Maharashtra Breaking News 20 May 2022 : भिवंडी शहरातील आझादनगर परिसरात एका घराला अचानक आग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळाले आहे. शहरातील आझादनगर परिसरात एका घराला अचानक आग लागली आहे. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नगरसेवक व स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन दलास पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे.
अमरावतीमधील धारणी शहरातील डाबर मोहल्ह्यात आग लागून सहा घरे जळून खाक झाली आहेत. या आगीत एका सिलेंडरचा स्फोट झाला असून तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.
बारामतीतील आंबा निर्यातदाराचा आंबा थेट व्हाइट हाऊसमध्ये पोहोचला आहे. भारतीय आंबा व्हाइट हाऊसमध्ये पोहोचल्याची माहिती अभिजित भसाळे यांनी दिली आहे.. अभिजित भसाळे हे रेम्बो इंटरनॅशनल एक्स्पोर्ट चे संचालक आहेत. बारामतीतील जळोची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रेम्बो इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र पणन विभागाने करार केला आहे. त्याच उद्देशाने अभिजित भसाळे हे रेम्बो इंटरनॅशनल माध्यमातून विविध ठिकाणी आंबा निर्यात केली जाते. बारामतीतून पणन आणि रेम्बो इंटरनॅशनलने 2015 पासून आंबा निर्यातिला सुरुवात केली आहे.. फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. आता हाच भारतातील आंबा हा अमेरिकेत पोहोचला आहे. बारामतीतील जळोची येथील रेम्बो इंटरनॅशनल एक्स्पोर्टने भारतातील आंबा हा थेट व्हाईट हाऊस मध्ये पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आंब्याची निर्यात अमेरिकेत होऊ शकली नाही. रेम्बो इंटरनॅशनलच्या मार्फत जगात विविध ठिकाणी भारतीय आंबा पोहोचवला जातो. आता भारतीय आंब्याची भुरळ अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ऑफिसला देखील पडली आहे. त्यामुळे बारामतीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे..
अकोट मतदारसंघातील अकोट आणि तेल्हारा तालूक्यातील पांदन रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचं जिल्हाधिकारी कक्षासमोर ठिय्या आंदोलन. रस्त्याच्या दुरावस्थेसाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना ठरवलं दोषी. जिल्हाधिकार्यांच्या लेखी आश्वासनानंतर आमदार भारसाकळेंचं आंदोलन मागे.
Sanjay Raut : राज्यसभेसाठी संजय राऊत 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा नवा विक्रम राऊत प्रस्थापित करणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे पण पहिला उमेदवार म्हणून राऊत यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.
देशातलं पाहिलं आरक्षण शाहू महाराजांनी लागू केलं. बाबासाहेबांना मुंबईत राहतात तिथे जाऊन भेटले. मूकनायकला त्यावेळी काही हजार रुपयांची मदत केली आणि सांगितलं हे काम चालू ठेवा. बाबासाहेब हे ग्रंथालय उघडायच्या वेळेला आत जायचे आणि बंद व्हायच्या वेळेला बाहेर पडत होते. श्रीलंकेचा देशात सत्ताधारी लोकांना सत्ता सोडावी लागली, पाकिस्तानात होतकरू पंतप्रधान पायउतार झाले. पण आपल्या देशात बाबासाहेबांच्या संविधानाने ही परिस्थिती कधी येणार नाही. पण आपण बाबासाहेबाना न्याय देऊ शकत नाही.
बाबासाहेबांना कटू निर्णय घ्यावा लागला ,त्यांनी हिंदू धर्म सोडला. येवल्याला त्यांनी घोषणा केली. हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. आनंद हा आहे की या देशातल्या लाखो लोकांनी हा निर्णय मान्य केला आणि त्याच पालन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेगाव दौरा रद्द , आता अकोला येथे करणार मुक्काम , जळगाव जामोद येथील सभा झाल्यावर अकोला येथे जाणार , या आधी शेगाव येथे करणार होते मुक्काम.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी राज्यातील ब्राम्हण संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा करणार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात संध्याकाळी पाच वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर विविध ब्राम्हण संघटनांना आमंत्रित करण्यात आलय. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून ब्राम्हण समाजाबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतची नाराजी शरद पवारांकडे मांडणार असल्याच ब्राम्हण संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटलय. तर दुसरीकडे शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येणारी मतांबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेज कंपनीला आता डीजीसीएने पुन्हा उड्डाणांची परवानगी दिल्याने कंपनीची सेवा पुन्हा सुरु होणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव यांनीच आपल्या मुलाचा गळा आवळून खून केल्याच पोलीस तपासात उघड
- उलट बोलणे, हट्टी स्वभाव याचा राग मनात धरत वडिलांने केले कृत्य
- मुलाचा खून करत जगदीश जाधव यांनी स्वतः गळफास घेत केली होती आत्महत्या
- काल पहाटे उघडकीस आली होती घटना
- पंचवटी पोलीस ठाण्यात मयत जगदीश जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल
नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून त्याची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाईचा बडगा तहसील कार्यालयाने सुरू केला आहे. मागील चार महिन्यात पन्नासपेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यावर 72 लाखांपेक्षा जास्त दंडही ठोठावण्यात आला आहे. नायब तहसीलदारांच्या मार्गदर्शनात पथके स्थापन करण्यात आली असून, शहरासह तहसील कार्यालयाच्या हद्दीत अवैध रेतीची वाहने आढळून आल्यास कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली.
Sheena Bora Case : इंद्राणी मुखर्जी साडे सहा वर्षानंतर जेलबाहेर आल्या आहेत. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.
Parabhani News : इतर महापालिकांप्रमाणेच परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ही 7 वा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी मागच्या 15 दिवसांपासुन संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असुन परभणीचे शिवसेना आमदार डॉ राहुल पाटील यांच्या मध्यस्तीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागु केल्याची घोषणा केल्याने आज या सर्व कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत जल्लोष साजरा केलाय..
Pune News : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराला छावणीचे स्वरूप आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यक्रमाला चोख पोलिस बंदोबस्त आहे. सोमवारी याच ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला होता. या पार्श्वभूमीवर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा 22 मे रविवारी सकाळी 10 वाजता पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या सभेत राज ठाकरे कोणाला लक्ष करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. या सभेला 10 हजार नागरिक येण्याची शक्यता असल्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे बाबत भूमिका मांडल्यापासून चांगलेच राजकारण तापले असून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान राज ठाकरे यांनी मुंबई,ठाणे,औरंगाबाद येथे सभा घेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष केल्याचे पाहण्यास मिळाले.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राज ठाकरे याच्यावर टीका केले. हे आरोप प्रत्यारोप थांबत नाही. तोवर एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्याने वाद निर्माण झाल्याची घटना घडली. या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा नियोजन बैठकीला भाजपने बहिष्कार टाकला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्हा नियोजन बैठक 11 वाजता सुरू झाली. मात्र अद्याप केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित झालेले नाहीत. पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे आमदार, खासदार मात्र उपस्थित आहेत. भाजपचे जिल्हा नियोजनचे सदस्य सुध्दा या बैठकीला उपस्थित नाहीत. त्यामुळे आमदार नितेश राणेंनी जिल्हा नियोजन बैठकीला बहिष्कार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन सभागृहाच्या बाहेर महाविकास आघाडी वर हल्लाबोल केला. बदाम आणि चहा प्यायला नियोजन मंडळाच्या बैठकीला जायचं का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. तर जिल्ह्यातील सर्व कम ठप्प असल्याचाही आरोप केला. जिल्हा परिषदेचे परत गेले 65 कोटी रुपये परत देतो म्हणून सांगितलं होतं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे पैसे का नाही दिले आमदार नितेश राणे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार वर प्रहार केला.
Snagli Rain : सांगली जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरुच आहे. या पावसाने जत या दुष्काळी भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक नाले ओढे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. तर वळसंग ते पाचापुर पुलावरुन पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे.
Sangli Rain : सांगली जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरुच आहे. या पावसाने जत या दुष्काळी भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. अनेक नाले ओढे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. तर वळसंग ते पाचापूर पुलावरुन पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे.
ACB Case Against Narendra Mehta : भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र मेहता यांनी बेकायदेशीर मार्गाने संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एसीबीने मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांनादेखील आरोपी केले आहे. मिरा-भाईंदर भागामध्ये नरेंद्र मेहता हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना बंडखोरीचा फटका बसल्याने थोडक्यात पराभव झाला होता.
भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियम 1988 चे कलम 13 (1)(इ), 13(2) सह भादंवि संहिता कलम 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
Raj Thackeray Ayodhya Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करुन माहिती दिली. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांना अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे.
Aurangabad News : येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षासोबत युती-आघाडी करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष, त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर संबंधित पक्षाशी चर्चा करण्याचे अधिकार असतील. त्यांनी युती-आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य कार्यकारणी समोर ठेवावा, असा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबादमध्ये झालेल्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.
Jammu Kashmir News : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका निर्माणाधीन चार लेन बोगद्याचा काही भाग कोसळल्यानं नऊ जण अडकले होते, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर उर्वरित सात जणांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली. प्रशासनाला माहिती मिळताच, तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खूनी नाल्यातील बोगद्याच्या समोरचा एक छोटासा भाग तपासणी दरम्यान कोसळला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. माहिती मिळताच पोलीस आणि लष्करानं तातडीनं संयुक्त बचाव मोहीम सुरू केली. एकूण 9 जण बोगद्यात अडकले असून दोन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर सात जण अद्याप बोगद्यात अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही घटना रामबन जिल्ह्यात घडली असून यावेळी रामबनचे उपायुक्त, प्रकल्प संचालक, डीआयजी आणि एसएसपी उपस्थित होते.
Sambhaji Raje meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या या प्रस्तावात सुधारणा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी, असा प्रस्ताव संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती मिळत आहे. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करुन कळवतो असे सांगितलं आहे.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी आहे. वाराणसीतील कोर्टाला सुनावणी न करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. वाराणसी कोर्टातील सुनावणीला सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे
नवज्योतसिंग सिद्धू पोलिसांना शरण येण्याची शक्यता
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आज नवज्योतसिंग सिद्धू पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे.
मनोरंजन विश्वातील घडामोडी
- बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- कंगना रनौतचा धाकड चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
- अॅमेझॉन प्राईमवर पंचायत - 2 प्रदर्शित होणार आहे.
- बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
- एसएस राजमौली यांचा आरआरआर चित्रपट आजपासून 'झी-5' वर उपलब्ध होणार आहे.
- अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्लॅनेट मराठीवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे
आज इतिहासात
- 1489- पोर्तुगिजचा खलाशी वास्को दा गामा याचे भारतात पाऊल
- 1900- हिंदीतील प्रसिद्ध कवी सुमित्रानंद पंत यांचा जन्मदिन.
- 1929- स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं आजच्या दिवशीच निधन झालं होतं.
- 1932- भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचं निधन
- 1957- स्वातंत्र्यसेनानी आणि आंध्रचे पहिले मुख्यमंत्री टी प्रकाशम यांचे निधन
- 1965- अवतार सिंग चिमाने माऊंट एवरेस्ट सर केले
- 1998- मल्टीबॅरल रॉकेट प्रणाली ‘पिनाका’ चे पहिल्यांदाच यशस्वी परिक्षण करण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -