Maharashtra Breaking News 07 September 2022 : मुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनामुळे पुण्यातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नागपूरः दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
#Rain #NagpurRain #Lightning #Heavyrainfall
Pune: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आरती करून गणरायाचे आशीर्वाद घेतले . ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
MHA - AAC - CET - 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला . त्या निकालावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत, घोटाळा झाल्याचा आरोप परीक्षार्थी आणि त्यांचे पालकांनी केलेला आहे . लागलेल्या मिरीटनुसार मेरिटमध्ये आलेल्या प्रथम काही विद्यार्थ्यांच्यां गुणदांनामध्ये गैरप्रकार पाहायला मिळत आहे असे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे . याची चौकशी करून कारवाई करा, तसेच या परीक्षेचा पुन्हा मूल्यांकन करा अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात कला विभाग आणि सीईटी परीक्षा केंद्राशी संपर्क साधला असता काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही . मात्र या परीक्षेत घोटाळा झाला आहे असे म्हणणाऱ्या विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी यांनी.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले असले तरीदेखील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेय. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ही पार्थ पवार वर्षा निवासस्थानी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सुरुवातीला दुल्हन हम ले जायेंगे, त्यानंतर कृषी अभ्यास दौरा आणि आता 'रक्षा स्थायी समिती का अध्ययन दौरा' असं गाडीवर स्टिकर लावून आयकर विभागाने औरंगाबाद येथे चार ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. औरंगाबाद येथील धान्य व्यापाऱ्यावर ही धाड टाकण्यात आली आहे. शहरातील ज्योतीनगर भागात राहणाऱ्या व्यास नावाच्या धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरू आहे. देशभरात या संबंधात छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्याकडे राजस्थानमध्ये शासकीय योजनेसाठी धान्य पुरवण्याचं कंत्राट असल्याची माहिती आहे. यातूनच ही छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्यांचे पुतणे हे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राजकीय अँगलनेदेखील या छापेमारीकडे पाहिले जात आहे.
सुरुवातीला दुल्हन हम ले जायेंगे, त्यानंतर कृषी अभ्यास दौरा आणि आता 'रक्षा स्थायी समिती का अध्ययन दौरा' असं गाडीवर स्टिकर लावून आयकर विभागाने औरंगाबाद येथे चार ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. औरंगाबाद येथील धान्य व्यापाऱ्यावर ही धाड टाकण्यात आली आहे. शहरातील ज्योतीनगर भागात राहणाऱ्या व्यास नावाच्या धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरू आहे. देशभरात या संबंधात छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्याकडे राजस्थानमध्ये शासकीय योजनेसाठी धान्य पुरवण्याचं कंत्राट असल्याची माहिती आहे. यातूनच ही छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्यांचे पुतणे हे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राजकीय अँगलनेदेखील या छापेमारीकडे पाहिले जात आहे.
सुरुवातीला दुल्हन हम ले जायेंगे, त्यानंतर कृषी अभ्यास दौरा आणि आता 'रक्षा स्थायी समिती का अध्ययन दौरा' असं गाडीवर स्टिकर लावून आयकर विभागाने औरंगाबाद येथे चार ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. औरंगाबाद येथील धान्य व्यापाऱ्यावर ही धाड टाकण्यात आली आहे. शहरातील ज्योतीनगर भागात राहणाऱ्या व्यास नावाच्या धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरू आहे. देशभरात या संबंधात छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्याकडे राजस्थानमध्ये शासकीय योजनेसाठी धान्य पुरवण्याचं कंत्राट असल्याची माहिती आहे. यातूनच ही छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्यांचे पुतणे हे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राजकीय अँगलनेदेखील या छापेमारीकडे पाहिले जात आहे.
Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमारांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. यावर उद्याच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Pune News : मुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनामुळे पुण्यातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी. मुख्यमंत्री पुण्यातील तब्बल 12 गणेश मंडळांना भेट देणार आहेत . त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक त्यांच्या ताफ्यासाठी अडवण्यात आलीय. त्यात पुण्यात प्रचंड पाऊस सुरु आहे.
Mumbai News : मढ मार्वे येथील अवैध स्टुडिओ प्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडून (Mumbai Mahanagar Palika) याप्रकरणी एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. महापालिका उपायुक्त हर्षद काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती याप्रकरणाची चौकशी करणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी या समितीची स्थापना केली आहे. त्यांचा अहवाल 4 आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मढ मार्वे येथे तयार करण्यात आलेल्या 49 फिल्म स्टुडिओंच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसच्या (Congress) कोट्यातून कॅबिनेट मंत्री असलेल्या अस्लम शेख यांनी हे स्टुडिओ बांधल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. याप्रकरणी CRZ आणि NDZ च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला जात आहे.
Parbhani Crime News : परभणीच्या सेलु येथुन 10 वर्षीय चिमुरडीला दुचाकीवरून घेऊन जात तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याच्या प्रकरणात अथक परिश्रमातून दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी याबाबत माहिती दिली असुन हे दोन्ही नराधम आरोपी चारठाणा येथील असून माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य करणारे हे आरोपी एका शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना अटक केलीय.सध्या या दोघांचे नाव कळले नसून हे दोन्ही आरोपी तरुणच दिसत आहेत आणि महत्वाचे म्हणजे ज्या दुचाकीवरून या दोघांनी मुलीला पळवले त्या दुचाकीला नंबर नाही आणि त्यावर "रामराज्य"असे नाव टाकलेले आहे जी दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
Compassionate Appointment : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वाच्या आधारे दिली जाणारी नियुक्ती बेकायदा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
ठाण्यानंतर लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नवी मुंबई दौरा, शरद पवार या महिन्याच्या शेवटी नवी मुंबईत येण्याची शक्यता, शरद पवार येण्यापूर्वी संघटनेत फेरबदल, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदावरून अशोक गावडे यांची हकालपट्टी, नामदेव भगत यांची नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष पदी देखील नव्याने नियुक्ती होण्याची शक्यता , 'एबीपी माझा' ला विश्वसनीय सूत्रांची माहिती
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात होऊ घातलेल्या 149 ग्रामपंचायतीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर जवळपास 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात नंदुरबार तालुक्यातील 6 तर शहादा तालुक्यातील 05 ग्रामपंचायतींचा समावेश आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज मागे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 172 जणांनी माघार घेतली असल्यानं आता 506 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात उभे ठाकले आहेत. तर सदस्य पदासाठी 507जणांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता सदस्यपदांसाठी 2949 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नंदुरबार आणि शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांनी राजकीय धुराळा उडणार असल्याच चित्र माघारीनंतर दिसून येत आहे.
Beed News : धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मागच्या आठवडाभरापासून कार्यक्रमांची रेलचेल आहे.. या महोत्सवात होणाऱ्या कार्यक्रमात तरुणांची मोठी गर्दी आहे. मात्र स्टेज वरती परफॉर्मन्स सुरू झाला की हे हुल्लडबाज तरुण कायम गोंधळ घालत असतात. त्यामुळे पोलिसांनी काही वेळा या तरुणांना लाठ्यांचा प्रसाद सुद्धा दिला. मात्र तरीसुद्धा हे हुल्लडबाज तरुण काही केल्या थांबायला तयार नाहीत. ईशा देओल आणि मानसी नाईक यांच्या लावण्य जल्लोष नावाचा कार्यक्रम काल होता . यावेळी स्टेजवर परफॉर्मन्स चालू असताना मंडपाच्या शेवटच्या बाजूला बसणाऱ्या काही तरुणांनी प्लास्टिकच्या खुर्च्या तोडल्या. आयोजकाकडून रोज या हुल्लडबाज तरुणांना शांत बसण्याचे आवाहन केले जाते मात्र हा गोंधळ काही शांत होत नव्हता.
Purandar Airport News: पुरंदर विमानतळाला जागा देण्यास गावकऱ्यांचा नकार, गावकरी देणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, पारगाव, खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण, उदाचीवाडी आणि वनपुरी गावच्या 7 जणांचे शिष्टमंडळ निवेदन देणार
नव्या जागेला संरक्षण विभागाने परवानगी नाकारल्यामुळे पहिल्याच जागेवर विमानतळ होणार अशी चर्चा होती,. त्या जागेवरील गावकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिला आहे.
Gold Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold) किमती घसरल्याचा (Silver) परिणाम आज भारतीय किरकोळ सराफा बाजारावर दिसून येत आहे. काल जागतिक बाजारात सोन्याच्या भावात 0.9 टक्क्यांनी घट झाली होती, तर आज सोने 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही दरात घसरण दिसून येत आहे. किरकोळ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला आहे.
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्याचा दबाव भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 407.73 अंकांची घसरणीसह 58,789.26 अंकावर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 136.20 अंकांच्या घसरणीसह 17,519.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 287 अंकांच्या घसरणीसह 58,909.36 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या घसरणीसह 17,571.35 अंकांवर व्यवहार करत होता.
Income Tax Raids : देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची (Income tax department) कारवाई सुरु आहे. आज आयकर विभागनं देशातील विविध 50 ठिकाणी छापेमारी केली आहे. दिल्लीपासून, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके पोहोचली असून, चौकशी सुरु आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी दिल्लीतील अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे. जयपूरमध्येही व्यावसायिकांच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापे टाकले आहेत.
आयकर विभागानं मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी देशातील 50 विविध ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी अनेक व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याची माहिती मिळते आहे. त्या प्रकरणीच आयकर विभागानं ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
Mahanagar Palika Election 2022 : गणेशोत्सवाचा योग जुळवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), भाजप (BJP) आणि मनसेनं (MNS) महापालिका निवडणुकीची एकीकडे तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकांचा रणसंग्राम (Mahanagar Palika Election) दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गणपती दर्शनाच्या (Ganesh Festival) निमित्तानं वेगवेगळे नेते आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. या दर्शनाच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) असलेल्या नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्याचा उद्देशही असल्याचं म्हटलं जातं. दुसरीकडे गणेश दर्शनाच्या (Ganeshotsav 2022) निमित्तानं शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढताना दिसत आहे. नव्या राजकीय गणितांची (Maharashtra Politics) जुळवाजुळव सुरु असताना महापालिका निवडणुका दिवाळीनंतरच (Diwali 2022) घेण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती मिळत आहे.
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील काही अंगणवाडी केंद्रात 3 ते 6 वयोगटासाठी पुरक पोषण आहार पाठविण्यात आलेला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य विद्यार्थ्यांसाठी दिल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. तो आहार 15 मे ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीसाठी असुन जिल्हा प्रशासनाने शासनाकडून ऑगस्ट महिन्यात माल प्राप्त झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 3 महिन्याचा आहार साहित्य कोरडा वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले तर 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या 1 महिन्याचा आहार गरम ताजा करुन मुलांना देण्याच्या सुचना केल्या.
Buldhana News Update - शाळेच्या मुख्याध्यापकाने केला शाळेतील पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार. पिंपळगाव राजा पोलिसांत आरोपी मुख्याध्यापकाविरुद्ध कलम 354 (A) , व पोक्सो नुसार गुन्हा दाखल. देविदास जानराव दिघोळे असं 54 वर्षीय मुख्याध्यापकाचं नाव. आरोपी मुख्याध्यापक फरार.
'राऊतांना जेलमध्ये भेटण्याची परवानगी ठाकरेंना नाकारल्याचं वृत्त चुकीचं'; संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची 'माझा'ला माहिती
1.न्या. धनंजय चंद्रचूड
2.न्या.एम आर शहा
3.न्या. कृष्ण मुरारी
4.न्या.हिमा कोहली
5. न्या. पी नरसिंहा
राज्यपाल लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल
आयकर विभागाच्या एकाचवेळी 50 ठिकाणी छापेमारी, वेगवेगळ्या प्रकरणात आयकर विभागाची मोठी कारवाई, 300 पेक्षा अधिक आयकर अधिकाऱ्यांचा कारवाईत सहभाग
पद्म पुरस्काराची शिफारस करण्यासाठी सहा सदस्य समिती गठित, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित, समितीमध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, उदय सामंत, दीपक केसरकर आणि सामान्य प्रशासन विभागातील राज शिष्टाचार अधिकारी यांचा समावेश, 26 जानेवारी रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची ही समिती करणार शिफारस
ख्वाजा युनूस प्रकरणातील आरोपी असलेल्या चार पोलिसांना दिलासा मिळणार का हे आज स्पष्ट होईल. या पोलिसांची नावं मागे घेण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. साल 2002 च्या घाटकोपर ब्लास्टमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्यूनंतर त्याची आई आसिया बेगमने न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
Maharashtra News : भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या प्रक्रियेला गती देणं हे प्रमुख कारण यामागे आहे. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी, दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक, त्यानंतर जिपचे सीईओ यांची ते भेट घेणार आहेत.
Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी घेण्यात येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणी जवळपास 11 मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल.
1. न्या. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा
आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी
राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी घेण्यात येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणी जवळपास 11 मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल.
1. न्या. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा
आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.
किरीट सोमय्या यांचा पुन्हा रत्नागिरी दौरा
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या प्रक्रियेला गती देणं हे प्रमुख कारण यामागे आहे. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी, दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक, त्यानंतर जिपचे सीईओ यांची ते भेट घेणार आहेत.
ख्वाजा युनूस प्रकरणाशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी
ख्वाजा युनूस प्रकरणातील आरोपी असलेल्या चार पोलिसांना दिलासा मिळणार का हे आज स्पष्ट होईल. या पोलिसांची नावं मागे घेण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. साल 2002 च्या घाटकोपर ब्लास्टमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्यूनंतर त्याची आई आसिया बेगमने न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -