मुंबई : राज्यातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील 1 हजार 846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान 1 हजार 846 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. या पदांसाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. अखेर, या ऑनलाइन परीक्षेचा (Exam) निकाल आज (दिनांक 25 फेब्रुवारी 2025) रोजी जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे. त्यामुळे, या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना येथील वेबसाईटवर हा निकाला पाहता येईल.
मुंबई महापालिकेतील 'कार्यकारी सहायक' पदासाठी 2 डिसेंबर 2024 ते 6 डिसेंबर 2024 आणि 11 डिसेंबर 2024 ते दिनांक 12 डिसेंबर 2024 या कालावधीदरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडली. या 1 हजार 846 पदांसाठी एकूण 1 लाख 11 हजार 637 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी 91 हजार 252 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या, परीक्षेचा निकाल आज (दिनांक 25 फेब्रुवारी 2025) रोजी जाहीर करण्यात आला आहे. एकूण 1734 पानांचा हा निकाल असून यामध्ये सर्व 91 हजार 252 उमेदवारांचा निकाल (गुण) समाविष्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर ‘उज्ज्वल संधीकरिता/ सर्व नोकरीच्या संधी/ प्रमुख कर्मचारी अधिकारी’ या सदरामध्ये हा निकाल उपलब्ध आहे. त्यामुळे, या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी येथील वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहावा. दरम्यान, भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात येत आहे.
1846 पदांसाठी जाहिरात, विरोधानंतर अट बदलली
मुंबई महानगरपालिकेनं कार्यकारी सहायक म्हणजेच लिपीक पदाच्या भरतीची जाहिरात नव्यानं प्रसिद्ध केली होती. या पदांसाठीच्या जाहिरातीमध्ये पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यात आली होती. मुंबई महापालिकेनं कार्यकारी सहायक पदाच्या 1846 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर निश्चित करण्यात आली होती. मात्र, नोकरभरतीची तयारी करणारे विद्यार्थी, राजकीय नेते यांच्याकडून पहिल्या प्रयत्नात दहावी आणि पदवी उत्तीर्ण असल्यासंदर्भातील अट काढून टाकण्यासंदर्भात मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर मुंबई महापालिका प्रशासनानं या मागणीची दखल घेत अट काढून टाकत असल्याची घोषणा करत नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करू असं म्हटलं होतं. त्यानुसार मुंबई महापालिकेनं दुसऱ्यांदा जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज भरले.
हेही वाचा
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली