ठाणे : कल्याणमधील वरटेक्स या इमारतीच्या 15,16,17 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांकडून माहिती मिळताच येथील आगीवर (fire) नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आले. मात्र, उंच इमारतीवरील फ्लॅटमध्ये ही आग लागल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज झाली होती, 15 ते 20 ॲम्बुलन्ससह डॉक्टरांची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. तर, अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा 17 वय मजल्यापर्यंत जात नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलालाही अडथळ्यांची कसरत करावी लागली. त्यामुळे, कल्याण डोंबिवली महापालिका मोठ्या मोठ्या इमारतींना बांधकामाची परवानगी देत आहे. मात्र, इमारतीचे फायर कार्यान्वित आहे का ?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठीसाठी आली आणि ती गाडीच ना दुरुस्त झाली या गाडीमुळे आग विझवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला, तर दुसऱ्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत. कल्याणमध्ये लागलेल्या इमारतीचे आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते.  स्काय लिफ्ट या वाहनाच्याद्वारे अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, स्काय लिफ्ट वाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी या अग्निशमन दलालादेखील अथक प्रयत्न करावे लागले. 

महापालिकेची फायर गाडी नादूरुस्त

वर्टेक्स इमारतीची फायर यंत्रणा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पण, या फायर यंत्रणेचा वापर कसा करावा याबाबत रहिवाशांना माहिती नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वेळ लागला. शॉटसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका फायर यंत्रणा वाहन नादुरुस्त असल्याने ठाणे महापालिकेच्या स्काय लिफ्ट आग विझवण्यासाठी बोलवण्यात आले. एक फायर गाडी आग आटोक्यात आणण्यासाठी आली आणि तीच गाडी नादुरुस्त झाल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता. या घटनेवरून महापालिका काहीतरी बोध घेईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Continues below advertisement

नारिकांना सुरक्षितस्थळी हलवले

अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यामध्ये आणण्यात आली असून पाच फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. इमारतीमधील 15 ते 17 व्या मजल्यापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाहणी करण्यात येईल, त्यानंतरच कुटुंबाला त्यांच्या घरामध्ये राहण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. इमारतीची फायर यंत्रणा सुरू होती. मात्र, त्यामध्ये काहीसा बिघाड असल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचण निर्माण झाली. इमारतीमध्ये असलेली फायर यंत्रणा सज्ज आहे का तिचे ऑडिट झाले आहे का, याबाबतीत चौकशी करण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे यांनी सांगितले. 

हेही वाचा

आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला