Chhaava Movie : विक्की कौशलचा (Vicky Kaushal) नुकताच दिग्दर्शित झालेला 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर (Chhaava Movie Box Office Collection) जबरदस्त कमाई केली आहे. विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत खूप प्रेम मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. दोघांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून हा चित्रपट पाहून सर्व प्रेक्षक भावूक होताना दिसत आहेत. छावा चित्रपट बघून अहिल्यानगर येथील महिलादेखील भावूक झाल्या. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या आहेत.


छावा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या अहिल्यानगर येथील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. छत्रपती संभाजी महाराज की जय, हा जयघोष करत महिला चित्रपट गृहात दाखल झाल्या होत्या. मात्र चित्रपट पाहून निघताना अक्षरशः सर्व महिला भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दाटले होते. 


महाराजांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका


छावा चित्रपट पाहिल्यानंतर महिला म्हणाल्या की, आम्ही हा चित्रपट पाहायला जाताना आमच्यात अत्यंत उत्साह होता. हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. थिएटरमध्ये येताना आम्ही सर्वांनी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी इतके काही केले. छत्रपतींनी आपल्यासाठी इतके मोठे बलिदान दिले. ते बलिदान युवा पिढीने व्यर्थ जाऊ देऊ नये. आपल्या हिंदू धर्माला आपण जपून ठेवलं पाहिजे, असे म्हणताना महिलांचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. 


तीन दिवसांत ओलांडला 100 कोटींचा टप्पा


विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं तीन दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. 31 कोटी रुपयांची ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाने तीन दिवसांत 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाला पहिल्या तीन दिवसांत खूप प्रेम मिळालं. विक्कीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'छावा' तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.



इतर महत्त्वाच्या बातम्या


Chhaava: 'छावा' चित्रपटातलं शेवटचं दृश्य संपलं अन् चिमुकल्याने रडवेल्या आवाजात गारद दिली, थिएटरमधील VIDEO व्हायरल


Nana Patekar Wife In Chhaava Movie: 'छावा'मध्ये 'या' दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्याच्या पत्नीनं साकारलीय 'धाराऊ'; नवऱ्यापासून वेगळी राहते, पण...