उच्चभ्रू वस्तीत घरातच वेश्याव्यवसाय, शेजाऱ्यांनी बाहेरुन कोंडलं; पोलिसांनी 4 तरुणींना बाहेर काढलं

अकोल्यातल्या उच्चभ्रू वस्तीत एका घरात देहविक्रीच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी चार तरुणींसह एका तरुणाला घरात कोंडून ठेवलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अकोल्यातल्या जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील उच्चभ्रू वस्तीत या चार तरुणी भाड्याने रूम करून राहत होत्या. येथे दररोज अनेक पुरुषांची ये-जा राहायची.

स्थानिक नागरिकांनी या घरात देहविक्री चालत असल्याचा संशय आला. त्यामुळे संतापलेल्या स्थानिकांनी चारही तरुणींना घरात कोंडून ठेवले. तसेच एका तरुणालाही कोंडून ठेवण्यात आलं
स्थानिकांकडून या घटनेबाबात माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी 4 तरुणींसह तरुणालाही ताब्यात घेतले.
भाड्याने राहणाऱ्या या चारही तरुणी देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचं बोलल्या जात आहे. यातील दोन तरुणी पश्चिम बंगालच्या तर दोन तरुणी अकोल्यातल्या रहिवासी असल्याच समजते आहे.
दरम्यान, या प्रकरणात जुने शहर पोलीस अधिक तपास करत असून या महिला अकोल्यात कशा आल्या, कोणाच्या मदतीने वेश्याव्यवसाय करत होत्या.
अकोल्यातील या घटनेची शहरात मोठी चर्चा होत असून स्थानिकांनी देखील पोलिस आल्यानंतर संबंधित घराच्या बाहेर मोठी गर्दी केली होती