Maharashtra Breaking News 21 April 2022 : गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचा-यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Apr 2022 08:29 PM
अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला एनसीबीने घेतलं ताब्यात

अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिचा भाऊ अ‍ॅगिसियालोस डेमेट्रिएड्स याला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. एनसीबीने बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ अगिसिलाओस डेमेट्रिएड्स विरुद्ध PITNDPS (अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांमधील अवैध वाहतूक प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आगिसिलाओस डेमेट्रिएड्स या दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे

मिटकरी यांच्या बद्दल बोलण म्हणजे आम्हाला लाजल्या सारख होतं, मूर्खाबद्दल काय बोलणार - राजू पाटील

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या पाठोपाठ सांगली येथे झालेल्या सभेत त्यांनी ब्राह्मण समाजावर टीका केल्याचा आरोप होतोय .याबाबत मनसे आमदार राजू पाटील मिटकरी यांच्या बद्दल बोलण म्हणजे आम्हाला लाजल्या सारख होतं, मूर्खाबद्दल काय बोलणार? असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरिना लगावला .आमदार राजू पाटील आज कल्याण ग्रामीण भागात सुरू झालेले लोडशेडिंग,वीज बिल सोबत आलेली डिपॉझिटची बिले आदी समस्यांबाबत महावीतरन अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी ग्रामीण भागाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर शहरात देखील एक दिवस एक प्रभाग अशी योजना सुरू करा जेणे करून नागरिकांच्या समस्या मार्गी लागतील अशी मागणी केली . 

13 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू; दोन कुटुंबाच्या संसारोपयोगी साहित्याचीही राखरांगोळी

Wardha: सेलू तालुक्यात शेतातील गोठ्याला शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत 13 बकऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी स्टेशन येथे घडली. या दुर्घटनेत शेती साहित्यासह तेथे वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबाच्या संसारोपयोगी साहित्याचीही राखरांगोळी झाल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची दुर्दैवी वेळ आली.

Gadchiroli : चार जहाल नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई 

नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश मिळाले आहे. एकुण 18 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षल्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन एसीएम आणि दोन सदस्यांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात पोलिसांनी धडक कारवाई केली. नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. 


अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं
1) बापू ऊर्फ रामजी दोघे वड्डे, वय 30 वर्षे, रा. नेलगुंडा, ता. भामरागड 
२) मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावडे, वय 34 वर्षे, रा. कनेली, ता. धानोरा 
३) सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी, वय 24 वर्षे, पडतमपल्ली, ता. भामरागड 
४) अजित ऊर्फ भरत, रा. झारेवाडा, ता.एटापल्ली, जि. गडचिरोली 

ST Protest :  गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचा-यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी

ST Protest :  गुणरत्न सदावर्तेंसह 115 एसटी कर्मचा-यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी होणार सुनावणी आहे.  गुरूवारी वेळेअभावी सुनावणी  झाली नाही

Uday Samant : परशुराम घाटाच वाहतूक सुरूच; मंत्र्यांच्या निर्णयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना नाहीत

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण जवळचा परशुराम घाट चौपदरीकरणाच्या कामासाठी बंद ठेवण्याच्या निर्णयाबाबत मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यात विसंगता असल्याचं दिसून येतंय. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घाट वाहतुकीसाठी दुपारी 12 ते 5 या वेळेत 20 तारखेपासून बंद ठेवला जाईल असे जाहीर पणे सांगितलें होते. मंत्र्यांच्या या निर्णयाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून घाट बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना आलेल्या नाहीत.सध्या घाटातील वाहतूक सुरुच आहे.

Ganesh Naik : गणेश नाईक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, अटकपूर्व जामीन नाकारला

Ganesh Naik : गणेश नाईक यांचा आज अटकपूर्व जामीन नाकारला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस गुप्ता यांच्या समोर  सुनावणी झाली. 27 तारखेला अंतरिम जामीनावर सुनावणी होणार आहे.

BEST Strike : वडाळा, कुर्ला, वांद्रे डेपोतील कंत्राटी बेस्ट बस चालकांचा संप मागे

BEST Strike : भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले होते. परंतु बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन बस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. सदर कंपनीविरुद्ध कंत्राटामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.

 Palghar Fire :  बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला भीषण आग

 Palghar Fire :  बोईसर येथील तारापूर औद्योगिक वसाहतीतील कॅम्लीन नाका परिसरातील केंबोंड केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.  अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून दुर्घटनेत कंपनी प्रोडक्शन मॅनेजर धुळेश पाटील यांचा मृत्यू तर इतर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती दिली आहे. जखमींवर बोईसर येथील तुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Dhananjay Munde News Updates : धनंजय मुंडे प्रकरणातील आरोपी महिला रेणू शर्माला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

Dhananjay Munde News Updates : धनंजय मुंडे प्रकरणातील आरोपी महिला रेणू शर्माला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी


मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

मशीद आणि अन्य धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेकडून सुप्रीम कोर्टात याचिका
मशीद आणि अन्य धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीसाठी अखिल भारत हिंदू महासभेनं सुप्रीम कोर्टात याचिका केली आहे. त्यात म्हटलं आहे की, इस्लामच्या सुरुवातीला लाऊडस्पीकर नव्हता. अनेक देशांनी लाऊडस्पीकरवरुन अजान देण्यावर बंदी आणली आहे, असं म्हटलं आहे. सोबतच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वैधतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.  



अबू सालेमच्या याचिकेवरील केंद्राच्या प्रतिसादावर सर्वोच्च न्यायालय नाराज, पुढील सुनावणी 5 मे रोजी

अबू सालेमच्या याचिकेवरील केंद्राच्या प्रतिसादावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे





Beed News : सहनशीलता संपली आणि तक्रार दिली : मंत्री धनंजय मुंडे

Beed News : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत एका महिलेनं पाच कोटींची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणात मुंबईच्या पोलीस ठाण्यात इंदूरच्या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत गेली दीड-दोन वर्षांपासून हा त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरोधात केली, ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसांपासून त्रास होतोय. तो सहन करतो अखेर शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षांसह 11 जणांचे राजीनामे

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सह 11 जणांचे राजीनामे...


पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती... युवा स्वाभिमान पार्टी आपल्या विचारधारेला विसरून दुसऱ्याच मार्गाने जात आहे त्यामुळे आम्ही राजीनामे देत आहोत...


अय्युब खान मुस्तबा खान, युवा स्वाभिमान पार्टी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यांची माहिती..

दादा भुसे  यांचे भाषण सुरु असताना कोसळला मंडप, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील घटना 

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात कृषी महाविद्यालयाच्या  उद्घाटन सोहळ्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे आले होते. या सोहळ्यात दादा भुसे यांचे भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात हवा आली आणि त्यामुळे स्टेजच्या डाव्या बाजूला असालेला मंडप कोसळला. सुदैवाने त्या मंडपाखाली कोणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भाषण दरम्यान मंडप उडाल्याने नागरिक घाबरले होते. परंतू कृषिमंत्र्यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला.

सदावर्ते यांनी वक्तव्यं केल्यानंतर जातीय तेढ निर्माण झाला नाही. जे काही बोलले ते माध्यमांमध्ये आहे - पीटर बारदेस्कर, सदावर्ते यांचे वकील

सदावर्ते यांनी वक्तव्यं केल्यानंतर जातीय तेढ निर्माण झाला नाही. जे काही बोलले ते माध्यमांमध्ये आहे. त्यासाठी पोलिस कोठडी कशाला? यात रिकव्हर करायचं असेल तर पोलिस कोठडी देणं अपेक्षित होतं. मात्र इथं तसं काहीच नाही- पीटर बारदेस्कर, सदावर्ते यांचे वकील

Gunratna Sadavarte Updates : सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केली - फिर्यादीचे वकील शिवाजीराव राणे

Gunratna Sadavarte Updates : सदावर्ते यांनी वारंवार मराठा समाज आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. या मागे आणखी कोण आहेत .कुणाच्या साथीने ते अशी वक्तव्यं करतात याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक- फिर्यादीचे वकील शिवाजीराव राणे

Ganesh Naik : गणेश नाईकांकडून अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव

गुणरत्न सदावर्ते यांना व्ही पी  गायकवाड यांच्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार

ऍड गुणरत्न सदावर्ते यांना व्ही पी  गायकवाड यांच्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार


सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे आणि फिर्यादीच्या वतीने अॅड शिवाजीराव राणे बाजू मांडणार 


तर सदावर्तेच्या बाजूने पीटर बारदेस्कर युक्तिवाद करणार

Mumbai Fire : खार वेस्ट गुरू गणेश्वर मार्ग  येथील नॉथन व्हीला इमारतीच्या 4 थ्या मजल्यावर आग

