Maharashtra Breaking News 16 July 2022 : NDA कडून जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
पंतप्रधान मोदी करणार बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन करणार आहेत. या द्रुतगती महामार्गाचे काम 28 महिन्यात पूर्ण झाले असून आता उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता जालौन जिल्ह्यातील उरईमधील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
शिंदे सरकारची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक
शिंदे सरकारची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक आहे. या बैठकीत ठाकरे सरकराने घेतलेल्या नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला जाणार आहे.
अन्नधान्य, डाळींवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी संघटनांचा बंद
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी उद्या देशव्यापी बंदची हाक दिलीय. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केलाय. त्यासाठी उद्या एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य
पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे.
मंकीपॉक्ससंदर्भात केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी
देशात केरळात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. केरळातील पाच जिल्ह्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. युएईतून आलेल्या एका 35 वर्षीय इसमाला संसर्ग झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.
बंदी असूनही तुंगारेश्वर येथे पर्यटकांची गर्दी, प्रशासनाचे दुर्लक्ष
वसईमधील प्रसिध्द पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे मान्सून कालावधीमध्ये सुरक्षेसाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने बंदी घातली आहे, असं असताना, शनिवारी विकेंडला तुंगारेश्वर येथे पर्यटकांनी तोबा गर्दी केल्याच दिसून आलं होतं. विशेष म्हणजे येथे वनरक्षक विभाग पर्यटकांकडून पौढांसाठी ५३ तर लहानांसाठी २८ रुपयाची कर आकारणी ही करत होतं. पावसाळा सुरु झाल्यानंतर वसई येथील तुंगारेश्वर या प्रसिध्द पर्यटन स्थळावर अनेक वर्षापासून लाखोच्या संख्येने पर्यटन सहलीसाठी येताता. परंतु हे स्थळ आता धोकादायक बनू लागले आहेत. या धबधब्यावर अनेक पर्यटकांचे जीव गेले आहेत. पोलिसांचा बंदी आदेश असताना ही येथे पोलीस बंदोबस्त नाही आहे. त्यामुळे पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. पोलीस आयुक्तालयातर्फे १४ जुलै ते २८ जुलै पर्यंत बंदी लागू असणार आहे.
उद्या आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार
उद्या आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार, सेमिस्टर एक आणि सेमिस्टर दोन समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर होणार आहे. काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) उद्या आयसीएसईच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. बोर्डाने यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोना परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात आयसीएसई दहावी बोर्डाची परीक्षा दोन सत्रात झाली होती पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे 2022 मध्ये झाली होती. आता या दोन्ही परीक्षांना समान वेटेज देऊन अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे.
Jagdeep Dhankhar : #NDA कडून जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
जगदीप धनकड हे उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार असतील अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.
Nagpur Covid Update : दिवसभरात 176 नव्या कोरोना बाधितांची नोंद
नागपूरः जिल्ह्यात दिवसभरात 176 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यात शहरातील 125 आणि ग्रामीण भागातील 51 बाधितांचा समावेश आहे. सध्या शहरातील सक्रिय कोरोनाबाधित संख्या 1077 वर पोहोचली आहे. यासोबतच आज 176 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 27 कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर 1050 कोरोना बाधित गृहविलगीकरणात आहेत.
गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आज राजीनामा सत्र
माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांमध्ये आज राजीनामा सत्र सुरु झाले आहे. शिवसेना धरणगाव शहर राजेंद्र महाजन, उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील यांनी सकाळीच राजीनामा दिला होता. त्यानंतर आता साळवा-बांभोरी गटाचे युवासेना विभाग प्रमुख नितीन पाटील आणि युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील यांनी आपापले राजीनामे पाठवले आहेत. यानिमित्ताने धरणगाव तालुक्यात शिवसेनेला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत.अजूनही गुलाबराव पाटील समर्थक अनेक कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याची चिन्हे आहेत