Maharashtra Breaking News Live Updates 19 September 2022 : एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील दिलेली स्थगिती रद्द
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील निर्मल नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केली ची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या निवृत्त महिला पोलीस अधिकाऱ्याच नाव वैशाली विलास शेलार असून त्या
58 वर्षांच्या होत्या.
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणारी भरधाव क्रेटा कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार टेम्पोवर धडकल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
MIDC : महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भूखंड वाटपापैकी 183 भूखंडांची स्थगिती रद्द करण्यात आली आहे. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर 191 भूखंड वाटपांना स्थगिती दिली होती. वेदांता ग्रुपचा वादग्रस्त मुद्दा ठरल्यानंतर तात्काळ अवलोकन करून निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते. त्यानंतर उद्योग विभागाने या भुखंडांच पुनर्विलोकन करत 191 पैकी 183 भुखंडाची स्थगीती उठवली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या पुण्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिसणाऱ्या विजय माने यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री यांच्यासारखी वेशभूषा करून गेल्या काही दिवसांपासून माने हे सोशल मीडिया वर देखील चर्चेचा विषय ठरले होते. माने यांनी सराईत गुंड शरद मोहोळ याचसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याप्रकरणी आता माने विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. माने याच्याविरोधात IPC 419-511, 469, 500, 501 माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलाय.
औरंगाबाद शहरास जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो. दरम्यान औरंगाबाद पाणी पुरवठा 100 व 56 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी पंपगृह येथे 19 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजून 5 मिनीटांनी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे पुर्ण पंपींग बंद झाली. 100 दलली योजनेवरील नवीन जायकवाडी पंपगृह येथे मेन पॅनलमध्ये तपासणी केली असता पंप क्र. 4 च्या फिडरमध्ये उंदीर गेल्यामुळे स्पार्कंग होऊन फेज टू फेज अर्थ फॉल्ट झाला व सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याचे आढळले. त्यानंतर नवीन जायकवाडी पंपगृह येथील सप्लाय बायपास करून 56 दलली योजना 4.20 वाजता सुरू करण्यात आली. 100 दलली योजना संपुर्ण काम झाल्यानंतर दुपारी 1 वाजता चालु करण्यात आली. परिणामी 56 दलली योजनेवर 2 तास 15 मिनीटे व 100 दलली योजनेवर 11 तास 5 मिनीटे खंडणकाळ झाला असल्याने सदर काळात पाणी उचल बंद होती.त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा काही कालावधीसाठी विस्कळीत होणार असल्याची माहिती औरंगाबाद महानगरपालिकेनी दिली आहे.
उद्या भाजपच्या देशभरातील सर्व महापौर उपमहापौरांची गुजरातमध्ये परिषद होणार आहे. दोन दिवसांची राष्ट्रीय महापौर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थिती दर्शवणार आहेत. देशभरातील महापौर उपमहापौर यांना मार्गदर्शन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ही उद्या अहमदाबाद मध्ये जाणार आहेत. 18 राज्यातील 125 वर भाजपाचे महापौर सहभागी होणार होणार आहेत.
आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक वर्षांपूर्वी बीड शहरातील खराब झालेल्या रस्त्यातील खड्ड्यांची मोजमाप करून अनोखी आंदोलन केले होते. मात्र एक वर्षानंतर सुद्धा या रस्त्यांची फारशी परिस्थिती बदलली नाहीत. त्यामुळे एक वर्षानंतर पुन्हा मोजलेल्या खड्ड्यांना फुलं वाहून दवंडी मोर्चा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यावर काढला होता..
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सोमवारी बैठक झाली. यामध्ये दोन ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात यावा, हे ठराव मंजूर करण्यात आले.
एरंगळ येथील हिंदू स्मशानभूमी थेट कशी हटवली?, हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल
एरव्ही बेकायदेशीर बांधकामांबाबत वारंवार निर्देश देऊनही कारवाई होत नाही, मग इथं इतकी तत्परता का?
शेजारील हॉटेल मालकाच्या तक्रारीची तातडीनं दखल का? - हायकोर्ट
मुंबई उपनगर जिह्याधिकारी निधी चौधरींची कोर्टात हजेरी
कोणतीही सुनीवणी न घेता थेट कारवाईचे आदेश देणं भोवण्याची चिन्ह
पालिकेला बुधवारी साल 1991 पासूचं रजिस्टर तपासून स्मशानचं अस्तित्व नेमकं कधीपासून याची माहिती सादर करण्याचे निर्देश
महाराष्ट्रातून भीमशक्ती आणि शिवशक्तीमधून, बहुजन आघाडी, अल्पसंख्यांक मुस्लिम समाज, रिपाईमधील अनेकांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. सोमवारी मातोश्री येथे पक्ष प्रवेश झाला. दसरा मेळावा हा आमचाच होईल, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे रामदास कदम बद्दल काय म्हणालेत ते ऐका. त्यानंतर त्यांच्या वर्तमान काळ सांगेन. भूतकाळात पासूनच पक्ष फोडण्याची यांच्या मनात दुही माजली होती, अशी टीका पेडणेकर यांनी केली आहे.
फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. क्रीडांगणाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील बोरीवली परिसरातील क्रीडांगणावर फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाचं यंदा आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र सार्वजनिक क्रीडांगणावर नागरिकांना मज्जाव करून प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारू नये, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विनायक यशवंत सानप यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी 21 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सगळं काही आलबेल सुरू असताना डोंबिवलीत मात्र रविंद्र चव्हाण यांच्या यांनी रस्त्यांवरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष केल्याने फडणवीस-शिंदे सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रविंद्र चव्हाण यांच्या आरोपानंतर डोंबिवलीतील शिंदे गटातील माजी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी रविंद्र चव्हाण यांनी 13 वर्ष डोंबिवलीत विकासकामे रखडवली. रविंद्र चव्हाण यांनी आपली पापं झाकण्यासाठी आरोपप्रत्यारोप करणं बंद करावं असा टोला लगावला. राज्यात शिंदे फडणवीस सरकारमध्ये सर्वत्र आलबेल दिसत असले, तरी डोंबिवलीत मात्र रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि त्यानंतर शिंदे गटातील माजी नगरसेवकांकडून दिलेले प्रत्यूत्तर यामुळे वादाची ठिणगी पडली हे मात्र निश्चित.
धुळे शहरासह तालुक्यात पडलेल्या पावसाचा फटका हा नवोदय विद्यालयाच्या सांस्कृतिक स्पर्धांनाही बसला. विद्यालयाने योग्य नियोजन केलं नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात अडकून पडण्याची वेळ आली. गुजरात आणि महाराष्ट्रातील 16 संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. कला उत्सव म्हणून साजरा होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमात बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यात अडकले. या विद्यार्थ्यांची व्यवस्था नकाणे गावांमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांना निरंकारी भवनामध्ये हलवण्यात आले. सकाळी या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा विद्यालयात आणण्यात आले. दोन दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत.
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुर्डुवाडी कार्यक्रमात येऊ नये, म्हणून त्यांच्या बंगल्यावर आज सकाळी धमकीचा फोन आला होता. पोलिसांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. हा फोन आल्यानंतरही पवार यांनी कुर्डुवाडी दौरा पूर्ण केला.
सांगली : दुसरीही मुलगीच झाल्याने चिडून विवाहितेला तिच्या पतीनेच दिले विहिरीत ढकलून दिल्याने विवाहितेचा मृत्यू झाला आहे. इस्लामपूर जवळील कापूसखेड हद्दीत ही घटना घडली आहे. मॉर्निंग वॉक दरम्यान पत्नी पाय घसरुन विहिरीत पडल्याचा पतीने आधी कांगावा केला होता. मुलीचे आई वडील आणि भाऊ यांच्या तक्रारीनंतर पोलीस तपासात विवाहितेला विहिरीत ढकलून दिल्याचे समोर आलं. राजनंदिनी सरनोबत (वय 29 वर्ष) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचं नाव, तर कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय 30 वर्ष) असे संशयित आरोपीचं नाव आहे.
ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतीचे तात्काळ पंचनामे करा, अशी मागणी धुळे तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. अनेक क्षेत्रांमध्ये पाणी साचून शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. या भागांमध्ये प्रामुख्याने घेण्यात येणारे कपाशी, बाजरी, ज्वारी आणि कडधान्य पीक हे संपूर्ण नष्ट झाले आहे. म्हणून शासनाने धुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून या भागातील शेतात जाऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी धुळे तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी केली आहे. धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली आहेत.
यवतमाळ : राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त झाडगाव येथील मयूर बंडू संगेवार यांच्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. मारेगाव तालुक्यातील दापोरी कासार शेतीची पाहणी केली तसेच राळेगाव तालुक्यातील चहांद येथील श्याम धोपे व राहुल ज्ञानेश्वर ढोबे यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली. मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील अतिवृष्टी ग्रस लोकसभेची पाहणी केली तसेच तोताराम चिंचोलकर यांच्या घरी सांत्वन पर भेट दिली. तत्पूर्वी अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भेटी घेऊन जिल्ह्याच्या नुकसानीचा आढावा घेतला
शिक्षकाचे विद्यार्थिनींशी गैरवर्तन...
अश्लील व्हिडीओ दाखवत असल्याचा आरोप...
शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार...
पालकांकडून शिक्षकाला बेदम चोप...
शिक्षकाला पोलिसांनी घेतले ताब्यात...
संजय थोरात नामक शिक्षकाला पोलिसांनी घेतले ताब्यात...
शिक्षकाच्या वर्तणुकीमुळे पालकांमध्ये संताप...
राज्यात 15 ऑक्टोबर पासून राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु होणार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि पशूसंवर्धन मंत्री यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत निर्णय
राज्यात वाढत असलेल्या लम्पी रोगाबाबत देखील बैठकीत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती
Washim : वाशीम जिल्ह्यातील सोयाबीन काढणीच्या तोंडावर आले असता सोयाबीन वर विषारी घोणस आळी चा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरातील जवळपास प्रत्येक शेतातील सोयाबीन वर घोणस अळी आढळून येत आहे. काल माळशेलू येथील कविता उदेभान चव्हाण या महिलेला या अळीचा स्पर्श झाल्याने तिला विष बाधा झाली तिला उपचारार्थ अकोला येथे दाखल करण्यात आले आहे.. आज इचा गावात सुध्दा एका युवकाला त्या अळीचा स्पर्श झाल्याने त्या युवकाला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. ऐन सोयाबीन काढणीच्या तोंडावर विषारी घोणस आळीचा शिरकाव सोयाबीन वर झाल्याने सोयाबीन सोंगनाऱ्या मजुरासह शेतमालका मध्ये चिंतेच वातावरण निर्माण झाल आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणात मोठी बातमी...आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कटाचा तपास सुरु, NIA ची कोर्टाला माहिती
Gujrat DRI Action : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सिगारेटची तस्करी रोखण्यासाठी कारवाई केली आहे. मुंद्रा बंदरावर सुमारे 48 कोटी रुपयांची ई-सिगारेट जप्त केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती डीआरआयने दिली आहे.
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
वांद्रे येथील माउंट मेरी जत्रेत विशेषत: चोरी करण्यासाठी मुंबईत आलेल्या राजस्थानमधील जोडप्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. जत्रेत एका 3 वर्षीय मुलीची सोनसाखळी चोरल्याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्ह्याच्या काही तासांतच आरोपी जोडप्याचा शोध घेतला. मात्र त्या व्यक्तीने ते गिळल्यामुळे सोने परत मिळण्यास वेळ लागला. पोलिसांनी त्याला सायन रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी एंडोस्कोपीनंतर सोन्याची चैन काढले.
Railway Recruitment Exam Group D 2022 : राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयटीआय इन्स्ट्रक्टरची (ITI Instructor 2022) परीक्षा 28 आणि 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. 1 हजार 457 पदांसाठी परीक्षा होणार असून मोठ्या संख्येने उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. आता त्याच दरम्यान रेल्वे भरती गट ड (Railway Recruitment Exam Group D 2022) परीक्षा नियोजित असल्याने दोन्ही परीक्षांचे अर्ज भरलेले उमेदवार अडचणीत आले आहेत. त्यामुळे आयटीआय इन्स्ट्रक्टरची परीक्षा 8 ऑक्टोबरनंतर घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
उल्हासनगर : आज सकाळी उल्हासनगर महानगर पालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे झेंडूची फुले देऊन स्वागत करण्यात आले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांची ही गांधींगिरी उल्हासनगर शहरात चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील अनेक जेष्ठ नागरिक व महिला कामानिमित्त उल्हासनगर महापालिकेत येत असतात, मात्र संबंधित विभागाचे विभागप्रमुख आणि कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत असल्याने नागरिकांना बराच वेळ तात्कळत बसावे लागत होते. याबाबतच्या अनेक तक्रारी उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या. याबाबत लेंगरेकर यांनी आयुक्त अजीज शेख यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. अखेर आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास पालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, अच्युत सासे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी महापालिकेत उशिरा येणाऱ्या विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांचे झेंडूचे फुल देऊन जंगी स्वागत केले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बीड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेचे काम वाटप झाले आहेत आश्चर्य म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 255 कामाचे वाटप करताना प्रशासनाने केवळ दहा ते बारा गुत्तेदारांमध्ये सगळे काम वाटले आहेत..हे काम मिळवण्यासाठी अनेक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी प्रस्ताव दिलाय प्रशासनाने मात्र त्यांच्याकडून हेतू पुरस्पर डोळे झाक केलीय
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील असेगाव आणि तळेगाव मंडळातील 35 गावे अतिवृष्टीतून वगळण्यात आल्याने तसंच संपूर्ण अचलपूर तालुक्यालाच वगळण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. अचलपूर तालुक्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अचलपूर येथील उपविभागीय कार्यालय येथे धडक मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी महिलांनी ताट वाजवत आणि पन्नास खोके एकदम ओके अशे नारे देत सरकारचा निषेध व्यक्त केला.. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. जर लवकरात लवकर अचलपूर तालुका आणि चांदूरबाजार तालुक्यातील दोन मंडळ अतिवृष्टीग्रस्त घोषीत केलं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन करण्याचा इशारा सुरेखा ठाकरे यांनी यावेळी दिला.
दसरा मेळाव्यावरून शिवसेना आक्रमक
दसरा मेळाव्यावरून शिवसेनेकडून आरपारची तयारी...
पालिकेनं परवागनी नाकारल्यास थेट कोर्टात धाव घेणार...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सर्व्हेमधून वाशीम जिल्ह्यातील येवता महसूल मंडळ वगळण्यात आला. यामुळे या परिसरात झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. तसेच यावार्डी फाटा ते यावार्डी गाव दरम्यान असलेल्या पुलांची दुरावस्था झाल्यामुळे गावकऱ्यांना ये-जा करण्यास अडथळा येत असल्यामुळे येथे नवीन पुल बनवावे या मागणीसाठी नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील यावार्डी फाट्यावर गाव कार्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.
Palghar News: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून एसटी बसचे अपघात वाढत असून आज पुन्हा डहाणू सातारा बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने पाली फाटा येथे एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील शेतकरी 4 दिवसापासून संपावर आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते आणि या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. 13500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली, परंतु या मदती पासून सेनगाव तालुक्यातील तीन मंडळांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे 4 दिवसापासून शेतकरी संपावर आहेत. काल गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी 10-15 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Steel Price Decrease : बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे दर चार महिन्यानंतर घसरले असून मार्च महिन्यात 85 हजार रुपये प्रति टन असलेलेले स्टील 20 हजारांनी कमी होऊन 65 हजार रुपये प्रतिटनावर आले आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे मार्च महिन्यात स्टीलचे दर आजवरच्या सर्वात उच्चांकी म्हणजेच 85 हजार रुपये प्रति टनावरती पोहोचले होते. निर्यातीवर केंद्राने लावलेला अधिकचा टॅक्स त्यामुळे निर्यातीवर झालेला परिणाम आणि अत्यल्प मागणी मुळे हे भाव घसरल्याने सांगण्यात येते. दरम्यान एकीकडे कमी मागणी आणि दुसरीकडे कच्या मालाचे भाव जैसे थे असल्याने स्टील उद्योजकांनी प्रोडक्शन कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
रत्नागिरी : कोकणातील असलेले उदय सामंत उद्योग मंत्री झाल्यानंतर आता कोकणातल्या रिफायनरीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यानुसार आता विरोध असलेल्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम केलं जाणार आहे. स्थानिक प्रशासन असेल किंवा कंपनी यांच्यामार्फत प्रबोधन पर कार्यक्रम केले जाणार आहेत. त्या गावांमध्ये हा प्रकल्प होणार आहे तसेच ज्या घरांमध्ये प्रकल्पाला विरोध आहे त्या ठिकाणी आता किमान 50 कुटुंबांमागे दोन दोन युवक युवतींची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून आता प्रकल्पबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तीन महिने हा कार्यक्रम सुरु असेल. शिवाय आता सोशल मीडियाचा वापर देखील प्रकल्पाचे प्रबोधन करण्यासाठी केला जाणार आहे.
एकीकडे शेतकरी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आत्महत्या करीत आहेत तर, दुसरीकडे चित्ते आणून मोदींचा वाढदिवस साजरा करीत आहे हे दुर्दैव आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय. दसरा मेळावा हा शिवतीर्थ येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असतो आता तो अधिकार उद्धव ठाकरे यांचा असल्याने त्यांना परवानगी मिळणे आवश्यक असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray Live Updates : बहुसदस्य प्रभाग पद्धत लोकशाहीला घातक : राज ठाकरे लाईव्ह
प्रभाग पद्धतींवर राज ठाकरेंची सडकून टीका
Raj Thackeray Live Updates : फॉक्सकॉन प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी : राज ठाकरे
Raj Thackeray Live Updates : फॉक्सकॉन प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का याचीही चौकशी व्हावी : राज ठाकरे
Maratha Reservation : तुळजापूर मधील ठोक मोर्चा नंतर तब्बल तीन वर्षांनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कळंबमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी कळंब शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे. या मोर्च्याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे मराठा समाजाने 'नो वोट, नो आरक्षण'चे बॅनर शहर भर लावले आहेत.
Raj Thackeray LIVE Updates : फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे : राज ठाकरे लाईव्ह
Raj Thackeray LIVE Updates : वेगळा विदर्भ हवा की नको ते जनतेला विचारा : राज ठाकरे लाईव्ह
नागपुरातून राज ठाकरे लाईव्ह
Raj Thackeray Live : नवरात्र झाल्यावर कोकणचा दौरा करणार, नवी कार्यकरिणी जाहीर करणार
मनसेनं कधीही ठाकरे सरकारचं कौतुक केलं नाही : राज ठाकरे
Raj Thackeray Live : नागपुरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरु आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरातून लाईव्ह
पाथर्डी आणि नगर तालुक्यातील दिवसा बंद घराची घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय...स्वरूप उर्फ गुंड्या काळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 11 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 21 तोळे 250 ग्रॅम वजनाचे सोनं हस्तगत करण्यात आलंय. आरोपीने नगर जिल्ह्यात 3 ठिकाणी घरफोडी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.आरोपीवर नगरसह औरंगाबाद येथे 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये.
RBI Tokenization Rule : ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. 1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे.
धरणामध्ये पोहायला गेलेल्या डॉक्टरचा रविवारी मृत्यू झाला होता. त्यांचा शोध घेण्यासाठी कोल्हापूरचे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक आले होते. डॉक्टर दत्ता फपाळ यांचा शोध घेण्यासाठी पाण्यामध्ये उतरलेला जवान बेपत्ता झाला आहे. शोधासाठी पाण्यात गेलेले आपत्ती व्यवस्थापनाचे जवान बुडाले. कोल्हापूरच्या विजय मोरे यांचा एक तासापासून शोध सुरू आहे. ऑक्सिजनसह दोन जवान धरणामध्ये उतरले होते, मात्र एक जवान वर आले दुसरे जवानावर आलेच नाहीत.
बारामती शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा यासाठी आज नगर परिषदेच्या पुढे ढोलताशा वाजवून आंदोलन करण्यात आलं. मॉर्निंग वॉकला फिरायला जाणाऱ्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सोसावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच लहान मुलांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज नगरपालिकेसमोर युवकांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेय. शहरातील भटक्या कुत्र्यांचा नगरपालिकेने त्वरित बंदोबस्त करावा याकरिता ढोल ताशा वाजून नगरपालिकेला लक्ष केले आहे.
विदर्भ दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, ''राज ठाकरे दिलदार माणूस आहेत, मैत्री निभावतात. ते सदिच्छा भेटीसाठी येत आहेत, त्याला राजकीय अर्थ नाही. त्यांचं किंवा माझं घर हे काही राजकीय व्यासपीठ नाही. आमची युती शिंदे गटासोबत मनसेसोबत युतीबाबत सध्या विचार नाही.''
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामण या 22, 23, आणि 24 सप्टेंबर 2022 रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत. भाजपने बारामती लोकसभा मतदासंघाची जबाबदारी निर्मला सीतारामण यांच्यावर सोपविली आहे. या तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये खडकवासला, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड या विधानसभा मतदारसंघात विविध एकवीस कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमाचा शेवट पुणे येथे पत्रकार परिषदेने होणार आहे..
शेटफळच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना किलोला पंचवीस ते सव्वीस रूपयाचा दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे खुळखुळू लागले असून निर्यातक्षम केळीचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. झुंबर पोळ या शेतकऱ्याला चार एकर क्षेत्रावर पंचवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. निर्यातक्षम केळीची अशी स्थिती असली तरी थोड्याशा कमी प्रतीच्या केळीला आणि खोडव्याला स्थानिक बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सध्या निर्यातक्षम केळीचा तुटवडा असल्याने सर्वच केळी निर्यात कंपन्यांकडून उपलब्ध केळीचा दर वाढला आहे.
Mumbai News: झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा निनावी फोन करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दिनेश सुतारला अटक केली आहे.
Mumbai News: झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा निनावी फोन करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दिनेश सुतारला अटक केली आहे.
Mumbai News : मुंबईतील झवेरी बाजारमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करुन एका व्यक्तीने झवेरी बाजारात बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर तपास यंत्रणांनी प्रत्येक ठिकाणी शोधाशोध केली. परंतु काही न मिळाल्याने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा समजलं की तो खोटं बोलत होतं. पोलिसांनी आरोपी दिनेश सुतारला अटक केली असून त्याच्याविरोधात एलटी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506(2) 505(1)(ब) 504,182, आणि 507 अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मुंबईत वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणे एका तरुणाला महागात पडलं आहे. मुंबईतील बोरिवली परिसरात असलेल्या MHB पोलिसांनी 17 वर्षीय तरुणाविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरु आहे.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी मृत्यूमुखी पडलेल्या वैष्णवी बागेश्वरला श्रद्धांजली देण्यासाठी आणि रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी काल रात्री नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मेणबत्त्या लावून वैष्णवीला श्रद्धांजली वाहिली. तसेच रुग्णालयात तिची अवस्था कशी होती हे दाखवण्यासाठी एक छोटं पटनाट्यही केलं, सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून हे पटनाट्य आणि आंदोलन करण्यात आले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर एबीपी माझाने तिला व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे आणि तिचे आई वडील कशा पद्धतीने वीस तास अंबू बॅगने तिला कृत्रिम श्वास देत होते हे सत्य समोर आणले होते. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. लवकरच त्या चौकशी समितीचा अहवाल समोर येईल अशी शक्यता आहे.
Lumpy Disease : लम्पी संदर्भात डॉक्टर आणि स्टाफ उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले. ठप्प झालेला निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिला पाहिजे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. आजाराचा सामना करण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यातसह जनजागृती करायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी देशभरातून ठरावांची मालिका
दिल्ली राजस्थान छत्तीसगड पाठोपाठ आज महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणीत ठराव येणार
प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य ठरवण्याचे अधिकार सोनिया गांधींना
राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं असाही ठराव कार्यकारिणीत येणार
निवडणूक न लढण्यावर ठाम असलेले राहुल गांधी अनेक राज्यांच्या ठरावानंतर निर्णय बदलणार का याची उत्सुकता
उरुळी देवाची येथे खाजगी शिवशाही बस आणि ट्रक अपघात
अपघातात 52 वर्षीय प्रवाशी संजय भायदे यांचा जागीच मृत्यू
मृत भायदे यांना महामंडळाकडून तात्कालिक 10 हजारांची मदत
अपघातात चालकासह 6 जण जखमी
अपघातातील सृष्टी ठोंबरे यांना मोठी जखम झाल्याने तात्काळ नोबेल हॉस्पिटल हडपसर येथे दाखल करण्यात आलं
इतर जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु
रामदास कदम यांनी विचार करायला हवा त्यांनी जर त्यांच्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव वजा केला असता तर ते किती पद मिळवू शकले असते त्यांनी हट्ट न गुहागरची जागा स्वतःसाठी मागून घेतली आणि ते त्या ठिकाणाहून पराभूत झाले तरी देखील त्यांना विधान परिषदेची संधी देऊन पर्यावरण मंत्री पद देखील देण्यात आलं. माणूस ओळखी पालखीच्या आई-वडिलांच्या नजरेत उतरला तरी हरकत नसते मात्र स्वतःच्या नजरेत उतरला तर मात्र त्याचं जगणं व्यर्थ आहे. त्यामुळे आता कोणतीही टीका करताना त्यांनी थोडं भान बाळगायला हवं.
मुंबईच्या चेंबूर कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ मध्ये विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका मिळत नाहीत. मुंबई विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये इंग्रजीसोबत मराठीचा सुद्धा पर्याय द्यावा अशा प्रकारे सूचना देण्यात आले आहेत. मात्र या सूचनांचा पालन न करता कन्नड भाषिकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या चेंबूरमधील चेंबूर कर्नाटक संस्थेच्या अंतर्गत चेंबूर कर्नाटक कॉलेज ऑफ लॉमध्ये विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजीचा पर्याय ठेवण्यात आला असून मराठी प्रश्नपत्रिका देण्यास कॉलेजने नकार दिला आहे. विद्यापीठाने मराठी प्रश्नपत्रिकेचा पर्याय दिला असताना आणि विद्यार्थ्यांची मराठीत प्रश्नपत्रिका मिळावी यासाठी मागणी आहे. मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात असल्याचं या प्रकारातून समोर आला आहे.
महाराष्ट्रामधून वेदांता, फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुजरातमध्ये गेला. त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज बाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी विद्यार्थी वर्गाकडून "विनंती पत्रावर" स्वाक्षरी करुन घेत आहे. आता बेरोजगार तरुणांवर भजी विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना भजी देऊन राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. अनेक शाळांच्या मैदानामध्ये पावसाच्या पाण्यामुळे पाणी साचलं. काही शाळांमध्ये पाण्यामुळे मुलांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. ए.सी.पी.एम. मेडिकल कॉलेजचा संपर्क पुन्हा तुटला. सुमारे 400 विद्यार्थी आणि 200 च्यावर रुग्ण अडकले. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातच्या चहूबाजूंनी पाण्याचा वेढा आहे. शहरातील अनेक घरांमध्येही पाणी शिरलं आहे. अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा देऊळगाव राजा मेहकर लोणार आणि चिखली या तालुक्यात रात्री बारा वाजता ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सर्व जलाशय आणि सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहे. मेहकर तालुक्यातील कल्याणा गावात अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याची ही माहिती आहे. जवळपास तीन तासांत 115 मिलिमीटर पाऊस पडल्याने या परिसरात अतिवृष्टी घोषित करण्यात आली आहे.
पंढरपूरवरील पुराचा धोका टळला. उजनीच्या विसर्ग 71 हजार पर्यंत कमी केला तर वीरचा विसर्ग 15 हजार झालाय. व्यास नारायण वसाहती मधील स्थलांतर केलेले 57 कुटुंबे उद्या पूर ओसरल्यावर पुन्हा घरी परतणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास रखडला. जिल्ह्यातील 27 ऐतिहासिक स्थळांचा विकास रखडला. आघाडी सरकारने दिलेला निधी शिंदे सरकारने रोखला.
पावसामुळे मुंबईत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असून भाज्यांचे दर 40 टक्क्यांनी वाढले. नाशिक, पुणे, गुजरातहुन मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मुंबईतल्या भाजी मार्केटमध्ये मागील आठवड्याभरापासून राज्यभरात कोसळत असलेल्या पावसामुळे आवक 50 टक्क्यांनी घटली आहे. नाशिक,पुणे, गुजरातहून भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या आहेत, तर पावसामुळे अनेक भाज्या खराब झाल्या आहेत. पालेभाज्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत पूर्वीप्रमाणे भाज्यांची आवक मार्केटमध्ये पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे दर वाढलेले पाहायला मिळतील.
पक्षातील लोकांनी कारस्थान करुन मला मुख्यमंत्री पदावरुन काढले मात्र तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पराभव पत्करावा लागला, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. सोलापुरात महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे भारत गौरव पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी हे भाष्य केलंय. मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी ते चांगले काम केलं. पण यांना माहिती आहेत, आतली कारस्थान. मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढलं आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवलं.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यात एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठीत तसं नमूद केलंय. दशरथ लक्ष्मण केदारी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंत ही व्यक्त केलीये. कांदा-टोमॅटोचे ढासळणारे दर, कोरोना-अतिवृष्टीचं संकट आणि फायनान्स कंपन्या आणि पतपेढीवाले हफ्ता भरण्यासाठीचा ससेमिरा यामुळं पुरता बेजार झाल्याचं ही चिट्ठीत लिहून ठेवलंय. आम्ही भीक मागत नाही. अनेक संकटांचा सामना करत आम्ही शेतीत विविध पिकं लावतो, हा एक जुगाराचा प्रकारच आहे. अशा प्रकारांमुळं मी जीवनास कंटाळलो आहे. म्हणून आज मी आत्महत्येस करतोय. आम्हाला आमच्या हक्काचा बाजार भाव द्या. असं आत्महत्ये करताना त्यांनी मोदी सरकारकडे मागणी ही केली. तर जाता जाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही दिल्या.
मुंबईचा पश्चिम उपनगरातील दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरामध्ये चालत्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. रात्री उशिरा कांदरपाडा डी मार्ट समोरून जाणाऱ्या दुचाकीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. नागरिकांनी दुचाकीला लागलेली आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अनेकांच्या शर्तीचा प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्यामुळे बाईकस्वार घाबरला शिवाय आजूबाजूला असलेले नागरिकही भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले. या आगीमुळे दहिसर लिंक रोड वर काही वेळासाठी वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली होती.
पालघर जिल्ह्यातील बोर्डी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. बोर्डीकडून गुजरातकडे जाणाऱ्या वहिंद्रा पुलाच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते, तसेच खूट खाडी पुलाजवळ पाणी तुंबल्याने धुंडिया वाडी परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने ग्रामस्थांना सकाळच्या वेळी कामाला जाणे साठी मोठी कसरत करावी लागली. लावरीपाडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरले होते तर पुलाच्या स्लॅप स्लॅबपर्यंत पाण्याची पातळी वाढली होती.
राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींचा आज निकाल आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
धुळ्यात रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग बघावयास मिळाली आहे, शहरासह तालुक्यात रात्रभर चाललेल्या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने दिसून येत आहे, घरात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, घरात गुडघाभर पाणी साचल्याने घरातील बहुतांश सामानाचे नुकसान झाले आहे, घरातील इतर आवश्यक सामान वाचवण्यासाठी नागरिकांची कसरत सुरू असल्याचे दिसून येत आहे, हवामान विभागातर्फे दिलेल्या अंदाजानुसार धुळ्यात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र जलमय अशी परिस्थिती झाल्याचे बघायला मिळत आहे. शहरातील देवपूर परिसरासह सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.
विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे यांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी
पुण्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी धारधार कोयत्याने केक कापणारा आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 नं ताब्यात घेतलं आहे. अतिष लांडगे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्याकडून एक कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे शहरात गेले अनेक दिवसांपासून असे तलवारीने केक कापून व्हिडीओ वायरल करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्याच्यावर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे.
शिंदे फडणवीस सरकारच्या (Maharashtra Govt निर्णयामुळे सणासुदीच्या पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने पगाराचे पूर्ण पैसे न दिल्यामुळे पुढील महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार करायचे कसे असा महामंडळासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाने पैसे नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून 90 हजार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हफ्ताच जमा केला नसल्याची माहिती मिळाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, शेणगाव येथे 5 जनावरांना लागण
सांगली जिल्ह्यात लम्पी आजारांने आणखी दोन जनावरांचा बळी, नव्याने 16 जनावरे बाधित, 26 गावात संसर्गाचा प्रसार
Nandurbar News : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत कुपोषणावरुन सत्ताधारी, पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. एकट्या धडगाव तालुक्यात मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे असताना ठेकेदारांकडुन टीएचआर थेट रस्त्यावर फेकल्या जात आहे. तर काही ठिकाणी माल देखील कमी पोहोचत आहे, असा आरोप समाज कल्याण सभापत रतन पाडवी यांनी केला आहे. यामुळेच जिल्ह्यातील सर्व बाल विकास अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या क्षेत्रात वाढलेल्या कुपोषण संख्येबाबत जाब विचारण्यात आला. या प्रकरणी चौकशी समीती नेमून पंधरा दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही स्थायी समितीच्या सभेत देण्यात आले आहेत.
राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल पार पडल्या. त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होईल.
Pune News : पुण्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाला धारधार कोयत्याने केक कापणारा आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा आरोपी हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 च्या ताब्यात सापडला आहे. अतिष लांडगे असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एक कोयता आणि 500 रुपये असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे शहरात गेले अनेक दिवसांपासून असे केक कापून व्हिडीओ व्हायरल करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. बंजारा समाजाचे नेते तथा मंत्री संजय राठोड यांना धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरे वाशिमच्या बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील तीन महंताना राज्यात विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. नवरात्रीमध्ये तीन महंत शिवबंधन बांधणार असून राज्यभरातील हजारो बंजारा बांधव शिवबंधन बांधणार आहेत. पोहरादेवीचे तीन महंत कोण या बद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, पितृपक्ष पंधरवाडा असल्याने अद्याप महंताकडून निर्णय झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पितृपक्ष संपताच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता..
आज महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराला देशभरातील राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहतील. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी संध्याकाळी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर लंडनला पोहोचल्या आहेत.
राज्यात लम्पी आजाराची परिस्थिती पाहता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. इतर जिल्ह्यातील जनावरांना आता जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. इतर जिल्ह्यातील जनावरे रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत येणार नाहीत, यासाठी आता नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी आरटीओला दिले आहेत.
पुणे सासवड रोडवरील उरळी देवाची फाटाजवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर पुणे एसटीला आडवा आला. टँकरच्या ड्राइव्हरचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर एसटी चालक आणि एसटीतील 2 ते 3 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझालाही माहिती दिली.
आहेत.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ (Patra Chawl) घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊत यांची (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
पालघरमधील साधू हत्येच्या तपासाबाबत सुनावणी
पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी
राज्यातील १६ जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल पार पडल्या. त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होईल.
राज ठाकरेंचा नागपूर, चंद्रपूर दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नेतेमंडळींच्या भेटी घेणार आहेत.
शरद पवार सौलापूर दौऱ्यावर
शरद पवार यांच्या हस्ते कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये आ. कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा
कळंबमधील विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर सकाळी ११ वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे.
मनसेच्या वतीने कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर महामार्गावर असलेला किणी टोल नाका बंद करावा यासाठी मनसेनं लढा उभा केला आहे. आज मनसेच्या वतीने किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर आंदोलन
फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून फर्ग्युसन महाविद्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -