Maharashtra Breaking News 20 April 2022 : जगात महाराष्ट्रातील टाॅप ३ स्थानांचं कमाल तापमान सर्वाधिक, विदर्भ आघाडीवर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Apr 2022 11:04 PM
पनवेलचा सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडल मराठी' च्या पहिल्या सीजनचा विजेता!

सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात घर केलं. या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला असून पनवेलचा सागर म्हात्रे विजेता ठरला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेला सागर म्हात्रे पेशाने इंजिनियर असला तरीही त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. 'गाडीवान दादा' असं टोपणनाव पडलेल्या सागरने अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेत टॉप १४ स्पर्धकांमध्ये निवड झाल्यानंतर सागरने विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. मेहेनत, जिद्द, रियाज या जोरावर परिक्षकांची व्हा व्हा मिळवत तब्बल ८ 'झिंगाट परफॉर्मन्स' मिळवले. हिंदी, मराठी सर्वप्रकारची गाणी गात, दर आठवड्याला येणाऱ्या पाहुण्यांच्या कौतुकासही सागर पात्र ठरला. आता 'इंडियन आयडल मराठी' च्या चमचमत्या ट्रॉफीवर सागरने अखेरीस स्वतःचं नाव कोरले. परीक्षक अजय अतुल यांच्याकडून सागरला ट्रॉफी बहाल करण्यात आली.

जगात महाराष्ट्रातील टाॅप ३ स्थानांचं कमाल तापमान सर्वाधिक, विदर्भ आघाडीवर
 

जगात महाराष्ट्रातील टाॅप ३ स्थानांचं कमाल तापमान सर्वाधिक, विदर्भ आघाडीवर

 

ब्रह्मपुरीत ४५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर चंद्रपुरात ४५.२ अंश सेल्सिअस 

 

अकोल्यातील कमाल तापमान ४४.९ अंश सेल्सिअससोबत जगात तिसऱ्या स्थानी

 

उद्यापासून पावसाची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील तापमान कमी होण्याची शक्यता, उकाड्यापासून दिलासा मिळणार
आ. संदीप क्षीरसागर यांना मातृशोक..रेखाताई क्षीरसागर यांचे निधन

बीड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा आ. संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे सायंकाळी निधन झाले. रेखा क्षीरसागर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांना बुधवारी सायंकाळी अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचवेळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 


 

Gunratna Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अंतरिम जामीन मिळावा यासाठी बीड न्यायालयात अर्ज

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यासंदर्भात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने वकिलांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात 22 तारखेला सुनावणी होणार आहे. 

यवतमाळ : माळवागद येथील महिलांची पाण्यासाठी पायपीट

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील  तीन हजार लोकवस्तीच्या माळपठारावर वसलेले  माळवागद या गावात महिलांना उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अतिशय दुर्गम भागात वसलेले हे गाव आहे, या गावात जाण्यासाठी धड रस्ताही नाही. पाणीपुरवठा विभागाने योजनेतून काम केले आहे. पण नळाला 12 ते 15 दिवस पाणीच येत नाही. त्यामुळे महिलांना डोक्यावर हंडा घेऊन गावाबाहरील विहिरीवर दीड किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

काजू आणि मोहाची फुलं यांच्या पासून बनणाऱ्या  दारूला विदेशी दारूचा दर्जा

काजू आणि मोहाची फुलं यांच्या पासून बनणाऱ्या  दारूला विदेशी दारूचा दर्जा  देण्याचा निर्णय मत्रिमंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला आहे. याआधी या दारूला देशी दारूचा दर्जा देण्यात आला होता. मात्र जास्त विक्री होत नसल्याने अनेक उत्पादकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे काजू आणि मोहाच्या फुलांपासून बनणारी दारू आता विदेशी दारू च्या दुकानात मिळणार आहे. 

Mumbai Police : रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत मुंबईत लाऊडस्पीकरला बंदी

Mumbai Police :  भोंगे आणि लाऊडस्पीकरवरुन सुरु झालेल्या वादानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. रात्री 10 ते सकाळी 6  पर्यंत मुंबईत लाऊडस्पीकरला बंदी घालण्यात आली आहे. लाऊडस्पीकर बंदीच्या वादानंतर मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

पोलखोल रथयात्रेवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक नाही, भाजप आक्रमक 

पोलखोल रथयात्रेवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अद्याप अटक केली नाही म्हणून भाजप आक्रमक झाली आहे. उद्या चेंबूर पोलीस स्टेशनवर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. दगडफेक करणाऱ्या आरोपीला अद्याप अटक केली नाही म्हणून भाजपचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

बारामतीत सीबीआयची धाड

बारामतीत जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्याने लाच मागितली असल्याने बारामतीत सीबीआयची धाड पडली आहे.

23 एप्रिलला रवी राणांचे 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण

आमदार रवी राणा यांचा 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याचा मुहूर्त ठरला आहे. 23 एप्रिल रोजी आमदार रवी राणा त्यांच्या 500 हून अधिक कार्यकर्त्यांसोबत मातोश्री समोर जाणार आहेत आणि हनुमान चालिसा गाणार आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.


 

भोंग्यावरून केले जाणारे राजकारण दुर्दैवी : एकनाथ खडसे

भोंग्या वरून सध्या संपूर्ण राज्यभर राजकारण केले जात आहे  हे अतिशय दुर्दैवी आहे. मंदिर असो वा मशीद दोघांनी शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे आणि जे करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 

खासदार नवनीत राणा यांनी केला आरोप

यशोमती ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या पासून अचलपूर सारखे प्रकार वाढले असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केल आहे. 

उल्हासनगरमध्ये फुटपाथ आणि बॅनरवर महापालिकेची कारवाई

उल्हासनगर शहरातील  फुटपाथ काबीज करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांविरोधात मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. तसेच शहरात अनधिकृत बॅनर लावून विद्रोपीकरणं करणाऱ्यांवर ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरातील नेहरू चौक, नेताजी चौक, कैलास कॉलनी, चोपडा कोर्ट, गोलमैदान, व्हीनस चौक, नेताजी चौक, गांधी रोड आदी परिसरात सोमवार पासून कारवाईला सुरुवात झाली आहे. 

दहिसरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपची पोलखोल सभा उधळली

दहिसरमध्ये शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपची पोलखोल सभा उधळली आहे. दहिसरमध्ये शिवसैनिकांनी पोलखोल सभेला विरोध केला आहे. शितल म्हात्रे स्वत: जागेवर जाऊन  स्टेज  काढायला लावला. 

Gunratna Sadavarte :  कोल्हापूर पोलिस अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहात दाखल

Gunratna Sadavarte :  कोल्हापूर पोलिस अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी आर्थर रोड कारागृहात दाखल झाले आहेत.

आरटीई प्रवेशासाठी 29 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

 आरटीई प्रवेशासाठी 29 एप्रिल पर्यंत मुदतवाढ केली आहे. निवासी पुरावा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे. 

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका, कोल्हापूर पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा

Gunratna Sadavarte :  वकील गुणरत्न सदावर्ते यांना आणखी एक मोठा झटका दिला आहे. कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा दिला आहे. मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर पोलिस आर्थर रोड कारागृहाकडे रवाना होणार आहे. अकोला पोलिसांकडून देखील ताब्यासाठी अर्ज, मात्र जोपर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडीत जात नाही तोपर्यंत ताबा मिळणार नाही. 

अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरातही गुन्हा

सोलापूर : अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. आता सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद झाली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याचा पुरावा देत कलम 153अ, 153 ब, 500, 505 (1), 505 (2), न्यायालय अवमान अधिनियम 1971 कलम 2 अनुसारगुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Gunratna Sadavarte Case : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयातकडून जामीन मंजूर; उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Gunratna Sadavarte Case : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयातकडून जामीन मंजूर; उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एसटी कर्मचाऱ्यांकडून 200 ते 300 रुपये घेतल्याचं मान्य करतो : अॅड गुणरत्न सदावर्ते

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात आणलं असून सुनावणी सुरु आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या युक्तीवादानंतर स्वतः सदावर्ते युक्तिवाद करत आहेत. सदावर्ते म्हणाले की, मान्य करतो की मी एसटी कर्मचाऱ्यांकडून 200 ते 300 रुपये घेतले, ते माझ्या मर्जीने घेतले. पण एकाही कर्मचाऱ्यानं याबद्दल तक्रार केली नाही आहे. माझ्याकडे एसटीचे 48 हजार क्लायन्ट होते. एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी कोर्टाला सांगावं. माझ्या घरातून माझा वकालतनामा मिळाला आहे मात्र इथे हर्षद मेहता केसचा दाखला देण्यात आला. हर्षद मेहताची केस कुठे? माझी केस कुठे? 3 हजारांची पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे, आपण मुंबईत आहोत. गाडी जुनी आहे आणि 2014 साली खरेदी केली आहे, त्याचा आरटीजीएस देखील आहे. माझ्या अकाऊंटवरुन पैसे गेले आहेत. त्याची माहिती तुम्हाला तशीच मिळेल. माझ्या कस्टडीची गरजच काय? सोबतच परळमधील वन रुम किचनचं घर मी 2017 साली घेतलं आहे. त्याचा आणि याचा काय संबंध? माझ्या घरातून लेजर मिळालं, असं दाखवलं काही महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाली. शिवाय माझ्या घरी सध्या माझी फक्त मुलगी आहे. ती पोलिसांना सहकार्य करत आहे.

Gunratna Sadavarte Case : एसटी कर्मचाऱ्यांकडून एकही पैसा घेतला नसल्याचे म्हणणारे सदावर्ते यांनी आज पैसे घेतल्याचे कबूल केले

सदावर्ते म्हणालेत मी एकाही कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले नाहीत, एकही रुपया घेतला नाही अस वारंवार म्हणायचे पण आता म्हणतायत की पैसे घेतले. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत: सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत

Gunratna Sadavarte Case: मुंबई: ३ हजारांची पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे, आपण मुंबई आहोत; सदावर्ते यांचा सरकारी पक्षाला उलट प्रश्न

माझ्या घरुन माझा वकालतनामा मिळाला आहे मात्र इथे हर्षद मेहता केसचा दाखला देण्यात आला. हर्षद मेहताची केस कुठे? माझी केस कुठे? ३ हजारांची पैसे मोजण्याची मशीन मिळाली आहे, आपण मुंबई आहोत; सदावर्ते यांचा सरकारी पक्षाला उलट प्रश्न

Gunratan Sadavarte Case : मी एसटी कर्मचाऱ्यांकडून २००, ३०० रुपये घेतले ते मी माझ्या मर्जीने घेतले, एकानेही तक्रार केली नाही; सदावर्ते यांचा युक्तिवाद

Gunratan Sadavarte Case : मी एसटी कर्मचाऱ्यांकडून २००, ३०० रुपये घेतले ते मी माझ्या मर्जीने घेतले, एकानेही तक्रार केली नाही; सदावर्ते यांचा युक्तिवाद

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
नाशिक : पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांचे आदेश हिंदूंच्या अधिकारावर गदा आणणारे आहेत. 100 मीटर अंतरावर अजानच्या 15 मिनिटे आधी हनुमान चालीसा, भजन किर्तन म्हणण्यास मनाई करण्यात आल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. गावठाण भागात अनेक ठिकाणी मंदिर आणि मशिदी जवळजवळ असल्याने पोलिसांचा निर्णय एकांगी असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
Navi Mumbai New : हार्बर रेल्वे लाईनवरील सिग्नल वायर चोरणाऱ्या आरोपींना अटक

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यांनी सिग्नल वायर रात्रीच्या चोरल्या होत्या. मुख्य सिग्नल वायर डीपीमधून चोरीला गेल्याने 13 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात संपूर्ण हार्बर लाईन बंद पडली होती. जवळपास सकाळी पाच तास रेल्वे लाईन बंद पडल्याने चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी सखोल चौकशी करुन पाच आरोपींना अटक केली आहे. या मध्ये चार आरोपी वायर चोरणारे असून एक आरोपी भंगार विक्रेता आहे. चोरलेली वायर विकत घेतल्याने भंगार व्यापाऱ्याला करंजाडे इथून अटक केली आहे.

Maharashtra News : गुणरत्न सदावर्तेच्या ताब्यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांचं पथक मूंबईकडे रवाना

Maharashtra News : वकील गुणरत्न सदावर्तेच्या ताब्यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांचं पथक मूंबईकडे रवाना. काल रात्री झालं अकोट पोलिसांचं पथक मूंबईकडे रवाना. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सदावर्तेंसह पत्नी जयश्री पाटील आणि आणखी दोघांवर अकोट शहर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल. आज गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर होणार अकोट न्यायालयात सुनावणी.

Jahangirpuri : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर तोडक कारवाईला सुरुवात

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. एमसीडीने बुलडोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. एच ब्लॉकमध्ये अनेक बांधकामं हटवण्यात आली असून सध्या तोडक कारवाईला कोणताही विरोध झालेला नाही. दिल्लीत हनुमान जयंती दिवशी झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. सध्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. त्यानंतर आता एमसीडीने अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळी 400 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.


सविस्त वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Sanjay Raut : भोंग्यांच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे; संजय राऊत यांचे टीकास्त्र

Sanjay Raut : सध्या सुरू असलेल्या भोंग्यांच्या राजकारणामुळे हिंदुत्व बदनाम होत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

Sanjay Raut: भोंग्यांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण लागू करावे; संजय राऊत यांचे आवाहन

Sanjay Raut:  भोंग्यांबाबत केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण लागू करावे; संजय राऊत यांचे आवाहन

Pune News : सलुन आणि ब्युटीपार्लरच्या दरात 1 मे पासून 30 टक्के दरवाढ, सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांच्या बैठकीत निर्णय

Pune News : सलुन आणि ब्युटीपार्लरच्या दरात 1 मे पासून 30 टक्के दरवाढ, सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत निर्णय

Buldhana : जिल्ह्यात धार्मिक स्थळांवरील "भोंग्यांची" माहिती संकलित करण्याचे पोलीस पाटलांना आदेश.

Buldhana News : राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून तापलेले वातावरण बघता आता बुलढान्यात प्रत्येक गावातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती तात्काळ संकलित करून देण्याचा आदेश जिल्ह्यातील पोलीस पाटलांना देण्यात आल्याने आता जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. पोलीस पाटलांना पाठविण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की, "ज्या गावाचा पदभार आपल्याकडे आहे त्या गावातील मंदिर , मस्जित, मदरसा , बुद्धविहार व इतर सार्वजनिक धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या लाऊडस्पीकर ची संख्यात्मक माहिती वरिष्ठांना तात्काळ कळवावी." मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी फोनवरून माहिती दिली की , वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन केले जात असून ,सर्व धार्मिक स्थळांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे याबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये. जिल्ह्यात एकूण 1444 गाव असून 800 पोलीस पाटील कार्यरत आहेत.

Amravati : अचलपूर प्रकरणी भाजपचे शहर अध्यक्ष अभय माथने यांना पोलीसांनी पुण्यावरून केली अटक..

Amravati : अचलपूर प्रकरणी भाजपचे शहर अध्यक्ष अभय माथने यांना पोलीसांनी पुण्यावरून अटक केली. आज अचलपूर न्यायालयात हजर पोलीस करणार असून अभय माथने हे घटनेच्या वेळी अचलपूर मध्ये होते असं ठाणेदार सांगताय, तर घटनेच्या दिवशी अभय माथने हे कुटुंबासह रविवारी सकाळीच पुण्यासाठी मुलीच्या अँडमिशनसाठी गेले असल्याची माहिती भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली..

Nitin Raut : महाजेनको कंपनीतर्फे 8 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आल्याचा ऊर्जामंत्र्यांचा दावा

Nitin Raut : राज्यांमध्ये वीजेची टंचाई निर्माण झाली असली तरी महाजेनको कंपनीतर्फे 8 हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे नियोजन करण्यात आल्याचा दावा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला. वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी झाली. खुल्या बाजारातून वीज खरेदीसाठी उर्जा खात्यास खेळत्या भांडवलाची गरज असून ग्रामविकास व नगरविकास खात्यांकडील अनुदानाच्या थकबाकीसह 2 हजार कोटींचा निधी ऊर्जा खात्यास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी डॉ. राऊत यांनी यावेळी केली

Petrol-Diesle Price Today : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक; एक लिटरचे सध्याचे दर काय?

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

Petrol-Diesle Price Today : सलग 14 दिवस दिलासा, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक

Petrol-Diesle Price Today on 20 April 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे नवे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज सकाळी भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. नव्या दरांनुसार, देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज सलग चौदाव्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 80-80 पैशांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, देशात महागाईनं उच्चांक गाठला आहे. इंधन दर गगनाला भिडले आहेत. देशात सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्‍लेयरमध्ये विकलं जात आहे. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळत आहे.  


भारतीय तेल कंपन्यांनी 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणतीही दरवाढ केलेली नाही. पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra News : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 ते 24 एप्रिल दरम्यान तुरळक पण विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पार्श्वभूमी

मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा गावदेवी की कोल्हापूर पोलिसांकडे याचा आज फैसला
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.  सदावर्ते यांच्या वकिलांना या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांचा ताबा गावदेवी पोलिसांकडे जाणार की कोल्हापूर पोलिसांकडे याचा निर्णय होणार आहे. 


भोंग्याचा विषय आजच्या कॅबिनेटमध्ये शक्य
राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना त्याची चर्चा आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भोंग्याच्या राजकारणात महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? गृहविभाग त्यावर ठोस पावले उचलणार का? यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 


भोंग्याच्या विषयावर मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महासंचालक यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये ज्या काही सूचना करण्यात आल्या त्या गृहविभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यावर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 


सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी 115 जणांच्या जामीनावर सुनावणी
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक होऊन सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 115 एसटी कर्मचाऱ्यांनीही जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. यात 24 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आलं आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापैकी बरेसचे जण हे मुंबई बाहेरून आले आहेत, त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची अनामत रक्कम भरण्यासाठीही पैसे नाहीत, हमीदार नाही अशी त्यांची बिकट अवस्था असल्याचं त्यांच्या जामीन अर्जात नमूद केलेलं आहे.


दिल्लीतील जहांगिरीपूरी हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरू
दिल्लीतील जहांगिरीपूरी या ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर आता अटकसत्र सुरू झालं आहे. मंगळवारी आणखी तिघांना अटक केल्यानंतर आरोपींची संख्या 26 वर गेली आहे. आजही या बाबतीत अपडेट्स येण्याची शक्यता असून आजही काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मोदींच्या गुजरात दौऱ्याचा शेवटचा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. आज ते गांधीनगर येथे होणाऱ्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवाचार शिखर संमेलनाचं उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर ते दाहोद येथे आदिजाती महासंमेलन मध्ये सामिल होणार असून त्या ठिकाणी अनेक विकास कार्यक्रमांचे उद्धाटन करणार आहेत. 


शिखांच्या नवव्या गुरुंच्या 400 व्या प्रकाशवर्षानिमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रम
शिख समाजाचे नववे गुरू तेग बहादुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून लाल किल्ल्यामध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाग घेणार आहेत. 21 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करणार आहेत. या निमित्ताने एका विशेष नाण्याचे आणि पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. 


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक
रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून आजही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आण प्रशांत किशोर यांच्यासोबत सोनिया गांधींची बैठक होणार आहे. 2024 सालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठीचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.  


मुंबईमध्ये वागशीर पाणबुडीचे अनावरण
स्कॉर्पियन श्रेणीतील सहावी पाणबुडी असलेल्या वागशीर पाणबुडीचे अनावरण आज मुंबईच्या माझगाव डॉक या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 10.30 मिनीटांनी होणार आहे. 


आयपीएलचा आज एक सामना 
दिल्ली कपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्लीच्या संघाचं नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, मयांक अग्रवालकडं पंजाबच्या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगलं प्रदर्शन करून दाखवलं आहे. यामुळं दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.