Maharashtra Breaking News 16 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Aug 2022 11:01 PM
 Nashik News : दिंडोरी तालुक्यात भूकंपाचे तीन सौम्य धक्के

 Nashik News :  मेरी येथील भूकंप मापक यंत्राचे अहवालानुसार आज रात्री 08.58 मिनिटांनी, 09.34 मिनिटांनी आणि 09.42 मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. या सौम्य धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे  3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेच्या पासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने माहिती दिली आहे.

#Maharashtra #MonsoonSession : मविआ सरकार अल्पमतात आल्यानंतर अनेक निर्णय घेतले: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक निर्णय घेतले, मग राजीनामा दिल्यानंतर घेतलेले निर्णय थांबवायचे नाहीत का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मविआच्या सरकारने अल्पमतात आल्यानंतर अनेक निर्णय घेतले, पण त्यांनी घेतलेले अत्यावश्यक निर्णय थांबवले नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

Maharashtra Monsoon Session : गेल्या 40 दिवसांत राज्याच्या हिताचे 750 निर्णय घेतले, आम्ही शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे: एकनाथ शिंदे

गेल्या दीड महिन्यांमध्ये राज्याच्या हिताचे 750 निर्णय आम्ही घेतले, त्यामध्ये शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. ज्यावेळी राज्यात अतिवृष्ठी झाली त्यावेळी आम्ही राज्यभर पोहोचलो. त्यानंतर आम्ही तातडीने निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतले असंही ते म्हणाले. राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

Maharashtra Monsoon Session : नैसर्गिक आपत्तीच्यावेळी आमचं सरकार लोकांपर्यंत पोहोचलं: देवेंद्र फडणवीस

विरोधक सत्तेत असताना त्यांनी जी कामं केली नाहीत त्या कामांची त्यांना आमच्याकडून अपेक्षा असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नैसर्गित आपत्तीच्या वेळी आमचं सरकार लोकांपर्यंत पोहोचलं असल्याचंही ते म्हणाले. 

Mumbai Traffic Update :  पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या वाकोला ते वांद्रे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Traffic Update :  मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीच्या दिशेनी जाणाऱ्या  वाकोला ते वांद्रे मार्गावर  मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाकोला उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज पसरल्यामुळे आज सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी आहे. वाकोला येथील पुलावर आज दुपारपासून खड्डा बुजवायचं काम सुरू होते. मात्र काही वेळापूर्वी खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण झाला आहे. खेरवाडी ते वांद्रे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी अजूनही आहेय आज सकाळपासून सहा ते सात तासापासून वाकोला, खेरवाडी,वांद्रे यादरम्यान मोठी वाहतूक कोंडी आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना एक ते दीड तास वाहतूक कोंडीमध्ये थांबावं लागत आहेत. त्यामुळे वाहन चालकाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे

Panvel Accident : उरण - पनवेल मार्गावर कारचा अपघात

Accident : जेएनपीटी - पनवेल मार्गावर कारचा अपघात झाला आहे.  पागोटेजवळील मार्गावरील पंजाब कॉनवेअर कंपनीजवळ कारचा अपघात झाला आहे. कारमधील दोनही प्रवासी सुखरूप असून कारचा टायर फुटल्याने गाडी पलटी झाली आहे.



विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी करावी; हर्षवर्धन पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची बीडमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी मेटे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी मेटे यांच्या अपघाताची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

Vinayak Mete Death : अपघात की घात? व्हायरल फोन क्लिपमुळे संशय बळावला; संपूर्ण प्रकाराची चौकशी करा

Vinayak Mete Death : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः मायकर यांच्याशी संवाद साधला आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Amul Milk Price Hike : दूध महागलं, प्रति लीटर दोन रुपयांनी दुधाचे दर वाढले

Milk Price Hiked : सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. दुधाचे दर (Milk Price Hike) वाढवण्यात आले आहेत. एकीकडे पट्रोल-डिझेलचे दर मागील काही काळापासून वाढताना दिसत आहेत. गॅस सिलेंडर, तेल, तसेच भाज्यांचे दरही अलिकडच्या काळात वाढलेले पाहायला मिळाले आहेत. त्यातच आता दुधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. देशभरात दूध पुरवठा करणारी सर्वात मोठी कंपनी अमूलने दूध दरवाढीचा निर्णय घेतला आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) अमूलने दुधाच्या दरात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे अमूल दुधाच्या (Amul Milk) दरात वाढ दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर आशिष शेलारांचं लक्ष्य

Dahi Handi : आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजप (BJP) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आणि थेट शिवसेना (Shiv Sena) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मतदारसंघाकडे लक्ष वळवलं आहे. माजी पर्यटन आणि पर्यावरण आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी (Worli) या मतदारसंघात भाजपने भव्य दहीहंडी (Dahi Handi 2022) सोहळ्याचं आयोजन केलं आहे. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपची दहीहंडी होणार आहे. विशेष म्हणजे वरळीत शिवसेनेचे तीन आमदार असतानाही आता दहीहंडीसाठी त्यांना दुसरं मैदान शोधावं लागत आहे. त्यामुळे दहीहंडीवरुन वरळीत राजकीय काला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खाते वाटपावर आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराज नाही : शंभूराज देसाई

उद्या अधिवेशन सुरु होणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता सर्व विरोधी पक्षनेत्यांना चहापानासाठी बोलावलं आहे. आज कॅबिनेट बैठक होईल. यामध्ये पुरवणी मागण्यांबाबात देखील चर्चा होईल. 17 ते 25 पर्यंत अधिवेशन पार पडेल. येणाऱ्या अधिवेशनाला मंत्रिमंडळ अभ्यासपूर्ण सामारं जाईल. आमच्या नऊपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. जाणीवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी आमचे पूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले होते. आम्ही तसा ठराव देखील केला. त्यामुळे कोणीतरी अशा वावड्या उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं.

वर्ध्यात भदाडी नदीच्या पुलावर कार डिव्हायडरला धडकून भीषण अपघात, दोघे गंभीर जखमी

Wardha News : भदाडी नदीच्या पुलावर स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला. अपघातात कार अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरला धडकली. त्यामुळे गाडीतील दोघेजण गंभीर जखमी झाले. भरधाव चारचाकी वर्ध्याच्या दिशेला येत असताना चालक वैभव बोधलकर आणि योगेश चावके (दोघेही राहणार यवतमाळ) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. भरधाव कार डिव्हायडरवर धडकल्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चुराडा होऊन मोठे नुकसान झालं आहे. सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा अपघात झाला.



Maharashtra Politics: अडीच वर्ष निर्णय न घेणारे आज तत्वज्ञान शिकवत आहेत, सुधीर मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Maharashtra Politics: अडीच वर्ष निर्णय न घेणारे आज तत्वज्ञान शिकवत आहेत, सुधीर मुनगंटीवार यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

बुलडाणा नव्हे आता बुलढाणा लिहावं लागणार! जिल्हा प्रशासनाने केला बदल

Buldhana News : एकेकाळी थंड हवेचं ठिकाण असलेल्या आणि इंग्रजांच्या काळात जिल्हा मुख्यालय झालेल्या 'भिलठाणाचे' कालांतराने नामकरण झालं. मात्र बुलडाणा की बुलढाणा अशी चर्चा अजूनही सुरुच होती. त्यामुळे शासकीय कामकाजात कुणी 'बुलडाणा' लिहीत असे तर कुणी 'बुलढाणा'. मात्र आता यापुढे 'बुलढाणा' असंच नामकरण योग्य आहे आणि तसा गॅझेटमध्येही उल्लेख असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सर्व कार्यालयांना दिली आहे. त्यामुळे आता यापुढे सर्वच कार्यालयीन कामकाजात 'बुलडाणा' ऐवजी 'बुलढाणा' असं लिहिण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. तसा बदल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील फलकावर सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे सर्वांना 'बुलडाणा' ऐवजी 'बुलढाणा' असा उल्लेख करावा लागणार आहे.


 



 


 



शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दापोलीतील रिसॉर्ट दोन-चार दिवसांत पाडण्याचा अंतिम आदेश अपेक्षित आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. या संदर्भात पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. दरम्यान याआधी ईडीने दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी परब यांच्यावर कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.


पर्यावरण मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहोत...



औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर 6 नराधमांकडून अत्याचार

Aurangabad News : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अल्पवयीन मुलीवर सहा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. कन्नड ग्रामीण पोलिसांनी या सहाही आरोपींना ताब्यात घेतलं असून, यात एका विधीसंघर्ष बालकाचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा नराधमांनी अत्याचार केल्यामुळे पीडितेला वेदना असह्य झाल्या आणि त्यानंतर या मुलीने ही संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली. त्यानंतर आईने कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे गाठलं आणि मुलीसोबत घडलेली हकीकत सांगत या सहा नराधमांविरोधात तक्रार दिली. 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती तर काल म्हणजेच 15 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला.

अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे आज गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज भूजमधील एका बैठकीमध्ये भाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी केजरीवाल मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 


Bihar Politics : नितीश कुमार-तेजस्वी यादव मंत्रिमंडळाचा विस्तार आज

Bihar Politics : बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चिच झाला आहे. यानुसार राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) 15 मंत्री आणि संयुक्त जनता दल (JDU)चे 12 मंत्री असणार आहे. या शिवाय कॉंग्रेसच्या दोन, हम पार्टीच्या एक आणि अपक्ष एका आमदराला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.  

विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद

महाराष्ट्र विधानमंडळाच्या 17 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.  

Monsoon Session : आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान

Monsoon Session : राज्याचे पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता  सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत... 


आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान
राज्याचे पावसाळी अधिवेशन बुधवार 17 ऑगस्ट पासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता  सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. खातेवाटपानंतरची ही पहिलीच बैठक असेल. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.


विरोधी पक्षनेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानमंडळाच्या 17 ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.  


नितीश कुमार-तेजस्वी यादव मंत्रिमंडळाचा विस्तार आज
बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चिच झाला आहे. यानुसार राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) 15 मंत्री आणि संयुक्त जनता दल (JDU)चे 12 मंत्री असणार आहे. या शिवाय कॉंग्रेसच्या दोन, हम पार्टीच्या एक आणि अपक्ष एका आमदराला मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.  


बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांच्या नावावर एकमत झाले आहे. अवध बिहारी चौधरी हे यादव समाजाचे आहे. नव्या मंत्रिमंडळात तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री आहेत. तेजस्वी यांचे भाऊ तेज प्रताप यादव हेही मंत्री असणार आहेत. आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र सुधाकर सिंह यांची बिहारच्या मंत्रिमंडळात नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यासोबतच महागठबंधन सरकारमध्ये मंत्रीपदासाठी डॉ. चंद्रशेखर यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. डॉ. चंद्रशेखर हे मधेपुरा येथील यादव समाजाचे आहेत. डॉ. चंद्रशेखर हे यापूर्वी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 


अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे आज गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज भूजमधील एका बैठकीमध्ये भाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी केजरीवाल मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.