Mumbai Fire : खार वेस्ट गुरू गणेश्वर मार्ग  येथील नॉथन व्हीला इमारतीच्या 4 थ्या मजल्यावर आग
- तळ अधिक सात मजली इमारत
- लेव्हल 2 ची आग
- घटनास्थळी 8 फायर इंजिन, 4 जंबो टँकर, 3 अँबुलन्स दाखल
- आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
- अद्याप आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती

पाच-सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत एकाची हत्या, औरंगाबाद टिव्ही सेंटर शताब्दीनगर भागातील घटना

पाच ते सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी तुडवत एकाची हत्या, औरंगाबाद टिव्ही सेंटर शताब्दीनगर भागातील घटना. मध्यरात्रीची घटना. मनोज शेषराव आव्हाड असं मृत तरुणाचं नाव .एका माजी नगरसेवकाच्या लॉनवर तो काम करत होता. का मारहाण केली यासंदर्भातलं कारण कळू शकलं नाही.

Nashik News : नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात आईचा मृत्यू, मुलगी जखमी

नाशिकमध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात आईचा मृत्यू झालाय तर मुलगी जखमी झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सातपूर परिसरातील अशोकनगरच्या सरोदे संकुलमध्ये अर्चना सिंह या बुधवारी रात्री आपल्या घरी स्वयंपाक करत असतांनाच गॅसनळी मधून लिकेज होणाऱ्या गॅसचा अचानक स्फोट झाला आणि घरात आगीचा भडका उडला. या घटनेत गंभीररित्या भाजल्याने अर्चना यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होण्यापूर्वीच मृत्यू झाला तर यावेळी घरात असलेली अर्चना यांची १६ वर्षीय मुलगी आस्था ही जवळपास २० टक्के भाजली असून तिच्यावर जवळीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सातपूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.      

Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्ते यांना थोड्याच वेळात कोर्टासमोर सादर केले जाणार, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

गुणरत्न सदावर्ते यांना थोड्याच वेळात कोर्टासमोर सादर केले जाणार 


कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त


दुपारनंतर गर्दी होण्याच्या शक्यतेने पोलिसांची खबरदारी


कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हालचालींना वेग 


कोल्हापूर शहरातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बंदोबस्तात ठेवले

कोल्हापुरातील एसटीचे 80 टक्के कर्मचारी पुन्हा कामावर रुजू

कोल्हापूर जिल्ह्यातील एसटीचे 80 टक्के कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून संपामुळे बंद असलेली लालपरीची सेवा पूर्ववत झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हजारो कर्मचारी पुन्हा एकदा सेवेत आले आहेत.

सिंधुदुर्ग : वातावरणातील बदलामुळे चिपी विमानतळावर येणाऱ्या विमानांच्या वेळेत बदल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला सुद्धा वातावरणाचा फटका बसत आहे. वातावरणातील बदलामुळे चिपी विमानतळावरील येणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. पावसाळ्यात चिपी विमानतळाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण सिंधुदुर्गात पडणारा पाऊस, वातावरणात होणारे बदल, दाट धुकं यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे चिपी विमानतळावर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस मुंबईहून सकाळी ७.४० वा. अलायन्स एअरचे विमान सुटून ९.५५ ला चिपी विमानतळावर लॅन्डिंग होणार आहे. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार हे चार दिवस मुंबईहून १२ वा. टेक ऑफ घेतलेले विमान चिपी विमानतळावर १.२५ ला लॅन्डिंग होऊन पुन्हा १.५० ला मुंबईकडे जाण्यासाठी टेक ऑफ घेणार आहे. 

वडाळा, कुर्ला, बांद्रा बेस्ट डेपोतील भाडेतत्वावरील बेस्ट बस चालकांचा संप, दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालयमार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद, रुग्णांचे हाल

वडाळा, कुर्ला, बांद्रा बेस्ट डेपोतील भाडेतत्वावरील बेस्ट बस चालकांचा संप, दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालयमार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद, रुग्णांचे हाल


भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या  कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले. 


बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली ...


तसेच, बेस्ट प्रशासन बेस्टचे इतर नियमीत कामगार नेमून बेस्ट बस सेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात आहेत...

नंदूरबार जिल्ह्यातील दोनशे वर्ष जुन्या सद्गुरु तोताराम महाराज मंदिराला आग

Nandurbar Fire : नंदूरबारमधील दोनशे वर्ष जुन्या सद्गुरु तोताराम महाराज मंदिराला आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आगीत मंदिराचा दुसरा मजला जळून खाक झाला आहे. नंदुरबार आणि शाहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दल आणि गावकऱ्यांनी एका तासाच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही.

Palghar fire : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कंपनीत स्फोट,  केंबोंड केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

Palghar fire : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कंपनीत स्फोट,  केंबोंड केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

Share Market News : बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सची 430 अंकांची मुसंडी

पोलिसांच्या बदल्यांबाबत गृहखात्याचा अजब कारभार, पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अवघ्या 12 तासांत स्थगिती

ब्राह्मण महासंघाचं आज  राष्ट्रवादीच्या कार्यालय बाहेर सकाळी 11 वाजता आंदोलन

ब्राह्मण महासंघाचं आज  राष्ट्रवादीच्या कार्यालय बाहेर सकाळी 11 वाजता आंदोलन, अमोल मिटकरी यांच्या बेलगाम वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाच्या वतीने आज गुरुवार सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आपण निषेध व्यक्त करणार

Raigad News : कर्जत इथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक, 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दहा तरुणांना अटक

Raigad News : कर्जत इथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक, 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दहा तरुणांना अटक, सोशल माीडियातून झालेली ओळख पडली महागात

Breaking News : मंत्री धनंजय मुंडे यांची महिलेविरुद्ध पोलिसांत खंडणीची तक्रार, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन मध्यरात्री कोल्हापूर पोलीस कोल्हापुरात दाखल, आज कोर्टात सादर करणार

Nashik News : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली

Nashik News : नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली करण्यात आली आहे. दीपक पांडे आता महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार आहे. जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे.  लेटरबॉम्ब आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे पांडे हे कायम चर्चेत होते. काही दिवसांपूर्वी पांडे यांनी बदलीसाठी  विनंती अर्ज केला होता.  तर पिंपरी चिंचवडचे आयुक्त कृष्णप्रकाश यांची व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे.  अंकुश शिंदे आता पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त असणार आहे. 

Maharashtra Congress : काँग्रेस प्रभारी एच. के पाटील यांचा आज मुंबई दौरा

Congress : सह्याद्रीवर झालेल्या कॉग्रेस मंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीनंतर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के पाटील आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा मुंबई दौरा येत्या 28 एप्रिलला नियोजित आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि मंत्र्यांची भेट घेतील. 22 एप्रिलला एच के पाटील मुंबईत येत आहेत. यावेळी दिल्लीत हायकमांडकडे काँग्रेस आमदारांची नाराजी, अंतर्गत ताळमेळ, जिल्हास्तरीय जनता दरबार, कॉग्रेस मंत्र्यांची कॅबिनेटमधील आक्रमक भूमिका याविषयांवर खल होण्याची शक्यता आहे. तसंच राहुल गांधांच्या मुंबई दौऱ्यात राहुल गांधी कोणा कोणाला भेटणार याचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणात एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्याचं न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी निश्चित केलं आहे. तसेच याच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावरही गुरूवारी एकत्रित सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. या सर्वांच्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी बुधवारी राज्य सरकारनं कोर्टाकडे वेळ मागून घेतला.

Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरीत ऑपरेशन बुलडोझर सुरु राहणार? आज सुनावणी

Jahangirpuri Demolition Drive : दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) पुन्हा बुलडोझर चालणार का, याचा निर्णय आज येऊ शकतो. एमसीडीच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर एमसीडीनं येथील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवला, ज्यामुळे बराच गदारोळ झाला आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. आता सुप्रीम कोर्टाचे कोणते खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी करणार आहे हे देखील सांगण्यात आलेलं आहे.


सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठासमोर जहांगीरपुरीतील अतिक्रमणविरोधी मोहिमेची सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भात अनेक याचिकाकर्त्यांनी सुनावणीची मागणी केली होती. यासोबतच अनेक भाजपशासित राज्यांमध्ये सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या याचिकेवरही सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी 


शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणात एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी घेण्याचं न्यायाधीश आर.एम. सादराणी यांनी निश्चित केलं आहे. तसेच याच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 115 एसटी कामगारांच्या जामीन अर्जावरही गुरूवारी एकत्रित सुनावणी घेण्याचं कोर्टानं निश्चित केलं आहे. या सर्वांच्य जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी बुधवारी राज्य सरकारनं कोर्टाकडे वेळ मागून घेतला.


काँग्रेस प्रभारी एच. के पाटील यांचा आज मुंबई दौरा 


सह्याद्रीवर झालेल्या कॉग्रेस मंत्र्यांच्या डिनर डिप्लोमसीनंतर आता महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी एच. के पाटील आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा मुंबई दौरा येत्या 28 एप्रिलला नियोजित आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र कॉग्रेस प्रभारी महाराष्ट्रातील कॉग्रेस नेते आणि मंत्र्यांची भेट घेतील. 22 एप्रिलला एच के पाटील मुंबईत येत आहेत. यावेळी दिल्लीत हायकमांडकडे कॉग्रेस आमदारांची नाराजी, अंतर्गत ताळमेळ, जिल्हास्तरीय जनता दरबार, कॉग्रेस मंत्र्यांची कॅबिनेटमधील आक्रमक भूमिका याविषयांवर  खल होण्याची शक्यता आहे. तसंच राहुल गांधांच्या मुंबई दौऱ्यात राहुल गांधी कोणा कोणाला भेटणार याचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.


जहांगीरपुरी येथे एमसीडीच्या अतिक्रमणविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी 


दिल्ली पालिकेच्या तोडक कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर बुल्डोझर चालवला जात आहे. जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने तूर्तास स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर आज (गुरुवारी) पुन्हा सुनावणी होणार आहे. 


दिल्ली हिंसाचाराच्या आरोपींचे बंगाल कनेक्शन


दिल्ली हिंसाचारातील आरोपींच्या बंगाल कनेक्शनसाठी पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात दिल्ली पोलिसांच्या पथकाची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचे तीन सदस्यीय पथक ही चौकशी करत असून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा बांगलादेशाशी संबंध आहे की, ते बंगालचे रहिवासी आहेत, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली जात असून कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाईल.


इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज गुजरातमधून दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. आज गुजरातमध्ये येणारे ब्रिटीश पंतप्रधान गुंतवणूक आणि व्यावसायिक संबंधांवर अनेक उद्योगपतींना भेटणार आहेत.  जॉन्सन 22 एप्रिल रोजी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या या गुजरात-दिल्ली भेटीला ब्रिटनच्या नव्या इंडो-पॅसिफिक धोरणाशीही जोडले जात आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या निम्म्याहून अधिक इंडो-ब्रिटिश नागरिक गुजराती वंशाचे आहेत. 


अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 


अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. सालेमने दावा केला आहे की, पोर्तुगालमधून त्याच्या प्रत्यार्पणात नमूद केलेल्या अटींनुसार भारतातील तुरुंगवास 2027 पेक्षा जास्त असू शकत नाही. या प्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने उत्तर दाखल करताना केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्वोच्च न्यायालयाने सालेमच्या सुटकेवर सुनावणी करू नये, असे म्हटले आहे. भल्ला यांनी असेही म्हटले आहे की, त्याच्या सुटकेचा विचार करण्याची वेळ 2030 मध्ये येईल. मग काय करायचे ते सरकार ठरवेल. सकाळी 11.40 वाजता सुनावणी होणार आहे. 


'ह्युमन कॉम्प्युटर' शकुंतला देवी यांची पुण्यतिथी 


'ह्युमन कॉम्प्युटर' असा लौकिक मिळवणाऱ्या गणितज्ञ शकुंतला देवी यांची आज पुण्यतिथी आहे. शकुंतला देवींचा जन्म 1929 मध्ये बंगळूरूमध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1982 साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली. 


हरलं तर थेट बाहेर... चेन्नई-मुंबई विजयासाठी मैदानात उतरणार


आयपीएल स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुंबईचा गुरुवारी मैदानात उतरणार आहे. पण मुंबईपुढे तगड्या चेन्नईचं आव्हान असेल. मुंबई आणि चेन्नई आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. या दोन्ही संघाची यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मुंबईला पहिल्या सहाही लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर सहा सामन्यात चेन्नईचे पाच पराभव झाले आहेत. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आयपीएलमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी एकमेंकासमोर उभे राहतील.


आज इतिहासात


1526: मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यातील पानिपतच्या पहिल्या युद्धात इब्राहिम लोदी मारला गेला आणि भारतात मुघल राजवटीचा पाया घातला गेला.


1926: इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये सर्वाधिक काळ राज्य करण्याचा विक्रम केला आहे.


1938: सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...चे गीतकार प्रसिद्ध कवी मोहम्मद इकबाल यांचे पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले.


1996: भारतीय हवाई दलाचे अधिकारी संजय थापर यांना पॅराशूटमधून उत्तर ध्रुवावर उतरवण्यात आले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.