(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Assembly Session : आज विधिमंडळात पुन्हा गदारोळ? फडणवीसांच्या चौकशीमुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी, नवाब मलिक यांचा राजीनामा आदी मुद्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनही विधीमंडळात विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देतं याकडेही लक्ष लागले आहे. मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकिलांवर आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी त्यांनी 125 तासांची व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. फडणवीस यांच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार काहीसं बॅकफूट गेलं असल्याचे चित्र होते. रविवारी, पोलीस बदली कथित घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी दोन तास चौकशी केली. फडणवीस यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला होता. तर, फडणवीस यांना याआधी 6 वेळेस नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नसल्याने पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला असल्याची माहिती सरकारने दिली.
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन यांच्यात आज पुन्हा चर्चा; तोडगा निघणार?
युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरूच आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, पण रशियाचे हल्ले कमी होण्याचे नाव घेत नाहीत आणि युक्रेनही हार मानायला तयार नाही. दोन्ही देशांमध्ये चर्चाही झाली असली, तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. आज पुन्हा दोन्ही देशांमार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धावर होणारी चर्चा सोमवारी 10:30 वाजता (स्थानिक वेळेनुसार) व्हिडीओ लिंकद्वारे सुरू होईल. युक्रेनच्या शिष्टमंडळाच्या हवाल्यानं स्पुतनिकनं हे वृत्त दिलं आहे.
Parliament Budget Session : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात,
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात आणि युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणे यासह अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय प्रस्तावांना संसदेची मंजुरी मिळवणे तसेच जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी अर्थसंकल्प सादर करणे हे सरकारच्या अजेंड्याच्या शीर्षस्थानी असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी जम्मू आणि काश्मीरसाठी अर्थसंकल्प सादर करतील. दुपारच्या जेवणानंतरच्या कामकाजादरम्यान सभागृहात त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मोहोळजवळ दुचाकी आणि कंटेनरच्या अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
मोहोळजवळ दुचाकी आणि कंटेनरच्या अपघात झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीओ अधिकारी राजेश अहुजा, शिवाजी सोनटक्के, तसेच त्यांच्या गाडीतील आरटीओचे इतर कर्मचारी आणि कंटेनर ट्रक चालक विरोधात गुन्हा नोंद
द्राक्ष बागायतदार मोहन आदमाने यांच्या मृत्यूस आरटीओ अधिकारी आणि कंटेनर चालक कारणीभूत असल्याचा आरोपी
मृताचे नातेवाईक अमोल आदमाने यांच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भांदवि 304 अ, 283, 427 तसेच मोटारवाहन अधिनियम च्या विविध कलमनुसार गुन्हा नोंद
Navi Mumbai - महानगर पालिकेच्या 7 हजार कंत्राटी कामगारांचे बेमुदम कामबंद आंदोलन सुरू
Navi Mumbai - विविध मागण्यांसाठी आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 7 हजार कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेय. कोविड मुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत देणे, कोविड काळात काम केल्याबद्दल कोविड भत्ता देणे व कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी आजपासून आंदोलन पुकारण्यात आलेय. नवी मुंबई मनपा मध्ये कंत्राटी पद्धतीवर विविध विभागात काम करणाऱ्या 7000 कंगारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. यात 4 हजार पेक्षा अधिक सफाई कर्मचारी आहेत. या आंदोलनाबाबत योग्य तोडगा न काढल्यास हे आंदोलन डोईजड होण्याची शक्यता असून मनपा आयुक्त अभिजीत बांगर आडमुठे पणाचे धोरण अवलंबत असल्याची टीका कामगार नेत्यांनी व्यक्त केलेय.
बारावीच्या पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पोलिसात अद्यातविरोधात गुन्हा दाखल होणार
बारावीच्या पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघड शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पोलिसात अद्यातविरोधात गुन्हा दाखल होणार,बोर्डाकडून माहिती
Pune Junner Accident : पुण्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
Pune Junner Accident : पुण्याच्या जुन्नर तालुक्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. बदगीच्या घाटात ही दुर्दैवी घटना घडली. नवनाथ हुलावळे आणि राहुल हुलावळे अशी मृतांची नावे होती. स्कॉर्पिओ गाडीतून हे दोघे अकोले जिल्ह्यातील त्यांच्या गावी निघाले होते. तेव्हा बदगीच्या घाटात गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी तीनशे फूट दरीत कोसळली. खाली जाऊन गाडी एका झाडावर लटकली, यात अपघातात एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
SSC EXAM : उद्यापासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होणार, गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून भरारी पथकांची नेमणूक
SSC EXAM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. उद्या पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.