(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा जोर; सेन्सेक्समध्ये 400 अंकांची घसरण
Share Market Opening Bell: शेअर बाजारात सकाळच्या सत्राची सुरुवात घसरणीसह झाली. अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे.
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची आजची सुरुवात घसरणीसह झाली. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्याचा दबाव भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 407.73 अंकांची घसरणीसह 58,789.26 अंकावर खुला झाला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टीमध्ये 136.20 अंकांच्या घसरणीसह 17,519.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 287 अंकांच्या घसरणीसह 58,909.36 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 84 अंकांच्या घसरणीसह 17,571.35 अंकांवर व्यवहार करत होता.
आज मीडिया, मेटल, फार्मा आणि ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी असल्याचे दिसून येत आहे. इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. सर्वाधिक घसरण बँकेच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. आयटी सेक्टरमध्ये 0.63 टक्क्यांची घसरण दिसत आहे. तर, वित्तीय सेवा क्षेत्रातील शेअरमध्ये 0.6 टक्क्यांची किंचित घसरण दिसून येत आहे. ऑटो शेअरमध्ये 0.42 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी पाच कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी असल्याचे दिसून आले आहे. तर, उर्वरित 25 शेअरच्या दरात घसरण असल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय, 50 पैकी 9 शेअरमध्ये तेजी असून 39 शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. दोन शेअरच्या दरात कोणताही बदल झाला नाही.
एशियन पेंट्स, नेस्ले, एचयूएल, पॉवरग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
कोल इंडिया, टाटा कंझ्युमर्स, श्री सिमेंट, एचयूएल आणि एचडीएफसी लाइफच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
मंगळवारी बाजारात घसरण
शेअर बाजारात (Stock Market Updates) मंगळवारी अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्समध्ये मंगळवारी 0.08 टक्क्यांची घसरण होऊन तो 59,196 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.06 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,655 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टीमध्येही 139 अंकाची घसरण होऊन तो 39,666 अंकावर स्थिरावला. आयटी, मेटल, एफएमसीजी, बँक आणि रिअॅलिटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली.
इतर महत्त्वाच्या बातम्या: