Maharashtra Breaking News 10 July 2022 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2022 10:36 PM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात महत्वपूर्ण घोषणा...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात महत्वपूर्ण घोषणा...


लवकरच नागपुरातून काही महत्वाच्या शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने ब्रॉडगेज मेट्रो धावणार, रेल्वे बोर्डाची प्रकल्पाला आजच मिळाली मंजुरी...


नागपूर ते गोंदिया, नागपूर ते वडसा, नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते अमरावती अकोला, नागपूर ते बैतुल नागपूर ते छिंदवाडा आणि नागपूर ते रामटेक या मार्गावर 140 किलोमीटर प्रति तासाने ब्रॉडगेज मेट्रो चालावी हे आमचं स्वप्न होत, आजच मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की रेल्वे बोर्डाने या प्रकल्पाला  मंजुरी दिली आहे असे गडकरी म्हणाले ..


पुढच्या आठवड्यात दिल्लीला मेट्रो आणि रेल्वेमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे आणि लवकरच हा ड्रीम प्रोजेक्ट  पूर्ण होणार आहे अशी माहिती ही त्यांनी दिली...


ते नागपूर आतील मिनी माता नगर परिसरात काही विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते....

मनसेला मंत्री मंडळात स्थान दिल्यास आरपीआयचा विरोध - रामदास आठवले

नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मनसेला मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती .याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही ,त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही ,तसा विचार जर होत असेल नक्कीच याचा विरोध करणार असे सांगितले

सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे उत्तर

सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी उत्तर दिले आहे. अपात्रतेच्या कारवाईबाबत उत्तरासाठी आमदारांना 48 तासांची मुदत देणं हे नियमबाह्य वर्तन नाही. ही मुदत प्रथम दर्शनी दिलेली होती. त्यावर आमदारांनी कुठल्याही पद्धतीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या नोटिशीला उत्तर देण्याऐवजी अवघ्या 24 तासात ते सुप्रीम कोर्टात पोहोचले याचं आश्चर्य वाटलं. अज्ञात ई-मेलवरून आणि एका अनोळखी व्यक्तीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्याने त्यावर कार्यवाही केली नाही असाही निर्वाळा देण्यात आला आहे.  

 सिंधुदुर्ग : पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी, चार तासापासून आंबोलीत वाहतूक कोंडी

पावसाळ्यात पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडले आहेत. सिंधुदुर्ग येथील अंबोली येथे नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे गेल्या चार तासापासून आंबोलीत ट्रॅफिक जाम झाले आहे. आंबोलीतील ट्राफिक सुरळीत होण्यासाठी अजूनही तीन तास लागण्याची शक्यता आहे. 


आंबोली घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रॅफिकमुळे त्रास सहन करावा लागत आहे.  प्रवाशांना तीन ते चार तास ट्रॅफिक मध्ये अडकून प्रवास करावा लागतोय. दोन्ही बाजूंनी चार ते पाच किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 


आंबोलीत आलेल्या पर्यटकांच्या बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे ट्राफिक जाम झाले आहे. पोलीस प्रशासन, गावकरी आणि वनविभागाने घेतलेल्या बैठकीतील निर्णय कागदावरचं असल्याचे दिसतेय. आंबोलीत पर्यटकांच्या गाड्या पार्क करून रिक्षा किंवा बसने मुख्य धबधब्यापर्यंत परडकांना सोडण्याचा निर्णय कागदावरच झालाय. प्रत्यक्षात मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. 

महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही


महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची सुनावणी उद्या होणार की नाही याबद्दल अद्यापही अनिश्चितता 


11 जुलैच्या सुनावणीवर अवलंबून आहे शिंदे सरकारचे भवितव्य


पण अद्याप हे प्रकरण उद्याच्या कामकाजामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही


कामकाजात समाविष्ट नसेल तर वकील उद्या सकाळी कोर्टासमोर हे मॅटर मेन्शन करतील त्यानंतर सुनावणी कधी होणार हे स्पष्ट होईल


सकाळी मेन्शन केलेलं मॅटर त्याच दिवशी सुनावणीला येण्याची शक्यता खूप कमी असते


त्यामुळे हे प्रकरण कधी सुनावणीला येतं हे पाहणं महत्त्वाचं

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची निष्ठायात्रा 

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची निष्ठायात्रा 


रावळपाठा - दहिसर पूर्व- शाखा क्र 4 येथे आदित्य ठाकपे काही वेळात पोहोचतील


या ठिकाणच्या नगरसेविका सुजाता पाटेकर सह शिवसैनिक मोठ्या संख्येनं आदित्य ठाकरेंचं स्वागत करण्याकरता हजर


या मतदारसंघात शिवसेनेचे ५ नगरसेवक आहेत...महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सेनेत आणखी फूट पडू नये याकरता प्रयत्न


मात्र, याच मतदारसंघात शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला विभाग संघटक यापदाधिका-यांनी राजिनामे दिले आहेत


ढोल- ताशांच्यागजरात निष्ठा यात्रेचं स्वागत केले जात आहे.

नागपूर : तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक, 20 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त

नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने बेलातरोडी परिसरातून तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे 250 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.





Nagpur : 20 लाखांच्या एमडी ड्रग सह तिघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बेलातरोडी परिसरातून 3 अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचे 250 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

हे सरकार मुंबईचा द्वेष करणारं, आरे कारशेडवरुन आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

महाविकास आघाडी सरकारनं पर्यावरणाला अधिक महत्व दिले होते. आमचं सरकार हे मुंबईची काळजी घेणारं सरकार होतं. आम्ही आरे कारशेडसाठी पर्यायी जागेचा पर्याय दिला होता. हे सरकार मुंबईचा द्वेष करणारं सरकार आहे, असं म्हणत शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा लगावला. शिंदे-फडणवीस सरकार हे स्थगिती सरकार ठरणार का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. सरकारनं चांगल्या प्रकल्पांना स्थगिती दिली असल्याचेही ते म्हणाले. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

कोकणातील रिफायनरीला असलेल्या विरोधानंतर देखील एमआयडीसी ॲक्शन मोडमध्ये

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातल्या बारसू आणि सोलगाव या ठिकाणी रिफायनरी प्रस्तावित असून त्यासाठी सध्या सर्वेक्षणाचा काम या ठिकाणी सुरू आहे. पण या सर्वेक्षणाला बारसू सोलगावसह आसपासच्या गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. हाच विरुद्ध दर्शवण्यासाठी जून महिन्याच्या आठ तारखेच्या मध्यरात्री गोवळगावच्या सड्यावर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन देखील केलं होतं. यावेळी  स्थानिकांना विश्वासात घेऊन आगामी माती परीक्षण आणि ड्रोन सर्वेक्षण केलं जाईल आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून दिलं गेलं आहे. पण जवळपास महिनाभराच्या कालावधीनंतर आता एमआयडीसी ॲक्शन मोडमध्ये आली आहे. एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी  भूमी अभिलेख कार्यालयाच्या जिल्हा अधीक्षकांना एक पत्र लिहिलं आहे ज्यामध्ये त्यांनी बारसु सोलगावसह इतर आठ गावांचा नकाशा आणि इतर दस्तऐवज मिळावेत याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

आरे कारशेडविरोधातील आंदोलनात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सहभागी

आरे कारशेडविरोधात आजही पर्यावरणवाद्यांचं आंदोलन करण्यात येत आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी झाले आहेत. आम्ही आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.


 





आशिष जयस्वालांना भाजपमधूनच फटके, गृहमंत्र्यांकडे करणार तक्रार

नागपूर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांना भाजपमधूनच फटके लावले जात आहे. जयस्वाल घोटाळेबाज आहेत, त्यांना मंत्री करण्यात येऊ नये अशी मागणीच भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. सोबतच त्यांच्या घोटाळ्याच्या सर्व फाईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पुराव्यानिशी पाठवण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला, यात्रा आजही स्थगित; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

अमरनाथ गुहेजवळ (Amarnath Cave) झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 65 लोक वाचवण्यात यश आलं असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अद्याप 41 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. बचावकार्य सुरु असून खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आज तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, आज देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा


 

200 कोटीचं काय घेऊन बसलात, बाकी आमदारांपेक्षा इंदापूरला 10 पट अधिक निधी : दत्तात्रय भरणे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथे 2 कोटी 27 लक्ष रुपयांचा 33/11 केव्ही  विद्युत उपकेंद्राचा भूमिपूजन समारंभ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यानंतर सभेला संबोधन करताना ते बोलत होते. दरम्यान, निधी वाटपाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्याय होत असल्याची भावना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अनेकवेळा बोलून दाखवली आहे. आता त्यांच्या या विधानावर भरणे इदापूर तालुक्याला अधिकचा निधी दिल्याचे म्हणत एकप्रकारची कबुलीच दिली आहे. सेनेचे बंडखोर आमदार म्हणत होते की आम्हाला निधी मिळत नाही.  त्यावर माजी राज्यमंत्री भरणेंनी इंदापूर तालुक्याला बाकी आमदारांपेक्षा किती जास्त निधी आणला हे सांगितले. 200 आणि सव्वा दोनशे कोटीचे काय घेऊन बसला आहात, मी त्यांच्यापेक्षा निधीच्या बाबतीत पाच पट 10 पट पुढे गेलो आहे. बाकी आमदारांपेक्षा इंदापूर तालुक्याला 10 पट अधिक निधी दिला असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलं. 



सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबईलगतच्या मिनी महाबळेश्वरची सफर, जव्हारचं निसर्गसौंदर्य माझाच्या कॅमेऱ्यात

आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर संशयित बॅग आढळली

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर संशयित बॅग आढळली आहे. पोलिसांकडून बॅगेची तपासणी सुरु आहे. बॅगेत जुन्या नोटा आणि शिक्के आढळले आहेत.






 

शिवसेनेच्या सोलापूर संपर्कप्रमुखपदी अनिल कोकीळ यांची नियुक्ती

शिवसेनेच्या सोलापूर संपर्कप्रमुखपदी अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंडखोर आमदार शिवाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.






 

आज सूरतमध्ये नैसर्गिक शेती परिषद, पंतप्रधान मोदी करणार संबोधित

गुजरातमधील सुरतमध्ये आज नैसर्गिक शेती परिषद होणार आहे. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM  Narendra Modi ) संबोधित करणार आहेत. या परिषदेत असे हजारो शेतकरी आणि भागिदार सहभागी होणार आहेत. ज्यांनी नैसर्गिक शेती आत्मसात करुन यशोगाथा लिहली असे शेतकरी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह राज्यपाल देखील उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे नैसर्गिक शेती परिषदेला संबोधित करणार आहेत.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल : एकनाथ शिंदे

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की, अधिवेशनाच्या आधी मंत्रिंडळ विस्तार होईल.


 


अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर हवामान विभागाचं पितळ उघड

अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेनंतर हवामान विभागाचं पितळ उघड पडलं आहे. दुर्घटनेच्या दिवशी हवामान खात्याकडून फक्त येलो अलर्ट देण्यात आला होता. ढगफुटी झाली त्या दिवशी हवामान विभागाकडून केवळ ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला होता. अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन पूर आला. या दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. 






 

गिरीश महाजन बालिश; एकनाथ खडसेंचा पलटवार

गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्यातील शाब्दिक खडाजंगी आपल्या सर्वांच्या परिचयाचीच. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला होता. खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले अन् प्रसाद संपला तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झालीय, असा निशाणा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर साधला आहे. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत खडसेंना विचारल्यावर त्यांनी गिरीश महाजन बालिश आहेत, असं म्हणत टोला लगावला आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

देशात 18 हजार 257 नवे कोरोना रुग्ण, 42 रुग्णांचा मृत्यू

देशात मागील 24 तासांत 18 हजार 257 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभरात 42 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी आकडेवारी जाहिर करत ही माहिती दिली आहे.






सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता
मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला नामांतराचा वाद चिघळण्याची शक्यता

 

वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव द्या, राज्यपालांच्या सूचना तर वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्याची छात्रभारतीची मागणी

 

8 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला

 

आता या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे अशा सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केल्या आहेत. 

 

 मात्र दुसरीकडे या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता छात्रभारतीने लावून धरली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंना पत्रव्यवहार केला आहे. 

 

 शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष आणि त्यांचे कार्य व विचार लक्षात घेता वस्तीगृहला छत्रपती शाहू महाराजांचे नाव द्यावं अशी मागणी पत्रात केली आहे.

 

त्यामुळे वसतिगृहाला नाव देताना नाव नेमकं कोणतं द्यायचं? असा पेच विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूं समोर उभा राहिला आहे.
कच्च्या तेलाच्या किमती वधारल्या; देशात पेट्रोल-डिझेल किमती काय?

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज 50व्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल रुपये स्वस्त होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यांच्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

मुंबई : संपत्तीवरुन वाद, 22 वर्षीय तरुणानं आईला संपवलं

संपत्तीच्या वादातून मुलानंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईत समोर आली आहे. मुलुंडमध्ये एक 22 वर्षीय तरुणाने स्वतःच्या आईची हत्या करून लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. छाया महेश पांचाळ असे 46 वर्षीय मयत महिलेचे नाव असून तिची हत्या तिचाच 22 वर्षीय मुलगा जय याने केली आहे. मुलुंडच्या वर्धमान नगर मध्ये पांचाळ कुटुंबीय राहतं. आज संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांचा घरातून रक्त येत असल्याचा कॉल प्राप्त झाला. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

राज्यावरील दु:ख, संकट, सर्व अडचणी दूर होवो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विठुरायाला साकडं

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) चा राज्यभर उत्साह आहे. आषाढीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

कोकणसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी

राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात मंगळवारी सुनावणी पार पडणार आहे.





ओबीसी इम्पिरिकल डेटाचा अहवाल सरकारला सादर

ओबीसी इम्पिरिकल डेटाचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार आहे ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार की नाही याकडे लक्ष लागलं.


 





मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या नामकरणाचा वाद

मुंबई विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या नामकरणाचा वाद निर्माण झाला आहे. वसतीगृहाला सावरकरांचं नाव देण्याची सूचना राज्यपालांनी दिली आहे. वसतिगृहाला शाहू महाराजांचं नाव देण्याची छात्रभारतीची मागणी आहे.






 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज आषाढी एकादशी
आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.


मुख्यमंत्र्यांचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे -



  • मध्यरात्री 2 वाजता - मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहाहून विठ्ठल मंदिराकडे निघणार.

  • मध्यरात्री 2.30 वाजता - शासकीय महापूजा

  • पहाटे 5.30 वाजता -  पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन

  • पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण

  • सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

  • सकाळी 11.45 वाजता - पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम


मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये शिवसेना मेळावा
आज पंढरपूर येथे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
 
आषाढी एकदशीचे राज्यभरातील कार्यक्रम
मुंबई- प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदीरात भाविकांची गर्दी होणार आहे. कोरोनाच्या संकंटानंतर मोठ्या जल्लोषात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
अहमदनगर- जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदीरात आषाढी एकादशीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
धुळे - शहरातील स्वातंत्र्यपूर्व कालखंडात बांधण्यात आलेल्या मालेगाव रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षांच्या कालखंडानंतर गर्दी होणार असून या ठिकाणी यात्रा भरते. 
शिर्डी- आषाढी एकादशी व रविवार असल्यानं पंढरपूरप्रमाणे शिर्डीत सुद्धा भक्तांची गर्दी होईल.
अमरावती- विदर्भातील हजारो भाविक आषाढी एकादशीला विदर्भाची पंढरी कौडण्यपूरमध्ये येणार. ज्यांना पंढपुरला जाणं शक्य होत नाही असे विदर्भातील हजारो वारकरी विठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपूर येथे दर्शनाला येतात.


आज देशभर बकरी ईदचा उत्साह 
आज देशभर बकरी ईद साजरी केली जाणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 व्या दिवशी ही ईद साजरी केली जाते. आजच्या दिवशी नमाजचे पठण केल्यानंतर कुर्बानी देण्यात येते. 


अमरनाथमधील रेस्क्यू सुरुच
अमरनाथमधील ढगफुटीनंतर मृतांची संख्या 16 झाली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध आणि रेस्क्यू अजूनही सुरु आहे. आज किंवा उद्यापासून पुन्हा अमरनाथ यात्रेला सुरुवात होईल. 
 
श्रीलंकेतील आंदोलन तीव्र, पंतप्रधानांचं खाजगी निवासस्थान आगीच्या भक्ष्यस्थानी
पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी रात्री त्यांचं खासगी निवासस्थान पेटवून दिलं. राष्ट्रपती गोटाबाया राष्ट्रपती भवन सोडून पळून गेल्यानंतर अजूनही त्यांच्या घरावर आंदोलकांचा ताबा आहे. गोटाबाया 13 जुलैला राजीनामा देणार आहेत. 
 
शिंजो आबे यांच्या हत्येनंतर आज जपानमध्ये मतदान
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं शव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. आज जपानमध्ये संसदेच्या वरिष्ठ सदनाचं मतदान पार पडणार आहे. 
 
आजही महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई आणि कोकण किनारपट्टीला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


छगन भुजबळ यांचा दिल्ली दौरा, ओबीसीच्या मुद्द्यावर वकिलांची भेट 
माजी मंत्री छगन भुजबळ आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत.  भुजबळ ओबीसी आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकिलांच्या भेटी घेणार आहेत. तसेच, सैनी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला देखील उपस्थिती लावणार आहेत. भुजबळ देशातील काही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.