Maharashtra Breaking News 08 July 2022 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jul 2022 10:23 PM
ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी आशा : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे  म्हणाल्या, "काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावलं उचलावी. सरकार कडून न्याय मिळेल असा विश्वास आहे".

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर पोहचतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीतून रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे एअरपोर्टवर पोहचतील असं सांगण्यात आलय.  पुणे एअरपोर्टवरून ते आषाढी एकादशीनिमित्त करण्यात येणाऱ्या शासकीय पुजेसाठी पंढरपूरला रवाना होतील.  दरम्यान एअरपोर्टवरून निघाल्यानंतर हडपसर गाडीतळ भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगीरे यांनी  शिंदेंच्या सत्काराचे आयोजन केलंय.  यावेळी  शिवसेनेतील काही इतर नेते आणि पदाधीकारी देखील शिंदेंबद्दल निष्ठा दाखवण्यासाठी हडपसमधे उपस्थित राहणार आहेत.  हडपसरमधे आयोजित करण्यात आलेल्या शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमास कोण कोण उपस्थित राहतं याकडे शिवसेना नेतृत्वाच लक्ष असणार आहे.  शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे हे आधीच  शिंदे गटात दाखल झालेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला परवानगीचे पत्र जिल्हा प्रशासनाने दिले , परवानगी नंतरच एकनाथ शिंदे करू शकणार महापूजा
आषाढी सोहळ्यासाठी उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येत असताना राज्यातील नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे . मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी पहाटे विठूरायाची शासकीय महापूजा होणार आहे . मात्र आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांना या दौऱ्यासाठी परवानगी बाबत जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे . हि परवानगी निवडणूक आयोगाने दिल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूर दौऱ्यावर येत येणार आहे .  उद्या रात्री मुख्यमंत्री पंढरपूर येथे पोचणार होते . येथे रात्री  विश्रामगृह येथे पर्यावरणाची वारी , पंढरीच्या दारी याचा समारोप सोहळा होणार आहे . एकादशी दिवशी पहाटे शासकीय महापूजा झाल्यावर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे . सकाळी अकरा वाजता सुंदर माझे कार्यालय , स्वच्छता दिंडी समारोप आणि दुपारी शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती लावणार आहेत . आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक अयोग्य नेमक्या कोणत्या कार्यक्रमाला परवानगी देणार यावर मुख्यमंत्र्यांचा दौरा अवलंबून राहणार आहे . मात्र काही वर्षांपूर्वी कार्तिकी यात्रेला अशीच आचारसंहिता असताना तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील याना शासकीय महापूजेस परवानगी दिली होती 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका

जिल्हा नियोजन निधीच्या पाठोपाठ जलसंधारण विभागाची काम थांबवली आहेत. नव्याने काढलेल्या सर्व निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाकरे सरकारने 4037 कामांच्या निविदा काढल्या होत्या. या सर्व निवीदा आता रद्द होणार आहेत.

माजी खासदार आनंदराव अडसूळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

माजी खासदार आनंदराव अडसूळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला , दिल्ली येथे घेतली भेट


 

भायखळा येथे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रेला सुरुवात

भायखळा येथे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रेला सुरुवात झाली आहे. भायखळा येथील आमदार यामीनी जाधव यांच्या मतदार संघातून निष्ठा यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या प्रतिकृतीच अनावरण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली

अवैध सावकारकी करणाऱ्या सावकाराच्या घरावर छापा
जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथे अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराच्या घरावर छापा टाकून जिल्हा उपनिबंधक विभागाच्या पथकाने 33 संशयास्पद कागदपत्र जप्त केलीत ज्यात 8 रजीष्ट्री,स2 करारनामा, सातबारा ,बॉण्ड पेपर  कच्चा नोंदी असलेल्या वह्या जप्त करण्यात आल्यात,,गावातील शेतकऱऱ्याकडून 2 गुंठे जमीन लिहून 15 लाखांची रक्कम व्याजाने या सावकाराने दिली होती, याच अवैध व्याज वसुली विरोधात पीडित शेतकऱ्याने केलेल्या तक्रारी वरून हा छापा टाकण्यात आला, या प्रकरणी पूर्ण तपासणी करून  कारवाई करण्यात येणार आहे..

 
विक्रमी यात्रेसाठी विक्रमी तयारी , भक्ती सागर मध्ये ५ लाख भाविकांच्या निवासाची मोफत व्यवस्था

दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून आज नवमीला शहरात जवळपास ७ लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत . एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो . मात्र काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागे शेजारी असणाऱ्या ६५ एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे . यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले ४० एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा १०५ एकर जागेत तब्बल ५ लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे . आज दुपारी पर्यंत जवळपास ४ लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले असून वाटून दिलेल्या प्लॉटवर त्यांनी आपले तंबू उभारले आहेत . या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी , आरोग्य व्यवस्था , स्वच्छतागृहे , वीज , डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखापेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोया झाली आहे .  

आज नवमीला चंद्रभागा स्नानासाठी लोटला हजारोंचा जनसागर , बुडणाऱ्या १५ भाविकांना वजीर रेस्क्यू टीमने वाचवले

आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जसे विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते तशीच ओढ चंद्रभागेच्या स्नानाची असते . सध्या लाखो भाविक पंढरीत दाखल झाले असताना चंद्रभागा वाळवंटावर देखील भाविकांचा अथांग जनसागर लोटला आहे . चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी असली तरी आषाढी यात्रेला उजनी धरणातून सोडलेले पाणी पात्रात पोचल्याने पाणी पातळी देखील जास्त आहे . यातच चंद्रभागेच्या पात्रात वाळू माफियांनी वाळू उपसा करून मोठं मोठे खड्डे केल्याचा फटका भाविकांना बसत आहे . यामुळेच प्रशासनाने पात्रामध्ये आपत्कालीन व्यवस्थेच्या बोटी नदीपात्रात फिरवणे सुरु ठेवले असून या टीमने आत्तापर्यंत जवळपास १५ बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्याचे काम केले आहे . भाविकांच्या चंद्रभागा स्नानाचा मोठा उत्साह दिसत असून अबालवृयुद्ध चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात स्नानाचा आनंद घेत आहेत . याचसोबत शेकडो भाविक नौकानयनाच्या देखील आनंद घेत आहेत . चंद्रभागेचे सर्व घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असून चंद्रभागा तीरावर भाविकांचा महापूर आला आहे . 

Osmanabad News Update : ईडीकडून उमरग्यातील एका नामांकित कंपनीची 45.50 कोटींची मालमत्ता जप्त 

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका नामांकित कंपनीची 45.50 कोटी रूपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Aurangabad News Update : औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात विद्युत तारांचा शॉक लागून चार जणांचा मृत्यू 

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात विद्युत तारांचा शॉक लागून चार जणांचा मृत्यू झालाय. कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नावडी गावात  इलेक्ट्रिकचे काम करत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून चार जणांचा जागीच मृत्यू झाला. गणेश थेटे, भारत वरकड, जगदीश मुरकुंडे आणि राजू मगर, अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सर्व मृत कामगार महावितरणकडे कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते. 

मेळघाटात दूषित पाण्याने तीघांचा मृत्यु तर 70 ते 80 जणांची प्रकृती बिघडली

मेळघाटात दूषित पाण्याने तीघांचा मृत्यु तर 70 ते 80 जणांची प्रकृती बिघडली आहे.  खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषदचे CEO, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी पोलीस अधिकारी सह जिल्हा प्रशासनाने अनेक अधिकारी पाचडोंगरी गावात दाखल. चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी मध्ये दूषित पाणी पिल्याने कॉलरा सदृश्य आजारामुळे साथ झाली. यामुळे दोन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले तर एक जणांचा गावातच मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून 70 ते 80 जणांवर उपचार सुरू आहेत.

Maharashtra Elections : राज्यातील वार्ड- प्रभाग रचना सदोष, यातील दुरुस्तीनंतरच निवडणूका घ्याः भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नियमांचा उल्लंघन करुन आणि महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे राज्यातील आगामी नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत निवडणुकीसाठी तयार केलेले प्रभाग आणि वार्ड रचना रद्द करुन त्याची पडताळणी करुनच निवडणूका घ्याव्या अशी मागणी राज्याचे माजी उर्जामंत्री, भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार : उद्धव ठाकरे

नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही, शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, शिवसेनेचं धनुष्यबाण शिवसेनेकडे राहणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.


 





Shivsena : धनुष्य बाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे ठामपणे सांगतोय : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Shivsena : धनुष्य बाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही  हे ठामपणे सांगतोय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे

शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.





शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लाईव्ह


 





संतोष बांगर यांनी वाय प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली

हिंगोली : महाराष्ट्रातील राजकीय सत्ता नाट्यानंतर सर्वात शेवटी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी झालेले कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना राज्य शासनाच्या वतीने वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. पण सुरक्षा संतोष बांगर यांनी ही सुरक्षा नाकारली असून तशा विनंतीचं पत्र त्यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलं आहे. बांगर यांच्या संरक्षणासाठी दोन अंगरक्षक नियुक्त आहे, त्यामध्येच एक अतिरिक्त अंगरक्षक म्हणून एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी बांगर यांनी केली आहे.

शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरत गोगावले पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला

रायगड : शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. रेवदंडा येथे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण निमित्त भेट घेतली आहे. 


वारकऱ्यांच्या वाहनाचे टोल माफ करण्यास सुरुवात

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानंतर वारकऱ्यांच्या वाहनाचे टोल माफ करण्यास सुरुवात झाली आहे. वारकऱ्यांच्या वाहनाला वाहतूक पोलिसांतर्फे स्टिकर्स लावले जात आहेत. स्टिकरवर प्रवासाचा पूर्ण तपशील आहे. पंढरपूरला जाताना आणि परत येतानाचे टोल माफ करण्यात येणार आहे. वारकऱ्याकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे.


 





शहाड स्थानकातील घटना मालगाडीची कपलिंग तुटल्याने अर्धा तास रेल्वेसेवा अर्धा तास ठप्प

Shahad News : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे कपलिंग तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प झाल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास शहाड रेल्वे स्थानकात घडली. रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. अर्ध्या तासात मालगाडीचे डबे जोडून मालगाडी मार्गस्थ करण्यात आल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे कपलिंग शहाड स्थानकानजीक तुटल्याने शेवटचे चार डबे मागे ठेऊन मालगाडी मार्गस्थ झाली होती. मालगाडी काही अंतरावर जाताच गार्डने याची सूचना मोटरमनला देताच मालगाडी थांबवण्यात आली. मात्र या घटनेनंतर कसारा, आसनगाव, बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती सुरु करत मालगाडी मार्ग मार्गस्थ केली. यानंतर अर्ध्या तासात लोकल सेवा सुरु झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांचा ठिय्या

उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. लॉसह अन्य विषयांच्या परीक्षा ऑनलाईन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ उपकेंद्राला घेराव घातला. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. सोलापूर, कोल्हापूर विद्यापीठच्या धर्तीवर MCQ (वस्तुनिष्ठ) पद्धतीने परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.






 

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका


शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दाखल केली नवी याचिका


याचिकेवर 11 जुलैला इतर याचिकांसोबतच सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश


न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी यांच्या खंडपीठापुढे झाली सुनावणी


एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांवर बडतर्फीची कारवाई प्रलंबित असताना ही घोषणा कशी होऊ शकते?, याचिकेत दावा

विधानसभेच्या 10 आमदारांचा शपथविधी संपन्न

विधानसभेच्या 10 आमदारांचा शपथविधी संपन्न झाला आहे. 





Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 'त्या' आमदारांची लवकरच पक्षांतर्गत चौकशी होण्याची शक्यता

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 'त्या' आमदारांची लवकरच पक्षांतर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रभारी मुंबईत येऊन काँग्रेसच्या आमदारांसोबत स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. पक्षाकडून पहिल्या पसंतीच मत चंद्रकांत हांडोरे यांना न दिल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

विधानसभेच्या नव्या आमदारांचा शपथविधी

सेंट्रल हॉलमध्ये विधानसभेच्या नव्या आमदारांचा शपथविधी पार पडत आहे.





उद्धव ठाकरे यांची दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 





नाशिक जिल्ह्यात 'हर घर तिरंगा' उपक्रमाची जय्यत तयारी

नाशिक : भारतीय स्वातंत्र्य महोत्सवाची 75 वर्षपूर्ती निमित्त हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या उपक्रमाअंतर्गत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात लाखांहून अधिक घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार आहेत. यासाठीची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे. भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सर्व शासकीय कार्यालयांनी जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

Nanded News : मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक, 319 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

नांदेड : नांदेडमधील अर्धापूर पंचायत समितीच्या तब्बल 319 कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 156/3 सीआरपीसी अन्वये गुन्हा दाखल करा, असा निकाल अर्धापूर न्यायालयाचे न्यायाधीश एम डी बिरहारी यांनी दिला आहे. या कार्यवाहीत शिक्षक आणि ग्रामसेवक यांचा मोठा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सय्यद युनूस यांनी केस दाखल केली होती. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची ही राज्यातील मोठी घटना असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

चिमणराव पाटील यांचे गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप, शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर

बंडखोरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची आजपासून निष्ठा यात्रा, पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं आव्हान

Aaditya Thackeray Nishtha Yatra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना भेटण्यासाठी आदित्य निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आणि मुंबईतल्या 236 शाखांमध्ये जाऊन ते शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ताज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य हे शाखाशाखांमधील शिवसैनिकांशी संवाद साधतील. तसंच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात ते भेटीगाठी आणि मेळावे घेऊन शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करतील.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

गाफील राहू नका, नवीन निवडणूक चिन्हासाठी तयार राहा; उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्देवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा


पाहा व्हिडीओ


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार

Japan Former PM Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा आवाज ऐकू आल्याचं म्हटलंय. शिंजो आबे खाली पडल्यानंतर ते रक्तबंबाळ झाल्याचं दिसलं. त्यामुळे गोळीबारातच शिंजो आबे जखमी झाले असावेत असं वृत्त समोर येत आहे.


पाहा व्हिडीओ 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रातून टीका करणाऱ्या अनिल गोटेंवर गुन्हा दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या पत्रकातून टीका करणाऱ्या अनिल गोटे यांच्या विरोधात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चांदोडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे आता गोटे आणि भाजपामधील वाद पोलिसात गेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी त्यांना लिहिलेल्या अभिनंदनपर पत्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकातून कडून टीका केली होती. भाजपाचा आमदार असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपली कशाप्रकारे फसवणूक केली याबाबत अनिल गोटे यांनी या पत्रातून लिहिलं होतं.





मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शपथविधीवेळी राष्ट्रगीताचा अवमान? राज्यपालांकडे तक्रार दाखल

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधीच्या वेळी राष्ट्रगीताचा अवमान केल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे. औरंगाबादेतील रऊफ पटेल यांनी ही तक्रार केली आहे. राज्यपालांनी देखील ही तक्रार संबंधिताकडे वर्ग केले असून याप्रकरणी योग्य तो तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.





महाविकास आघाडीनं केलेल्या प्रभागरचना निवडणूक आयोगानं रद्द कराव्यात : भाजप

'निवडणूक आयोगानं प्रभाग रचना, गण-गट रचना रद्द कराव्यात', अशी मागणी भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय. महाविकास आघाडीनं नियमबाह्य प्रभागरचना केल्या, असा आरोप बावनकुळे यांनी केलाय.






 

कारच्या धडकेत कचरा काढणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू, बेळगावमधील गोवावेसमधील घटना
Belgaon News : कचरा काढणाऱ्या महिलेला कारने धडक दिल्याने महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी सात वाजता घडली. बेळगावमधील गोवावेस येथील एलआयसी ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अनिता राजेश बंसे (वय 53 वर्षे) असे आहे. ही महिला रोजच्या प्रमाणे कचरा काढत होती. त्यावेळी बेसमेंटमधून वेगाने आलेल्या कारने महिलेला जोराची धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच मृत महिलेचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कार चालकाला बेदम मारहाण केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी कार चालकाला बाजूला काढले. पोलिसांनी कार चालकाला अटक केली असून महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टेमसाठी पाठवून देण्यात आला आहे.
संजय पांडे यांच्यावर एनएसईशी संबंधित व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईसह चंदीगड येथील संजय पांडे यांचं घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली आहे. एनएसईशी संबंधित व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप प्रकरणी संजय पांडे यांच्या मुंबई, चेन्नई आणि चंदीगड येथील घर आणि कार्यालयावर सीबीआयकडून छापेमारी करण्यात येत आहे.






 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयचे छापे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या घरावर सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आहेत. संजय पांडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 






 

कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे 40 नगरसेवक शिंदे गटात

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईनंतर शिवसेनेला कल्याण डोंबिवलीतही मोठी झटका बसला आहे. कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेचे 40 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत.


 

नरेंद्र भोंडेकर यांच्या रूपाने भंडारा जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांचं साकडं

भाजपाच्या समर्थनाने एकनाथ शिंदे सरकार नुकतंच सत्तेत आले असून यावेळी एकनाथ शिंदे सरकारला भंडाऱ्याचे शिवसेना समर्पित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान शिंदे सरकार येत्या काही दिवसात लवकरच खाते वाटप करणार आहे. त्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या रूपाने भंडारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळत मंत्रिपद मिळावे म्हणून भोंडेकर समर्थक कार्यकर्त्यानी बहीरंगेश्वराला साकडे घातले आहे. यावेळी भंडारा शहरातील प्रसिद्ध महादेव बहिरंगेश्वर मंदिरात कार्यकर्त्यानी होम हवन केले. भंडारा जिल्ह्याला आतापर्यंत बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री लाभल्याने जिल्ह्याचा पाहिजे तितका विकास जिल्हात झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात उपेक्षित जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी नरेंद्र भोंडेकर यांच्या रूपाने मंत्री पद आणि पालकमंत्री लाभावे यासाठी कार्यकर्त्यांनी बहिगेश्वर मंदिरात महापूजा करत होम हवन केलं.

अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मंत्रिपदासाठी भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांकडून होम हवन करत बहिरंगेश्वराला साकडे

Bhandara News : भाजपाच्या समर्थनाने एकनाथ शिंदे सरकार नुकतीच सत्तेत आले असून यावेळी शिंदे सरकारला भंडाऱ्याचे शिवसेना समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान शिंदे सरकार येत्या काही दिवसात लवकरच मंत्री खाते वाटप करणार आहे. त्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या रुपाने भंडारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळत मंत्रिपद मिळावे म्हणून भोंडेकर समर्थक कार्यकर्त्यांनी बहिरंगेश्वराला साकडे घातले. यावेळी भंडारा शहरातील प्रसिद्ध महादेव बहिरंगेश्वर मंदिरात कार्यकर्त्यांनी होम हवन केले आहे. भंडारा जिल्ह्याला आतापर्यंत बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री लाभल्याने पाहिजे तितका विकास जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात उपेक्षित जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नरेंद्र भोंडेकर यांच्या रुपाने मंत्रिपद आणि पालकमंत्री लाभावे यासाठी कार्यकर्त्यांनी बहिरंगेश्वर मंदिरात महापूजा करत होम हवन केले.

सासूच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात सुनेचाही मृत्यू, एकाच वेळी दोघींवर अंत्यविधी

समाजामध्ये सासू सुनेचे वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. मात्र सासूचा मृत्यू झाल्याचे समजताच अवघ्या अर्ध्या तासात सुनेचा देखील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडलीय. राहुरी शहरातील आझाद चौक येथील गुरुवारी ही घटना घडली आहे. सासू सूनेवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आलीय. सासू-सुनेचे हे प्रेम पाहून अनेक जणांनी हळहळ व्यक्त केली असून मालनबाई पांडुरंग शेजूळ असं सासुचे तर मिराबाई भाऊसाहेब शेजूळ सुनेचे नाव आहे.

Governor : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे मुंबईकडे प्रयाण

नागपूर: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्हयांचा दोन दिवसीय दौरा आटपून आज सकाळी सात वाजता मुंबईकडे रवाना झाले. विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी त्यांना निरोप दिला. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. या भेटीत त्यांनी शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. गुरुवारी रात्री राजभवन नागपूर येथे मुक्कामी होते. आज सकाळी मुंबईला ते रवाना झाले.

​नागपूर : ज्वेलर्स दुकानाला आग

नागपूर : डीप्टी सिग्नल भागात एका ज्वेलर्स दुकानाला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेत दुकानातील बहुतांशी साहित्य जळून खाक झालाय. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. दरम्यान आगीमुळे किती रुपयांचं नुकसान झाला आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.






 

दोघांना एकाच नायलॉन दोरीने बांधून मृतदेह नदीत फेकल्याची घटना; पोलिसांचा संशय बळावला

नागपूर : एक महिला आणि पुरूषाची हत्या करून त्यांचे मृतदेह वेणा नदीत फेकून दिल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई खैरी शिवारात घडली आहे. या दोघांचेही हातपाय एकाच नायलॉन दोरीने बांधून ठेवले होते. साधारण 25 ते 30 वयोगटातील दोघांची ओळख अजून पटलेली नाही.  




सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

'शिंदे सरकारने स्वतःची प्रतिमा स्थगिती सरकार अशी होऊ देऊ नये', अशोक चव्हाणांचा निशाणा

नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारने मागील महविकास आघाडी सरकारमधील कामांवर 'डिपीडीसी'च्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयावर "स्थगिती" आणलीय. दरम्यान हे सरकार येताच राज्यशासनात जे निर्णय घेतले जात आहेत, त्यात राज्यातील विकासात्मक कामांना स्थगिती देण्याचा आरंभ झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकार हे "स्थगिती देणारे सरकार अशी त्यांची प्रतिमा होऊ नये" अशी माझी अपेक्षा आहे असे माजी मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update :  राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसीय दौऱ्यावर

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. हा दिल्ली दौरा दोन दिवसांचा असणार आहे. 


 






सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत या भेटीत चर्चा होईल अशी शक्यता आहे. आज दुपारी 4.30 वाजता ते मुंबई विमानतळाकडे रवाना होणार आहेत. संध्याकाळी 5.30 वाजताच्या विमानानं ते दिल्लीला जातील. 
 
विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी
विधान भवन येथील सेंट्रल हॉलमध्ये 10 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे. भाजपाचे प्रसाद लाड, उमा खापरे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर, काँग्रेसचे भाई जगताप, शिवसेनेचे सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे आज शपथ घेतील.


आदित्य ठाकरेंची बंडखोरांच्या मतदारसंघात ‘निष्ठा यात्रा’
एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना नेते आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत.  मुंबईतल्या शाखा शाखांमध्येही आदित्य ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत निष्ठा यात्रा काढणार आहेत.
 
संजय राऊतांची पक्षबांधणीला सुरुवात
शिंदे गटाच्या टार्गेटवर असलेले शिवसेना खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. पक्ष बांधणीची सुरुवात राऊतांनी नाशिकपासून केली आहे. आज संजय राऊत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून ते यावेळी नाशिक जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. नाशिकमधून माजी कृषीमंत्री दादा भुसे आणि सुहास कांदे शिंदे गटात गेले आहेत. 
 
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 
 
मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी 
यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडून 10 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी केवळ सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी असेल.  त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेनं दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी लाईफगार्ड, स्पीड बोटस्, अग्नशमन दलाची संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
 
वारी अपडेट
संत तुकारामांची पालखी पिराची कुरोली येथून निघेल आणि वाखरी येथे मुक्कामी असेल. बाजीराव विहिर येथे उभं रिंगण होईल. सत ज्ञानेश्वरांची पालखी भंडीशेगाव येथून निघेल आणि वाखरीला मुक्कामी असेल. बाजीरावची विहिर येथे उभं आणि गोल रिंगण होईल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.