Maharashtra Breaking News 07 July 2022 : मेळघाटात दूषित पाण्याने दोघांचा मृत्यु तर 30 जणांची प्रकृती बिघडली
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सनदी अधिकारी दौलत देसाई यांचा महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड मेडीसिन विभागच्या संयुक्त सचिव पदाचा तडकाफडकी राजीनामा
तीन दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट लिहून सांगितलं राजीनाम्याचं कारण
जाणीवपूर्वक मुळ प्रवाहातून बाजूला केल्यामुळे स्वतःहून राजीनामा देत असल्याचं फेसबुक पोस्ट मध्ये नमूद
2019 साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून लक्षवेधी काम करून देखील साईड लाईन करण्यात आल्याने राजीनाम्याचा निर्णय
राजीनामा देण्यापूर्वी दौलत देसाई यांच्याकडे महारष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड मेडीसिन विभागचं संयुक्त सचिव पद
अकोल्याचे खासदार संजय धोत्रे गेल्या वर्षभरापासून दुर्धर आजाराने गंभीर आजारी आहेत. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरूयेत. आज अकोल्यात आलेले केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संजय धोत्रेंची त्यांची रामनगर निवासस्थानी भेट घेत विचारपूस केलीय. यावेळी गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन, मुलगा सारंग आणि सुन उपस्थित होत्याय.
मेळघाटात दूषित पाण्याने दोघांचा मृत्यु तर 30 जणांची प्रकृती बिघडली आहे. चिखलदरा तालुक्यातील चुरणी, काटकुंभ, पंचडोंगरी या गावात मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने दूषित पाणी पिल्यामुळे कॉलर सदृश्य आजारामुळे साथ झाली...
यामुळे आज एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झाला तर 30 जणांवर अचलपूर उपजिल्हा आणि चुरणी प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी उपचार सुरू आहेत. वीजबिल भरलं नाही म्हणून गावाची वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती मिळतेय..
आज अकोला येथील दीक्षांत समारंभ आटोपून राज्यपाल भगतसिंह कोशारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात भेट देऊन दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी यावेळी संत गजानन महाराज मंदिरात पारायण करून महाप्रसाद घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलायचं टाळलं.
Navi Mumbai : पनवेल एसटी डेपो समोरील गटार उघडे असल्याने अनेक जण पडून जखमी झाले आहेत. मुसळधार पावसात गटार पाण्याने पूर्ण भरल्याने रस्ता आणि गटार यातील फरक कळत नसल्याने डेपोत जाणारे अनेक जण गटारात पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन जाणारी महिला या गटारात पडली होती. बाळाच्या तोंडात घाण पाणी गेल्याने त्याला रूग्णालयात उपचार करावे लागले होते.
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पोहायला गेलेल्या 2 विद्यार्थ्यांचां बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या मुक्त विद्यापीठाचा पेपर सुरू असल्याने आज शेवटचा पेपर होता, तो पेपर आपटून विद्यार्थी एकत्र पोहोण्यासाठी गेले होते. 8 मुले गेली होती विरचक्क धरणात पोहायला गेले होते. सध्या धरणात पाणीसाठा कमी झाला असून मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या गाळात पाय बसून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. जिजामाता महाविद्यालय येथील मुक्त विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी होते. येथील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं असून परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबईत आजही जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच लोकल ट्रेनचा वेग मंदावला आहे. अशातच मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, ''सर्वच सेक्शनमध्ये सतत पाऊस पडत आहे.सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु आहे. मात्र काही गाड्या विलंबाने सुरू आहे.''
Aurangabad: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे 16 जुलैपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 16 ते 25 जुलै असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. या दरम्यान ते पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातून या दौऱ्याला सुरवात होणार असून शेवट औरंगाबादला होणार आहे.
जागतिक मंदीच्या काळात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सुरूच असून आता ती प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत खाली आले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे.
जागतिक मंदीच्या काळात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सुरूच असून आता ती प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत खाली आले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे.
ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईमध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील 30 ते 32 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
पानसरे हत्याकांड प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी जबाबदारीतून मुक्त, तपास अधिकारी म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडील पदभार बदलण्यास हायकोर्टाची परवानगी, मात्र चार आठवड्यांत नवीन तपासअधिकारी नियुक्तीकरून या प्रकरणात आजवर केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश, राज्य सरकारनं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं स्वीकारली, गेली चार वर्ष कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करत होते काकडे
राष्ट्रपती निवडणुकीआधी १७ तारखेला वाय बी चव्हाण येथे महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक होणार, शरद पवारांसह राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते सोबत उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीत उपस्थित असतील
या बैठकीला स्वतः उमेदवार यशवंत सिन्हा सुद्धा उपस्थित असण्याची शक्यता
मातोश्रीवर बैठकांचा सपाटा सुरुच, आज दक्षिण मुंबईतल्या मतदारसंघातल्या पदाधिका-यांची बोलावली बैठक , वरळी, शिवडी, भायखळा मतदारसंघातले नगरसेवक, शाखाप्रमुख आणि आमदार उपस्थित, दिवसभर विविध विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिका-यांशी उद्धव ठाकरे साधणार संवाद
जान्हवी कुकरेजा हत्याकांड, मुख्य आरोपी श्री जोगधनकरचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला, 19 वर्षीय जान्हवीचा 1 जानेवारी 2021 रोजी खार येथील इमारतीत थर्टी फर्स्टच्या पार्टीत झाली होती हत्या, जान्हवीचा प्रियकर श्री आणि बालमैत्रिण दियानं केलेल्या मारहाणीत जान्हवीचा मृत्यू झाल्याचा आरोप
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अथॉरिटीची पहिली बैठक सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयातून सहभागी. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनबलगन, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, संजय राऊत सिल्व्हर ओक निवासस्थानी
Powai Fire : पवई हिरानंदानीमध्ये आग, शॉपिंग मॉलमध्ये आग लागल्याची घटना, आगीवर नियंत्रण आणण्याचं काम सुरु
COVID-19 Booster Dose : कोरोना लसीकरणातील दुसरा डोस घेण्यासाठी आणि त्यानंतर बूस्टर डोस घेण्यासाठी नऊ महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत होती... मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण18 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं अंतर कमी करण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील आणि बूस्टर डोसमधील (Booster Dose) अंतर नऊ महिन्यावरुन सहा महिने करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. एसटीएससीने लसीच्या दोन डोसमधील अंतर नऊ महिन्यावरुन सहा महिने करावे, अशी शिफारस केली होती.
Maharashtra Politics : खासदार भावना गवळींना लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवण्यात आलयं. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी अलर्ट मोडवर आलेत धक्का दिला. शिवसेनेचे 12 खासदार फुटणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसापुर्वी भावना गवळी आणि राहुल शेवाळेंनी लिहलेलं पत्र या दिशेने असल्याची चर्चा आहे.
Ashadhi Ekadashi 2022 : ज्ञानोबांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे. तर संत सोपानदेव भेट सुद्धा होणार आहे. तुकोबांची पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तोंडले बोंडले येथे धावा होणार आहे.
Maharashtra Rains Updates : मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील 5 दिवसासाठी अलर्ट देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना अतिवृष्टी तर काही जिल्हयांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
Maharashtra Rains Updates : परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळं घाट रस्ता बंद झालेला होता. रात्री 3.30 वाजता दरड बाजूला करुन वाहतूक सुरु करण्यात आलेली होती. पुन्हा 5 जुलैला मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येवून पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे. अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता आहे. 9 जुलै पर्यंत हवामान खात्याकडून जिल्हयासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे 6 जुलै ते 9 जुलै दरम्यान घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
परशुराम घाट 9 जुलैपर्यंत घाट वाहतुकीसाठी बंद
परशुराम घाटामध्ये दरड आल्यामुळे घाट रस्ता बंद झालेला होता. रात्री 3.30 वाजता दरड बाजूला करुन वाहतूक सुरु करण्यात आलेली होती. पुन्हा 5 जुलैला मोठ्या प्रमाणात परशुराम घाटामध्ये दरड खाली येवून पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे. अतिवृष्टी सुरू असून घाटामध्ये अनेक ठिकाणी धोकादायक दरडी केव्हाही खाली येण्याची शक्यता आहे. 9 जुलै पर्यंत हवामान खात्याकडून जिल्हयासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे 6 जुलै ते 9 जुलै दरम्यान घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस अलर्ट
मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तुफान फटकेबाजी सुरु असतानाच पुढील 5 दिवसासाठी अलर्ट देण्यात आलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांना अतिवृष्टी तर काही जिल्हयांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
आषाढी वारी
ज्ञानोबांची पालखी आज भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे. ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे. तर संत सोपानदेव भेट सुद्धा होणार आहे. तुकोबांची पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी असणार आहे. तोंडले बोंडले येथे धावा होणार आहे.
शिवसेनेला आणखी एका उठावाची भीती?
खासदार भावना गवळींना लोकसभेत शिवसेनेच्या प्रतोद पदावरुन हटवण्यात आलयं. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40 आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी अलर्ट मोडवर आलेत धक्का दिला. शिवसेनेचे 12 खासदार फुटणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसापुर्वी भावना गवळी आणि राहुल शेवाळेंनी लिहलेलं पत्र या दिशेने असल्याची चर्चा आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरण
उमेश कोल्हे यांच्या घरी कपिल मिश्रा कुटुंबियांना भेट देऊन 30 लाख रुपयाची सहायता निधी येणार आहे. अमरावती येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय सुरक्षा यंत्रणा (एनआयए) करणार असल्याने प्रकरणाशी संबंधित संपूर्ण कागदपत्रे तसेच अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींचा ताबा एनआयए घेणार आहे. या आरोपींना आज रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 1800 करोड रूपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. दुपारी 2 वाजता एलटी कॉलेज येथे अक्षय पात्र मध्याहन भोजन किचनचं उद्घाटन करणार आहेत.
आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक
आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना ज अर अँम्ब्युलन्सने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात हलवलं जाणार आहे.
भारत आणि इंग्लंड संघा दरम्यान आजपासून तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेला सुरूवात
भारत आणि इंग्लंड संघादरम्यान आजपासून तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना साऊथेंप्म्टन येथे रात्री 10.30 वाजता होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -