Maharashtra Breaking News 19 April 2022 : नालासोपारात नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2022 09:34 PM
नालासोपारात नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

 नालासोपारात नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नालासोपारातील आचोले रोड येथील ए वी क्रिस्टल या बांधकाम चालू इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन पडून, सखाराम बिराजदार या 38 वर्षाच्या मजूराचा मृत्यू झाला आहे. घटना दुपारी साडे तीनची आहे. मयत सखाराम हा इमारतीच्या डकमध्ये प्लाय जोडण्याच काम करत होता. त्यावेळी तोल गेल्याने त्याचा पडून मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. इमारतीच्या मालकाने मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, आसिफ शेख मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगांव शहर जिल्हाअध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेचा अभ्यास करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. आसिफ शेख यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. स्वतःच्या राजकीय फायदासाठी राज ठाकरे दोन समाजात तेढ निर्माण सलोख्याचे वातावरण दूषित करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप करत  राज यांच्या विरोधात मालेगावमधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

उल्हासनगरात दोन गटात हाणामारी, हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल

प्रेयसी कुणाची यावरून उल्हासनगर शहरात भर रस्त्यात दोन गटात हाणामारी झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


भानू कोरी या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. मात्र, काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकीब खान या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याचा राग भानूला आल्याने शाकीबला फोन करून उल्हासनगरच्या नेताजी चौकात बोलवले, मात्र भानू सोबत आधीपासून त्याचे मित्र होते. याची कुणकुण शाकीबला लागली होती. म्हणून शाकिब देखील आपल्या तीन मित्रांसोबत तिथे आला. या वेळी गिर्लफ्रेंड कोणाची यावरून दोन्ही गट एकमेकांसमोर येताच तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सांगली : भाजपच्या पोलखोल यात्रेवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपला टोला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले आता तरी भानावर येऊन विरोधी पक्षाचं काम करतील, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून भाजप पक्ष सतत हे सरकार पडावे म्हणून  सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Nashik : सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले दोन विद्यार्थी बुडाले

नाशिकच्या प्रसिद्ध सोमेश्वर धबधब्यावर दोन महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. आर्टिलरी सेंटर या लष्करी परिसरात राहणारे चार मित्र सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते, मात्र याचवेळी धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी या दोघांनी पोहोण्यासाठी पाण्यात उडी मारताच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. 24 वर्षीय धर्मेंद्रला वाचविण्यासाठी 22 वर्षीय आकाश पाण्यात उतरला होता मात्र तो ही परतला नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा शोध सध्या घेतला जातोय. धबधबा खळाळून वाहत असल्याने शोध कार्यास अडचणी येत असून गंगापूर धरणातून होणारा विसर्गही काही काळ बंद करण्यात आलाय. 

चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार, शिक्षकाने विद्यार्थिनींचा केला लैंगिक छळ

चंद्रपूरमधील जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. ए. के. राठोड असं या शिक्षकाचे नाव आहे. यासंबंधी जीवती पोलिस ठाण्यात ए. के. राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.  सदावर्ते यांच्या वकिलांना कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करणार आहे. ताबा घेण्यासाठी युक्तिवाद होणार  आहे.

Beed News Update : आमदार सुरेश धस यांना अटक पूर्व जामीन मंजूर 

Beed News Update : आमदार सुरेश धस यांना अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी न्यायालयाच्या आदेशाने सुरेश धस यांच्यावर 395 कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. सुरेश धस आणि इतर 38 जणांविरोधात बीड मधील आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. बीडमधील मनोज चौधरी यांच्या घराचे कंपाऊंड वॉल आणि बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर आहे.

Nanded : नांदेड जिल्ह्यात वन मजूरांचे वन विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन

नांदेड जिल्ह्यातील मुखेड, ईस्लापूर, हदगाव येथील वन मजूरांचे वन विभाग कार्यालया समोर धरणे आंदोलन सुरू आहे.  पंधरा वर्षापासून काम करणाऱ्या वन मजुरांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी केल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने मजुर आंदोलन करत आहेत. 

गावदेवी पोलीस आज वकील गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा कोठडी मागणार

गावदेवी पोलीस आज वकील गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा कोठडी मागणार आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत गिरगाव कोर्टात दाखल झाले आहेत. नवीन आरोपीच्या अटकेमुळे अधिक तपासासाठी वकील गुणरत्न सदावर्ते यांची पुन्हा पोलिस कोठडी मागणार आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी गर्भवती महिलेला दिला आरतीचा मान

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अंगारकी चतुर्थी निमित्ताने अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे तसेच हनुमान मंदिरात दर्शन घेतले. खासदार सुळे या अहमदनगर दौऱ्यावर असून त्यांनी माळीवाडा येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी विशाल गणपती मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या दर्शनासाठी मंदिरातील पुजारी भाविकांची रांग बाजूला करत असताना त्यांनी पुजाऱ्याला असं करू नका म्हटले, तसेच बाजूला करण्यात आलेल्या महिलांना पुन्हा दर्शन घेण्यासाठी त्यांनी पुढे केले.यातील एका गर्भवती महिलेच्या हातात पूजेचे ताट देत त्यांनी गणेश आरती केली. सोबतच त्यांनी या महिलेसाठी गणेशाजवळ प्रार्थना देखील केली. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरावरील आंदोलनप्रकरणी आणखी एकाला पोलिसांकडून अटक

Maharashtra News : महाराष्ट्र 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मंदिरात इफ्तार पार्टीचं आयोजन, हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा बुद्रुक येथील उपक्रम 

एकीकडे राज्यभरात हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोंग्यांवरून राजकारण पेटलं असताना हिंगोली जिल्ह्यातील केंद्रा बुद्रुक गावांमध्ये गावकर्‍यांनी चक्क मंदिरात एक इफ्तार पार्टीचं आयोजन केलं. या इफ्तार पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव उपस्थित सहभाग असल्याचे दिसून आलं. राज्यभरात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठणावरून राजकारण पेटलेलं असताना केंद्रा येथील गावकऱ्यांनी आनोखा आदर्श दिलाय.

पुणे : पाच मोरांचा उष्माघातामुळं मृत्यू

राष्ट्रीय पक्षी मोरांचा उष्माघातामुळं मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यातील खेड तालुक्यात पाच मोरांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर प्रकृती खालावलेल्या तीन मोरांना जीवदान देण्यात यश आलंय. अशी माहिती खेड तालुका वनविभागाकडून प्राप्त झालीये. दावडी गावातील परिसरात 16 आणि 17 एप्रिल ही बाब समोर आली. या परिसरात शंभरहून मोर असल्याची माहिती वनविभागाने दिली. आसपास पाण्याची सोय असल्याचा दावा वनविभागाने केलाय. मात्र उन्हाची वाढलेली तीव्रता मोरांच्या जीवावर बेतत आहे. सूर्य असाच आग ओकत राहिला तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यात उष्माघातामुळे पाच मोरांचा मृत्यू, तीन मोरांची प्रकृती खालावली

पुणे : राष्ट्रीय पक्षी मोरांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील खेड तालुक्यात पाच मोरांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर प्रकृती खालावलेल्या तीन मोरांना जीवदान देण्यात यश आलं आहे, अशी माहिती खेड तालुका वन विभागाकडून प्राप्त झाली आहे. दावडी गावातील परिसरात 16 आणि 17 एप्रिल रोजी ही बाब समोर आली. या परिसरात शंभरहून मोर असल्याची माहिती वनविभागाने दिली. आसपास पाण्याची सोय असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. मात्र उन्हाची वाढलेली तीव्रता मोरांच्या जीवावर बेतत आहे. सूर्य असाच आग ओकत राहिला तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिलला स्वतः मुंबईमध्ये उपस्थित राहणार

नवी दिल्ली : 24 एप्रिल रोजी मुंबईमध्ये लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहणार आहेत. देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा हा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत उपस्थित राहणार आहे. 24 तारखेला सकाळी त्यांचा काश्मीरमधला नियोजित कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मोदी काश्मीरवरुन मुंबईला येणार आहेत. या नियोजित काश्मीर दौऱ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील का याबद्दल साशंकता होती, मात्र आता ते मुंबईत येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

ST Strike : एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात, सोमवारी एका दिवसात एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर

ST Strike : एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर परतण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एका दिवसांत एसटी महामंडळातील 15 हजार 185 कर्मचारी हजर झाले आहेत. नव्याने हजर होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना एक दिवसाचे जुजबी प्रशिक्षण देण्यात येणारं. पुढील चार दिवसांत एसटी पूर्ण क्षमतेनं सुरू होईल असा एसटी प्रशासनाला विश्वास, आत्तापर्यंत 82 हजार 108 कर्मचाऱ्यांपैकी 61 हजार 647 कर्मचारी कामावर तर 20 हजार 461 कर्मचारी कामावर अद्याप बाकी आहेत. प्रशासकीय 12 हजार 6, कार्यशाळा 15 हजार 781, चालक 29 हजार 485 तर वाहक 24 हजार 826 कर्मचारी हजर आहेत. 

Maharashtra News : वकील गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, आज दुपारी सुनावणी

Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे संकेत, युतीबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती

Dilip Walse Patil : केंद्राकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण : दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil : केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. "राज्य सरकार नियमांनुसार सुरक्षा पुरवत असतं, राजकीय निर्णय नसतो," असंही ते म्हणाले. राज्यातील अनेक नेत्यांना मिळालेल्या केंद्राच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी बोट ठेवत हे मत मांडलं आहे. 

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी तब्बल 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या, जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर पोलीसांची करडी नजर

Mumbai Police : सध्या राज्यासह देशातील परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबई पोलिसांनी चार महिन्यांत एकूण 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. या अशा पोस्ट आहेत, ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत.

Kirit Somaiya : माझ्यावर केलेल्या 57 कोटींच्या आरोपांचे पुरावेच नाही, किरीट सोमय्यांचे ठाकरे सरकारला उत्तर

Kirit Somaiya : मी सगळ्या प्रकारच्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे, कोर्टाने चार दिवस आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीला दिले आहेत, चार दिवस रोज तीन तास त्यांना हवी ती माहिती घेऊ शकतात, असं वक्तव्य भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एबीपी माझा सोबत बोलताना केले आहे.

Pune News : पुण्यात मुळशी पॅटर्नची झलक, वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत पसरवणाऱ्या 4 मुलांना पोलिसांकडून अटक

Pune News : पुण्यात मुळशी पॅटर्नची झलक, वाढदिवसाचा केक कोयत्याने कापत दहशत पसरवणाऱ्या 4 मुलांना पोलिसांकडून अटक, हे सर्व तरुण 18 ते 21 वर्षाचे असून हा सर्व प्रकार पुण्यातील मुंढवा भागात घडला आहे. वीरेंद्र बाजीराव सस्ते, शशांक श्रीकांत नागवेकर, समीर विश्वजीत खंडाळे, सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शहरात या वयोगटातील मुलं पसरवत आहेत दहशत, भर रस्त्यात गाड्या उभ्या करून कोयते, तलवारी घेऊन केला जातोय वाढदिवस साजरा.

भंडाऱ्यात सिंलेडरच्या स्फोट होऊन घराला आग, संपूर्ण घर जळून खाक, हरदोली इथली घटना

भंडारा : सिंलेडरचा अचानक स्फोट होऊन घराला आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हरदोली (झंझाळ) इथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. हरदोली (झंझाळ) येथे चंद्रभान तानाजी गायधने यांच्या घरी कोणी नसताना अचानक रात्री चा सुमारास सिंलेडरचा स्फोट झाला. आगेची तीव्रता इतकी भीषण होती की आगीचे डोंब उठू लागले होते. दरम्यान संपूर्ण गावकऱ्यांनी बाजूला असलेल्या तलावातील पाणी आणून आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. मात्र आगेची तीव्रता इतकी भयंकर होती की संपूर्ण घर जळून राख झाले. यात चंद्रभान तानाजी गायधने यांचे अन्न धान्यसहित दागिने, रोख रक्कम जळून खाक झाल्याने लाखोंचं नुकसान झालं. आता पंचनामा करुन गायधने यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी जोर धरत आहे.

Coronavirus : दिल्लीमध्ये कोरोनाचा आलेख वाढताच

Corona in Delhi : देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना संसर्गात वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 501 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच, कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर 7.79 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विशेष म्हणजे हा संसर्ग दर आज जानेवारीनंतर सर्वाधिक नोंदला गेला आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1729 आहे. ही मार्चनंतरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत कोरोना संसर्गामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या राजधानीत 1729 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच रुग्णांमध्ये वाढ झाल्याने, होम क्वारंटाईनची संख्या देखील वाढली आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Beed News : पाटोद्यात गावकऱ्यांकडून सर्वधर्म समभावतेचा संदेश

Maharashtra Beed News : मागच्या काही दिवसांपासून मशिदींवर लावलेल्या भोंग्यांवरून राज्यभर राजकारण होताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांवरून अजान चालू असतानाच हनुमान चालीसासुद्धा पठण करण्यात आलं आणि यामुळे काही अंशी सामाजिक सलोखा बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झाली.


बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई जवळच्या पाटोदा गावात मात्र गावातील हरिनाम सप्ताहामध्ये रोजा धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंक्तीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एकाच मांडवाखाली हिंदूंसाठी प्रसाद तर मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक सलोखा राखत हिंदू-मुस्लीम बांधव या गावातील सणवार अगदी आनंदात साजरे करतात.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

Important days in 19th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 एप्रिलचे दिनविशेष...


1882 : चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ यांचे निधन


हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखवले. सन 1882 साली इंग्रजी निसर्गविज्ञानी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ तसेच, उत्क्रांती विज्ञानाचे जनक चार्ल्स डार्विन यांचे निधन झाले. 


1892 : शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म


ताराबाई मोडक यांचा जन्म इंदूर येथे 19 एप्रिल 1892 रोजी झाला. त्या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’म्हणतात. ताराबाईंना इ.स. 1962 साली ‘पद्मभूषण’हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल करण्यात आला. 


1910 : क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन


अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले. 


1957 : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म


मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल 500 कंपन्या आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी $97.4 अब्ज संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत.


1975 : आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला.


आर्यभट्ट् हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे. हया उपग्रहाचे प्रक्षेपण रशिया मधिल कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून 19 एप्रिल 1975 साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहकाद्वारे करण्यात आले.


19 एप्रिल : अंगारक संकष्ट चतुर्थी


अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रत कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरे केले जातो. संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी येते त्याला 'अंगारक योग संकष्ट चतुर्थी' असे म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे.


जागतिक यकृत दिन 


यकृतसंबंधी आजारांची माहिती होण्यासाठी 19 एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवी शरीरात यकृत (लिव्हर) महत्त्वपूर्ण अवयव आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.