Maharashtra Breaking News 12 April 2022 : दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Apr 2022 11:21 PM
नेरळ ते भिवपुरी रेल्वे स्थानका दरम्यान तरुणीचा रेल्वेरुळानजीक मृत्यू

नेरळ ते भिवपुरी रेल्वे स्थानका दरम्यान तरुणीचा रेल्वेरुळानजीक मृत्यू झाला आहे. मंगला शिरोडकर असे या तरुणीचे नाव आहे. 

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. त्यांना उपचारासाठी ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना साधारणपणे साडे सहा वाजता हृदय विकाराचा झटका आला होता. सध्या त्यांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. पुढील 7 दिवस सक्तीच्या विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

Load Shedding : अघोषित भरनियमनाने शेतकरी त्रस्त

यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक महावितरणच्या अघोषित भारनियमनाला वैतागले असून, गेल्या महिन्याभरापासुन सुरू असलेला विजेचा लपंडाव पाहता जनतेत महावितरणच्या तुघलकी कारभाराबाबत रोष निर्माण झाला आहे. विशेषतः शेतकरी वर्गावर मोठे संकट निर्माण झाले आहे. पालेभाज्या, फळबाग आणि उन्हाळी पिकांना सिंचनाची नितांत आवश्यकता असताना शेतकऱ्यांना वीज नसल्याकारणाने मोठी अडचण निर्माण होत आहे. भारनियमनाचे वेळापत्रक पाळल्या जात नसून, कधी रात्री-अपरात्री वीज राहते तर कधी दिवसादेखील वीज पुरवठा खंडित राहत असल्याने पिकांना ओलिताची सोय करायची तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांकडे उभा ठाकला आहे. शेतीतील पीक उन्हाच्या वाढत्या तडाख्याने व भारनियमनामुळे ओलित होऊ न शकल्याने डोळ्यादेखत सुकत आहे

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भाजपा नेते आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या बद्दल शिवराळ भाषा

भाजपाचे काही नेते सध्या पिसाळलेलं कुत्र्यासारखे राज्याला वागवत आहेत. शरद पवार साहेबांच्या कामाची उंची 'हे' नालायक कधीच समजू शकणार नाहीत. दारू पिऊन त्या गुणरत्न सदावर्ते च्या सांगण्यावरून साहेबांच्या घरावर हल्ला करतो ही मर्दांगी नाही गुणरत्न सदावर्ते हा कुणाचा कुत्रा आहे हे माहीत नाही का...? मराठा समाजाला आरक्षण यांच्या मुळेच मिळालं नाही. राज्यात दंगली घडवून भाजपाला राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं लक्ष काही भाजप नेत्यांचं असल्याचा आरोप बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला असून यावेळी त्यांनी भाजपा नेते आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या बद्दल शिवराळ भाषेचा वापर केला आहे.

Neelam Gorhe : पीडित तरूणी जे आरोप करत आहे, त्यावरही विश्वास ठेवायला हवा : नीलम गोऱ्हे  

Neelam Gorhe : रधुनाथ कुचीक प्रकरणातील पीडित तरूणी जे आरोप करत आहे, त्यावरही विश्वास ठेवायला हवा असे शिवसेना उपनेत्या  नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. याबरोबरच पीडित तरूणीच्या जखमांचं भांडवल केलं जातय असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.   

नराधम बापाकडून आईला अमानुषपणे मारतानाचा व्हिडिओ शूट करून चिमुरडीने केला व्हायरल

धुळे शहरातील आजाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका नराधम पतीने आपल्या पत्नीला क्रूरपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महेंद्र जगताप असं या क्रूर पतीचं नाव आहे. 

Chitra Wagh :  रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात विशिष्ट जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले, पीडित तरूणीचा आरोप

Chitra Wagh :  शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीनं एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात विशिष्ट जबाब देण्यास भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाग पाडल्याचा आरोप या तरुणीनं केलाय. तसंच या प्रकरणात मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचा दावा या तरुणीनं केला. या आरोपानंतर चित्रा वाघ यांनी 'मी चौकशीसाठी तयार' असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

Chitra Wagh : मी सर्व चौकशीसाठी तयार : चित्रा वाघ    

Chitra Wagh : "रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडितेने माझ्यावर केलेले आरोप आताच ऐकले. फेब्रुवारीपासून एकट्या लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहीले. त्यावेळी तिच्या मदतीला कोण आलं नव्हतं. परंतु, आज माझ्या विरोधात सगळे एकत्र आले आहेत. मी सर्व चौकशीसाठी तयार आहे, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.  

Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवालिक बिल्डरमध्ये मैत्री संबंध; रखडलेल्या घराच्या मुद्यावरून काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकीची टीका

Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब आणि शिवालिक बिल्डरमध्ये मैत्री संबंध; रखडलेल्या घराच्या मुद्यावरून काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकीची टीका

Maharashtra News : शरद पवार यांच्या घरावर झालेल्या आंदोलना प्रकरणी गिरगाव न्यायालयात 4 एसटी कर्मचाऱ्यांना हजर करण्यात आलं

पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध 31 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा पाठलाग करून अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Crime News : पश्चिम उपनगरातील खार पोलिसांनी एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध 31 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा पाठलाग करून अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


आरोपी आणि पीडित दोघेही खार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गजानन शामराव काटे वय 57 असे आरोपीचे नाव असून तो पोलीस हवालदार असून त्याला कायद्याची व तो करत असलेल्या गुन्ह्याची पुरेपूर माहिती होती. तरीही पीडितेचा दावा आहे की आरोपीयानी तिला वारंवार व्हॉट्सअॅपवर मेसेज करत होता.


आरोपी कॉन्स्टेबलने पीडितेवर बारीक नजर ठेवली होती आणि तिचा पाठलाग केला होता.


सूत्रांनी सांगितले की 8 एप्रिल रोजी रात्री 11:43 वाजता आरोपीने तिला अश्लील प्रपोजल मेसेज पाठवला. त्याने महिलांच्या शालीनतेचा अपमान केला.


मात्र, त्यानंतर पीएसआयने रविवारी गुन्हा दाखल करण्यासाठी खार पोलिस ठाण्यात धाव घेतली. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांतर्गत खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची पुष्टी सूत्रांनी केली.


पोलीस हवालदाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

Maharashtra News : गिरगाव कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त, शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी 4 जणांना न्यायालयात हजर करणार

Maharashtra News : गिरगाव कोर्ट परिसरात पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यास सुरुवात, पोलिसांकडून बॅरिकेटिंग करण्यास आणि कुमक वाढवण्यास सुरुवात 


सकाळी 11 वाजता शरद पवार यांच्या घरावर हल्ला आणि आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या 4 जणांना न्यायालयात हजर करत पोलीस कोठडी घेण्याचा प्रयत्न पोलिसांचा असेल, अधिक तपासासाठी कालच प्रोडक्शन वाॅरंट कोर्टाने 4 जणांविरोधात इशू केलं होतं. मुख्य आरोपी वकील गुणरत्न सदावर्ते आणि 4 आरोपांनी मिळून कट केल्याचा पोलिसांचा आरोप आणि यासाठी तपास करायचा असल्यानं पाचही जण पोलिसांना ताब्यात हवे आहेत.

Maharashtra : एक जुलैपासून राज्यात पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी 

Maharashtra :  एकदाच वापरला जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंचं उत्पादन, आयात- निर्यात, वाहतूक,विक्रीवर राज्यात बंदी असणार. महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये प्लास्टिक बंदी केली होती मात्र इतर राज्यांमध्ये प्लास्टिक सुरू असल्यामुळे फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता केंद्र सरकारने संपूर्ण देशात प्लास्टिक बंदी अधीसूचना काढल्यानंतर राज्य सरकार पुन्हा एकदा प्लास्टिक बंदी करणार आहे. 2018 मध्ये प्लास्टिक बंदी करणारे देशातील एकमेव महाराष्ट्र राज्य होतं. महाराष्ट्रात जरी उत्पादन बंद असले तरी शेजारच्या राज्यांमधून प्लास्टिक आयात होत असल्याने पूर्णपणे प्लास्टिक बंदी झाली नव्हती. या कालावधीत 10 ते 12 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता तसेच तीन हजार टन प्लास्टिक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या  दुधाची प्लास्टिक बॅग, पाण्याची बॉटल, थर्माकोल यावर अद्याप निर्णय नाही.

Hingoli News : एसटी कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, राहत्या घरात खिडकीला घेतला गळफास

Hingoli News : वसमत येथील एसटी आगारा मधील एका चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अशोक दगडू कळंबे  असे त्यांचे नाव असून जानेवारी महिन्यात आंदोलन काळात ते बडतर्फ झाले होते.


 वसमत येथील एसटी आगारामध्ये अशोक कळंबे हे मागील काही वर्षापासून चालक म्हणून कार्यरत होते. वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय जवळ ते कुटुंबीयांसह राहतात. आज रात्री सात वाजेच्या सुमारास ते बाहेरून भ्रमणध्वनीवर रागारागाने बोलतच घरात आले. या रागाच्या भरात त्यांनी मोबाइलवरून जमीनीवर आपटून टाकला. मात्र त्यांचा राग पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विचारणाही केली नाही.


दरम्यान अशोक यांनी रागाच्या भरात बेडरूम मध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. यामध्ये त्यांनी ओढणीची एक बाजू खिडकीच्या गजाला बांधली होती. गळफास घेताच त्यांच्या वजनामुळे ओढणीची गाठ त्यांच्या गळ्याला घट्ट आवळली गेली. तर दुसरीकडे खिडकीच्या गजाला बांधलेले ओढणीची गाठ सुटली आणि ते खाली कोसळले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

Buldana News : बुलढाणा शहराजवळ जंगलात आढळला झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा कुजलेला मृतदेह, इसमाची आत्महत्या की घातपात?

Buldana News : बुलढाणा शहराजवळ असलेल्या मिर्झा नगर जवळील नाल्याजवळ एका झाडाला लटकलेल्या आणि कुजलेला अवस्थेतील 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची परिस्थिती अत्यंत कुजलेला असल्याने या इसमाने आत्महत्या केली की, त्याचा घातपात करण्यात आला याची चौकशी आता पोलीस करत आहे. दरम्यान बुलडाणा शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनासाठी दाखल झालं असून मृतदेह जंगलाच्या खोऱ्यात असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात येणार आहे. इसमाने आत्महत्या केली,की त्याचा घातपात झाला...? याचा तपास पोलीस करीत आहे.

Yavatmal News : एसटीच्या चाकाखाली आल्याने इसम ठार; पुसद बसस्थानक येथील घटना
Yavatmal News : पुसद शहरातील बस्थानाक येथे सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 10.30 वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या मागील चाकाखाली आल्याने एका 37 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेर तालुका आगाराची एसटी बस क्रमांक एमएच- 40 एन - 8946 हे अमरावती ते पुसद आली होती या दरम्यान बस्थानाकामध्ये एस टी बास्थांकध्ये येत असताना विकास रामभाऊ गावंडे नामक (37, रा. श्रीरामपूर पुसद) हे एसटीच्या मागील चाकाखाली अचानक आल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चुराडा होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नसगरिकांनी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच पुसद शहर पोलीस आणि वसंतनगर पोलिसांनी घटना स्थळी पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता उप जिल्हा रुग्णालय पुसद येथे शव पाठविण्यात आले. या घटनेचा पुढील तापास पुसद पोलीस करीत आहे.
Maharashtra News : गुहागरचा उच्च शिक्षित 25 वर्षीय तरुण आशुतोष जोशीनं केली 18500 किलोमीटरच्या पायी प्रवासाला सुरुवात
Maharashtra News : गुहागर तालुक्यातील नरवण येथील आशुतोष जोशी याने पाणी बचत,पाण्याचा सुयोग्य वापर,प्लास्टिककचे दुष्परिणाम,शेतकरी आत्महत्या आणि पर्यावरणाचे संवर्धन याबाबत प्रबोधनात्मक संदेशाचा वसा हाती घेत तब्बल 18500 किलोमीटरचा पायी प्रवासाचा घाट घातला आहे.रामनवमीच्या दिवशीं त्याने पायीं प्रवासाला सुरुवात केली..आशुतोष याने इंग्लंड येथे व्हिजूअल आर्ट्सची पदवी संपादन केली असून फोटोग्राफी व निसर्ग संतुलनाबाबत तो स्कॉटलंड,स्पेन,इंग्लंड मध्ये काम करत आहे.
Maharashtra School : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून सुट्टी

Maharashtra School : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून सुट्टी, तर 13 जूनला शाळा उघडणार, शाळांच्या कालावधीमध्ये सुसंगती आणण्यासाठी निर्णय

Maharashtra News : महाराष्ट्राला भारनियमनाचा शॉक; आता आणखी व्याप्ती वाढणार

Maharashtra News : उन्हाच्या झळांनी हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातल्या काही भागांना भारनियमनाचा शॉक बसतोय. मात्र आता या भारनियमनाची व्याप्ती वाढणार आहे. आजपासून राज्याच्या विविध भागात भारनियमन होणार असल्याचं महावितरणकडून जाहीर करण्यात आलयं. ज्या भागात वीज चोरी, वीज गळती अधिक आणि जिथे वीजबिल चुकवेगीरी वाढलेय अशा भागात भारनियमन अधिक असणार असं महावितरणकडून सांगण्यात आलंय. यात मुंबई नजिकचे काही भाग, विदर्भ, मराठवाडा, खान्देश या ठिकाणच्या काही भागांना भारनियमनाचा शॉक बसणार आहे. मुंबईतील मुलुंड, भांडूप, तसंच ठाणे, नवी मुंबई या भागात वीज चोरी कमी आणि विजबील रिकव्हरी अधिक असल्यानं भारनियमनाचा शॉक बसणार नाहीये. राज्यात कोळसा टंचाईमुळे आधीच 3 हजार मेगावॅट वीजेची तूट आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे विजेची मागणीही 30 हजार मेगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागणी-पुरवठा व्यवस्थापनासाठी हा भारनियमनाचा शॉक देण्याचा निर्णय महावितरणनं घेतलाय.

RBI News : आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने चार सहकारी बॅंकांना दणका, 4 लाखांचा दंड

RBI News : आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने चार सहकारी बॅंकांना दणका, 4 लाखांचा दंड सुनावला, अंदरसुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, नांदेड मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादीत या बँकांचा समावेश.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Kolhapur Election 2022 : उत्तर कोल्हापूरचा कौल कुणाला? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; आज मतदान


Kolhapur Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानाच्या प्रक्रियेसाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवण्यात आलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फोजफाटा तिथे तैनात करण्यात आला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत 80 वर्षांच्या आणि दिव्यांग नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच मत नोंदवण्यात आलं होतं. तसाच प्रयोग आता या निवडणुकीत केला जाणार आहे.


महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) काँग्रेसच्या जयश्री पाटील या निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला असून, दोघांनीही विजयाचे दावे केले आहेत.


रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. शेवच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला संबोधीत केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव निवडून येणार हे नक्की असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही, भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. 


Sharad Pawar Silver Oak Attack : सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपूरचा, राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा आरोप


Sharad Pawar Silver Oak Attack : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं म्हटलंय. 


सिल्व्हर ओक हल्ल्याचा मास्टरमाइंड हा नागपुरचा आहे आणि लवकरच ते नाव समोर येईल असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला की, हल्ल्याच्या दिवशी दोन फोन कॉल हे नागपूरहून आले होते, त्यावरून मास्टरमाइंड हा नागपूरचाच असल्याचे स्पष्ट होते असं मिटकरी यांनी म्हटलंय. तर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या दोषी नसते तर ते पळून गेले नसते असं देखील मिटकरी यांनी म्हटलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.