Maharashtra Breaking News 15 July 2022 : राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2022 10:47 PM
वरकुटे खुर्द हद्दीत निराडावा कालव्याला भगदाड...लाखो लिटर पाणी वाया

इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द गावात निरा डावा कालव्याला मोठे भगदाड पडले असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेततळ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. आज सायंकाळी वरकुटे खुर्द पत्रेवस्ती या ठिकाणी निरा डावा कालव्याच्या एक भरावा अचानक खचून त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे कालवा मोठ्या प्रमाणात खचू लागला आहे. वाहून जाणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या ढोबळी ,मका ,ऊस,डाळिंब  आधी पिकांमध्ये गेले असून शेततळ्याचे  मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच सलग चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले होते त्यात कालवा फुटल्याने आणखी भर पडून मोठे नुकसान झाले आहे.  दरम्यान जलसंपदा विभागाकडून पाण्याच्या स्त्रोत दुसरीकडे वळवण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. उद्या दुपारपर्यंत हे काम पूर्ण होणार असून सध्या पाण्याचा विसर्ग वीर धरणातून कमी करण्यात आला आहे, तसेच पाणी ओढ्या मार्फ़त सोडून देण्यात आलं असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे..

श्रीनिवास वनगा एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना

पालघर मधून शिवसेनेचे काही नगरसेवक ,पदाधिकारी ,जिल्हा परिषद सदस्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी करिता मुंबईत गेल्याची माहिती मिळत आहे.पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा ही मुंबई कडे रवाना

Nagpur Covid Update : जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या हजारापार, दिवसभरात आढले 188 नवे बाधित

नागपूरः जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या हजारापार पोहोचली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 188 नव्या बाधितांची नोंद झाली. तर आज 142 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 24 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 989 बाधित गृहविलगीकरणात आहेत.

Sharad Pawar : आमची भविष्यातील दिशा उद्या दिल्लीत ठरेल: शरद पवार

नागपूर : एखाद्या सदस्याने सभागृहात मागणी केली आणि ती मान्य झाली नाही किंवा संसदेत एखादी गोष्ट न पटल्यास सभात्याग करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. लोकशाहीमध्ये हा अधिकार सभागृहाच्या प्रत्येक सदस्याला आहे. साधारणतः त्या परिसरात महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. सभात्याग करून सदस्या त्या पुतळ्याजवळ जाऊन बसतात आणि आपला विरोध दर्शवतात, निदर्शने करतात. हे घटनाबाह्य कृत्य नाही, तर त्या सदस्यांचा अधिकार आहे. आता जर यावरही बंदी आणली जात असेल, तर हा लोकशाहीसाठी मोठा धोका होणार आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

Maharashtra Budget Session 2022 : राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले

Maharashtra Budget Session 2022 : सोमवार 18 जुलै 2022 पासून सुरु होणारं राज्याचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.  

Latur News : लातूरमध्ये युवा सेनेत बंडखोरी, 40 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी केला उठाव

राज्यातील सरकार गेल्यानंतर आता शिवसेनेला ठिकठिकाणी खिंडार पडत असून आता युवा सेनेत ही हेच घडताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील युवा सेनेचे पदाधिकारी ही आता शिवसेनेला जय महारष्ट्र करत शिंदे गटात सामील होत आहेत. 40 पेक्षा जास्त युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उठाव केल्याचं दिसून आलं. यामध्ये जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्याही समावेश होता.

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ३० संप्टेबर पर्यंत पुढे ढकलल्या. पूर आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. सुमारे आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या.

नामांतरची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नामांतरची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने करणार असून याबाबतची उद्या अधिकृत घोषणा करणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

50 आमदारांना जबरदस्ती करणं कसं शक्य आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रश्न 

50 आमदारांनी  माझ्यावर विश्वास ठेवला. शिवसैनिकांनी मला प्रोत्साहन दिलं. परंतु, आमदारांवर जबरदस्ती करण्यात आली असा आरोप केला जात आहे.  मात्र, 50 आमदारांना जबरदस्ती करणं कसं काय शक्य आहे? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलाय. 

शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर खपवून घेणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा

शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर हल्ला झालाय. काल रात्री ही घटना घडली आहे. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर खपवून घेणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या हल्ल्यानंतर दिलाय. 

Nagpur Rains : घराची भिंत कोसळ्याने एकाचा मृत्यू

नागपूरः अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाबुलखेडा (Babulkheda) मध्ये गुरुवारी रात्री उशीरा एका घराची भिंत कोसळली. त्यामुळे पूर्ण कुटुंबिय याखाली दबले होते. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी व मुलगा जखमी आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

High Court : केळीबागच्या दुकानदारांना हायकोर्टाचा झटका, जमिन अधिग्रहणाबाबत दिलासा नाहीच

नागपूरः रस्ता रुंदीकरणासाठी होणाऱ्या जमिन अधिग्रहणाबाबत सरकारच्या निर्णयाविरोधात गेलेल्या केळीबाग परिसरातील दुकानदारांना हायकोर्टाच्या (High Court) निर्णयाने झटका बसला आहे. याचिकेत मेरिट नसल्याने सर्व याचिका फेटाळून लावल्या. व्यापाऱ्यांनी रस्ता रुंदीकरणासाठी होणाऱ्या जमिन अधिग्रहणाविरोधात व्यापाऱ्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांनी या परिसरात किरायाने दुकाने दिली आहे. त्यांनी याचिकेत (Petition) दावा केला होता की, जिल्हाधिकारी यांनी जमिन अधिग्रहणाबाबत कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही. तसेच दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.

CBI : दिल्लीच्या सीबीआय चमूचे नागपूरात तपाससत्र, चार दिवसांपासून व्यापाऱ्यांची चौकशी

नागपूरः राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातील व्यापारी सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर आहेत. मुंबईच्या चमूने बँकेच्या फसवणूक प्रकरणात चौकशी वगळता. दिल्लीची सीबीआय (CBI) चमू चार दिवसांपासून नागपूरात तळ ठोकून आहे. दिल्लीच्या चमूकडून शिवानी ऑइल प्रकरणात नागपूरच्या चार व्यापाऱ्यांकडून कसून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडामधील काही मुख्य चौकात आज जमावबंदीचे आदेश, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

Amravati Paratwada Section 144 : आज अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे काही मुख्य चौकात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. यावेळी परतवाडा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अमरावती येथे घडलेल्या उमेश कोल्हे आणि उदयपूर येथे घडलेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी शक्ती फाउंडेशन तर्फे परतवाडा येथील जयस्तंभ चौक येथे जमा होऊन राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या नावाने मोठ्या संख्येने पोस्टकार्ड पाठवून आंदोलन केल्या जाईल. परतवाडा पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. अचलपूर आणि परतवाडा हे शहर संवेदनशील असल्याने इथली स्थिती शांत आणि नियंत्रित राहावी म्हणून काही चौकात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अचलपूर उपविभागीय अधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले. कुठेही पाचपेक्षा अधिक जणांना जमा होता येणार नाही.

देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

देशात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढतोय तर दुसरीकडे मंकीपॉक्स व्हायरसचाही धोका आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 38 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी 20 हजार 139 रुग्ण आणि 38 रुग्णांचा मृत्यू झाला. तुलनेनं कोरोना रुग्ण संख्या काही अंकानी घटली असली, तरी वाढत्या मृत्यूच्या संख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा





CA Exam Result : CA चा निकाल जाहीर, मुंबईचा मित शाह देशात पहिला

CA Exam Result : CA चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. ICAI ने, CA अंतिम निकाल (ICAI CA Result 2022) आज घोषित केला आहे. सीएची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली. मुंबईचा मित शाह देशात पहिला आला आहे. 



  • ग्रुप -1 निकाल -21.99टक्के

  • ग्रुप 2 निकाल- 21.94 टक्के


दोन्ही ग्रुपचा निकाल -12.59 टक्के

Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरुच

Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर वर-खाली झालेले नेहमीच पाहायला मिळतात. मागच्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात किंचित तुलनेने वाढ असायची किंवा किंचित घट असायची. मात्र, काल (गुरुवार) पासून सोन्या-चांदीच्या दराने तर नवीन उच्चांक पातळी गाठली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या दरात तब्बल अधिक 2 हजारांनी वाढ झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.95 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 57,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. तर एक किलो चांदीचा दर 64,740 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 


तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 









































शहरसोने1 किलो चांदीचा दर 
मुंबई 52,79164,740
पुणे52,79164,740
नाशिक 52,79164,740
नागपूर52,79164,740
दिल्ली52,70864,630
कोलकाता 52,72764,650

Sansad : आता संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषणं करण्यावर बंदी, धार्मिक कृती करण्यासही मनाई

Loksabha and Rajya Sabha : संसदेचं पावसाळी (Sansad Monsoon Session) 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच संसद परिसरात कोणतीही धार्मिक कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Nagpur Rain : नागपूरमधील जुनापाणी गावात तलाव फुटला, 15 शेळ्या गेल्या वाहून, शेतीचही मोठं नुकसान

Nagpur Rain : नागपूर ग्रामीण तहसीलमधील जुनापाणी या गावातील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आज सकाळी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे गावातील 15 शेळ्या वाहून गेल्या आहेत. गावकऱ्यांनी वेळीच गावाजवळच्या उंच भागाकडे धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलावातून पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने तसेच शेतीच्या दिशेने आला. यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. शेतात माती आणि चिखल सर्वत्र पसरला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ICAI CA Final Result 2022 : CA चा निकाल जाहीर; कसा पाहाल निकाल? जाणून घ्या

ICAI CA Final Result : CA चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. ICAI ने, CA अंतिम निकाल (ICAI CA Result 2022) आज घोषित केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीएची अंतिम परीक्षा 14 ते 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Petrol-Diesel Price : राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी कपात; तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

Maharashtra Petrol-Diesel Price 15th July 2022 : शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. त्यानंतर बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, काल (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्याची घोषणा केली. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

...तर 'हे' सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर थेट निशाणा

Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Government : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. तर राज्यातलं सरकार गोंधळलेलं आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारची स्थगिती

Mumbai News : ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयाला शिंदे सरकारची स्थगिती. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादच धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत दिली स्थगिती. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता आक्षेप. हे तीनही नामांतराचे निर्णय शिंदे सरकार पुन्हा नव्याने घेणार असल्याची सूत्रांची माहिती

Petrol-Diesel Price : आजपासून राज्यात पेट्रोल 5, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

Petrol-Diesel Price 15th July : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून राज्यात पेट्रोल (Petrol Price) 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. अशातच महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग 55व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये असून 84.10 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल (Diesel Price) 79.74 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Buldana News : सिंदखेडराजा येथील प्रसिद्ध चांदणी तलावाची भिंत कोसळली

Buldana News : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक अशा चांदणी तलावाची भिंत कोसळली आहे. सिंदखेडराजा हे ऐतिहासिक शहर असून याठिकाणी पुरातन अशा अनेक वास्तू आहेत. काही दिवसांपूर्वी येथील रामेश्वर मंदिराची भिंत मुसळधार पावसानं कोसळली होती आणि आता प्रसिद्ध अशा चांदणी तलावाची भिंत कोसळली. यामुळे दिवसेंदिवस एक एक अशा पुरातन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती येथील नागरिक करत असल्यानं पुरातत्व विभागानं याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. 

Maharashtra Political News : नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवड करणे हा निर्णय अत्यंत चुकीचा : जयंत पाटील

Maharashtra Political News : जयंत पाटील हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते शासकीय निवास स्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यानंतर ते माध्यमांशी बोलले. त्यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारनं घेतलेला नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवड करणं, हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. तसेच, महाराष्ट्रात पूर परिस्थिती आहे. गेले 15 दिवस झाले यांचा मंत्रिमंडळ विस्तार नाही, महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण होत आहे आणि या परिस्थितीत सरकारमध्ये फक्त दोघंच जण आहेत. मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री ही अतिशय चिंतेची बाब आहे. 

Goa News : गोव्यात ॲप आधारित टॅक्सी सेवेला हिरवा कंदील

Goa News : गोव्यात आधारित टॅक्सी सेवेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुद्धा गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांनी एक मताने याला मंजुरी दिली. त्यामुळे याचा फायदा गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांना होणार आहे.

Free Corona Booster Dose : देशभरात आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव'; पुढील 75 दिवसांसाठी 'मोफत बूस्टर डोस'

Free Corona Booster Dose : तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी (Covid-19) लढा देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 'बूस्टर डोस' (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. या 75 दिवसांत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Ivana Trump Passes Away : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचं निधन

Ivana Trump Passes Away : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प (Ivana Trump) यांचं न्यूयॉर्क शहरात निधन झालं. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इव्हाना यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, इव्हाना ट्रम्प एक अद्भुत आणि सुंदर महिला होती. जी एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगली. इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केलं की, त्यांची पहिली पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे गुरुवारी वयाच्या 73 व्या वर्षी न्यूयॉर्क शहरात निधन झालं.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...


पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू


मध्यरात्रीपासून पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल तीन रुपयांनी कमी केल्याचा निर्णय काल जाहीर केला होता
 
आजपासून 75 दिवस मोफत बूस्टर डोस 


केंद्र सरकारकडून आजपासून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढचे 75 दिवस बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर 30 सप्टेंबरपर्यंत हा मोफत डोस मिळणार आहे.  


आज देवेंद्र - राज यांची भेट


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज भेट होणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी 11 वाजता दोघांची भेट होईल. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ही भेट रद्द झाली होती. नवीन सत्ता स्थापनेनंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे.


आज राज्यात कुठेही रेड अलर्ट नाही..मात्र, काही ठिकाणी पूरस्थिती कायम


 आज रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. 


रुपयाची ऐतिहासिक पडझड


रुपया डॉलरच्या तुलनेत  79.88  वर बंद झालाय. रुपया डॉलरच्या तुलनेत लवकरच 80 रुपया पार करेल अशी शक्यता आहे. मागील काही महिन्यात रुपयाचे घटते मूल्य चिंताजनक जरी असले तरी आरबीआय रुपया अजूनही मजबूत असल्याचं सांगतेय. इतर 40 देशांच्या चलनाशी रुपया अजूनही पत टिकवून आहे. अन्यथा तो 90 पर्यंत खाली गेला आहे.


नागपुरात शरद पवार आणि संजय राऊत


नागपुरात संजय राऊत शिवसेनेच्या नागपूरमधील वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तसेच आज शरद पवार नागपुरात पोहचणार आहेत. दोघेही एकाच हॉटेलमध्ये आहेत.  त्यामुळे नागपुरातही दोघांची भेट होणार आहे. एका कृषी पुरस्कारांच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
 
'देशात विदर्भासह 75 वेगळी राज्य करा' काँग्रेस मोदींना पत्र लिहिणार? 


 देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही देशभरात सुरू आहे. मात्र, देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली असून, राज्यांचे नियोजन अधिक योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी देशात देशात विदर्भासह 75 वेगळी राज्यं करा, अशा आशयाचे पत्र काँग्रेसकडून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे,अशी माहिती आशिष देशमुख यांनी दिली आहे. तसेच स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी रणनीतिकार प्रशांत किशोर सक्रीय होणार असल्याचे सांगितले जात आहे. 


 केतकी चितळेची 22 गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका


 शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेनं तिच्याविरोधातील 22 गुन्हे रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच एक नव्यानं अवमान याचिकाही केतकीच्या वतीनं दाखल केली जाणार आहे. या याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 
 
आज रिलीज होणाऱ्या वेब सिरीज, सिनेमा


मिताली राज च्या जीवनावर आधारित चित्रपट 'शाबाश मिठू' आज रिलीज होतोय. यात मिताली च्या भूमिकेत तापसी पन्नू आहे. 
'हिट-द फस्र्ट केस' हा राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांचा सिनेमा आज रिलीज होतोय.  हा सिनेमा 'हिट' या तेलुगू चित्रपटाचा रीमेक आहे.
पंचायत फेम जितेंद्र कुमारचा जादूगर हा सिनेमा नेटफ्लीक्सवर रिलीज होणार आहे. 
कॉमिक्सतान' सीजन 3 अमेझॉनवर रिलीज होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.