला जबाब 


वाचा सविस्तर :


रश्मी शुक्लांच्या अहवालानंतर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राला डीजीपींनी उत्तर दिलं नाही : सीताराम कुंटे

कोरोनापासून बचाव करण्यासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा पुरवठा सुरू

कोरोनापासून बचाव करण्यासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा पुरवठा सुरू झाला आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये या लशीचं वितरण होणार आहे.  विशेष बाब म्हणजे ही लस सुईमुक्त आहे, म्हणजेच ती घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुई टोचण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र, आतापर्यंत बाजारात आलेल्या इतर कोरोना लसींप्रमाणे या लशीचे दोन नव्हे तर तीन डोस घ्यावे लागतील.  अशी ही जगातील पहिली लस आहे, जी डीएनए आधारित आणि सुईमुक्त आहे. कंपनी लवकरच ही लस खुल्या बाजारातही मेडिकल स्टोअरमध्ये विक्रीसाठी आणणार आहे. त्याची किंमत 265 रुपये ठेवण्यात आली आहे, तर अ‍ॅप्लिकेटर म्हणजेच ही लस घेण्यासाठी उपकरण 93 रुपयांना स्वतंत्रपणे खरेदी करावी लागेल. अशा प्रकारे, त्याची एकूण किंमत 358 रुपये असेल. सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब आणि झारखंड या सात राज्यांना लशीचा पुरवठा करण्यात येणार आहे. 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ही लस आहे.

14 फेब्रुवारी पासून एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2021 सुरु करण्याच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सूचना

14 फेब्रुवारी पासून एमबीबीएस अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2021 सुरु करण्याच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सूचना

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्याचा आढावा घेण्यासाठी पाहा फक्त एबीपी माझा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, आठ खेळाडू कोरोनाबाधित

वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. कारण भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंसह एकूण आठ जणांना कोरोना झाल्याची माहिती मिळतेय. या सगळ्यांना तातडीनं विलगीकरणात हलवण्यात आलंय. या खेळाडूंमध्ये शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यरचा समावेश आहे. त्यामुळे आगामी मालिका पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे. 

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन, आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार

बुलेटीनच्या सुरुवातीला एक दु:खद बातमी... ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं निधन झालंय..हृदयविकाराच्या झटक्यानं वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी चित्रपटसृष्टीत नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारुन त्यांनी एक काळ गाजवला होता. रमेश देव यांच्या निधनामुळं फिल्मी दुनियेतला सुसंस्कृत राजकुमार काळाच्या पडद्याआड गेलाय. आज दुपारी 3 वाजता रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रमेश देव हे चित्रपटसृष्टीतील राजबिंडं व्यक्तिमत्व होतं. आलिया भोगाशी सिनेमाच्या वेळी रमेश देव आणि सीमा देव एकत्र आले आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले 1953 साली दोघांनी लग्न केलं.  मराठी चित्रपटातला खलनायकही रुबाबदार असू शकतो हे रमेश देव यांनी दाखवून दिलं होतं. रमेश देव यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावरही घेतल्या होत्या. 

भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी  देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नितेश राणे कणकवली कोर्टासमोर शरण आले. कोर्टानं नितेश राणेंना पहिल्यांदा न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर  सरकारी वकिलांनी राणेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली. नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या मोबाईलवरून आमदार नितेश राणे यांचं आरोपींशी संभाषण झाल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला. यासाठी आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे असा युक्तिवाद सरकारी अँड वकील प्रदीप घरत यांनी केला. त्यानंतर नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


भारताची अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव


भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलं. शेख रशिदनं 94 धावांची खेळी करून त्याला छान साथ दिली. धुल आणि रशीदनं तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली. त्यामुळं भारताला 50 षटकांत पाच बाद 290 धावांची मजल मारता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांत गुंडाळला. भारताकडून विकी ओस्तवालनं तीन आणि निशांत संधूनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.


ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या  मनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत अभिनेता रमेश देव यांचे निधन झाले आहे . हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.  रमेश देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली. रमेश देव यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, मुलगा अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  मुंबईतील कोकिळाबेन  रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसी  वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.


रमेश देव अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929  कोल्हापुर, महाराष्ट्रात झाला. 'आनंद' या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. 1956  साली रमेश देव यांनी 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर 'आरती' हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.  रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी 'पैशाचा पाऊस' आणि 'भाग्यलक्ष्मी' या चित्रपटांत काम केले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.