Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
Rishabh Pant IPL 2025 Salary Tax Deduction:रिषभ पंत आयपीएल मेगा ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिषभ पंतला लखनौ सुपर जाएंटसनं 27 कोटी रुपये खर्चून संघात घेतलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरिषभ पंतसाठी लखनौनं 27 कोटी रुपये मोजले असले तरी त्याला कर वजा करुन किती रक्कम मिळणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
रिपोर्टनुसार रिषभ पंतला 8.1 कोटी रुपये सरकारला कर म्हणून द्यावे लागतील म्हणजेज 27 कोटींपैकी त्याला 18.9 कोटी रुपये मिळतील.
आयपीएलपूर्वी एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी नवा खेळाडू खेळू शकतो. भारतीय खेळाडू टीम इंडियासाठी खेळाना दुखापतग्रस्त झाल्यास त्याला पूर्ण पगार मिळेल, कारण बीसीसीआय सर्व खेळाडूचा विमा उतरवते.
रिषभ पंत सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. भारतानं पहिली कसोटी जिंकली असून आता दुसरी मॅच 6 डिसेंबरला सुरु होणार आहे.
रिषभ पंतनं आयपीएलमध्ये 111 मॅच खेळल्या असून 110 डावांमध्ये 35.31 च्या सरासरीनं 148.93 च्या स्ट्राईक रेटनं 3284 धावा केल्या असून त्याच्या नावावर 1 शतक आणि 8 अर्धशतकांची नोंद आहे. रिषभची सर्वोत्तम कामगिरी 128 धावांची आहे. 2016 पासून2024 पर्यंत तो दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळतोय.