Maharashtra Breaking News 06 June 2022 : : राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2022 09:07 PM
मुख्यमंत्र्यांना आपल्या आमदारांवर विश्वास नाही: रवी राणा

राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना आपल्या शिवसेनेच्या आमदारांवर विश्वास नाही का, अशी परिस्थिती मुख्यमंत्र्यांवर आली आहे. सर्व शिवसेनेच्या आमदारांना एका हॉटेलमध्ये देखरेखीखाली ठेवावे लागते .त्यामुळे त्यांना ही आपले आमदार आपल्या सोबत आहे की नाही, हे माहीत नाही. आमदार आशिष जैस्वाल जे बोलले की, महाविकास आघाडी मधले मंत्री टक्केवारी घेतल्या शिवाय काम करत नाही हेच शब्द प्रत्येक आमदाराच्या तोंडी आहे, असं आमदार रवी राणा म्हणाले आहेत. 

आषाढीसाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचे पालन करण्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाह

पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी उत्तरेवर देखील कोरोनाचे सावट वाढू लागले आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरणार असून 15 लाखापेक्षा जास्त भाविक आषाढीला येण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. आज सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनासोबत यात्रेची तयारी बैठक घेतली असता यावेळी भरणे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे सेंटर वाढवण्याच्या सूचना दिल्या. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे डोस घेण्याचे आवाहन भरणे यांनी केले. यावेळी आषाढीला येणाऱ्या प्रत्येक भाविकाने खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

नवज्योत सिंह सिद्धू रुग्णालयात दाखल

रोड रेज प्रकरणी पटियाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी त्यांना चंदीगडच्या पीजीआयएमईआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यकृताच्या समस्येनंतर सिद्धू यांना चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सिद्धू यांना तपासणीसाठी दाखल केले आहे. 

भाजपच्या नुपूर शर्मांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अंबाजोगाई शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भाजपच्या  नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अपशब्द वापरुन इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्यने  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत अंबाजोगाई शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी मुस्लिम बंधाव मोठया संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. 

जमिन कसणाऱ्या आदिवासींच्या नावे जमीन व्हावी: शिवाजी ढवळे

एकलव्य संघटनेची राज्यस्तरीय बैठक राज्यमंत्री तसेच संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ‌ढवळे यांच्या उपस्थित शिर्डीत पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये संघटनेची भुमिका, ध्येय‌धोरणे तसेच समाजाचे प्रलंबीत प्रश्न याबाबत या बैठकीत मंथन करण्यात आले. अनेक वर्षांपासून जमीन कसणाऱ्या आदिवासींना कोणतीही अट न लावता जमीन नावावर करून द्यावी, तसेच 35 वर्षात आदिवासींसाठी आलेला निधी नेमका कुठे खर्च झाला ? यासाठी अभ्यास आयोगाची स्थापना करावी अशी मागणी यावेळी ढवळे यांनी केली.

Congress : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत राहण्याचे आदेश

Congress : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांना, मंत्र्यांना, अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना उद्यापासून मुंबईत राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ काँग्रेसने देखील  आदेश दिले आहेत. सर्व आमदार, मंत्री, राज्यमंत्री आणि आपक्ष आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील लोणी येथे शेतीच्या वादातून तीन जणांवर जीवघेणा हल्ला

अर्धापूर तालुक्यातील लोण येथील शेतात मशागतीसाठी गेले असता, तुम्ही शेतात यायच नाही म्हणत पंचशीला लोणे, उमेश ढवळे, नेहा ढवळे यांना मधुकर लोणे आणि त्यांच्या मुलांनी कोयता, तलवारीने प्राणघातक हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी घडलीय. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

राज्यात नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्रासह नवीन तीन अभयारण्ये घोषित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह नवीन तीन अभयारण्ये घोषित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. वन क्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनवर्सन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा, असे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Maharashtra News : राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता

Maharashtra News : राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष तटस्थ  भूमिका घेण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनही उत्तर आलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला नाही तर सपा तटस्थ भूमिका घेण्याची शक्याता आहे.

सांगलीत बैलगाडी शर्यतीदरम्यान बैलाचा चिवटपणा, पाय घसरुन पडल्यानंतर क्षणात उठून पुन्हा बैलाची दौड

Sangli News : कवठेमहांकाळमधील  कुकटोळी गावामध्ये हजारो बैलगाडी शर्यती शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीवेळी एका बैलाचा चिवटपणा दिसून आला. शर्यत सूटल्यानंतर काही वेळातच एका बैलजोडीतील एका बैलाचा पाय पळतानाच घसरला आणि तो पडला. बैलगाडी हाकणाऱ्याने एका बैलाचा पाय घसरला हे पाहून दुसऱ्या बैलाची वेसण ओढत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत एका क्षणातच पडलेल्या बैलाने उठून पुन्हा दौड मारली. बैल घसरुन पडलेला आणि लगेच उठून पुन्हा त्या बैलाने दौड ठोकल्याने ही घटना पाहणाऱ्या बैलप्रेमींनी टाळ्या आणि शिट्टी वाजवत बैलाच्या चिवटपणाचे कौतुक केले.

हिंगोलीत लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणारा पिकअप उलटला, आठ जण जखमी

Hingoli News : लग्नाला वर्‍हाडी मंडळी घेऊन जाणारा पिकअप पलटी झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. सेनगाव-गोरेगाव रोडवर दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातातील आठ जखमी वऱ्हाडी मंडळींना हिंगोलीमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यापैकी चार जण गंभीर असल्याची माहिती आहे.

Akola News: अकोला: जिल्हा परिषदेच्या हातरुण गटाच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दणदणीत विजय

Akola News : अकोला जिल्ह्यातील हातरुण जिल्हा परिषद गटातील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीननं दणदणीत विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या लिना शेगावकर यांनी शिवसेनेच्या अश्विनी गवई यांचा 1641 मतांनी पराभव केला आहे. हा विजय मिळवून शिवसेनेची जागा हिसकावत जिल्हा परिषदेत वंचितची ताकद वाढली आहे. बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यासाठी हा पराभव जोरदार धक्का समजला जात आहे. 

Bhandara News : शॉर्टसर्किटमुळे टायरच्या दुकानाला लागली भीषण आग; जवाहरनगर येथील घटना

Bhandara News : शॉर्टसर्किटमुळे टायरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना भंडारा शहरालगत असलेल्या जवाहरनगर येथे घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाचारन करण्यात आले असून चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आज सकाळच्या सुमारास धनपाल उइके यांच्या शंकरा टायर आणि ऑइलच्या दुकानात अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने पेट घेतला आणि दुकानाला आग लागली. दुकानांच्या जवळच मालकाचे घर असल्याने लागलीच याची माहिती मालकाने अग्निशमन दलाला दिली असता घटनास्थळ गाठत आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आग विझविण्यास जरी यश आले असले तरी या आगीमुळे दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 

केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला

केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला. कौटुंबिक वादातून भावाने आशा वाघ यांच्यावर कोयत्याने हल्ला. आशा वाघ यांना जखमी अवस्थेत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

UK PM Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांना पक्षांतर्गत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार

UK PM Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांना पक्षांतर्गत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना आपल्याच पक्षातील खासदारांचा विश्वासदर्शक ठराव जिंकावा लागणार आहे.

संजय बियाणी यांच्या हत्येनंतर कुटुंबात आर्थिक वादातून कलह

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्येनंतर कुटुंबात आर्थिक वादातून कलह निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. कौटुंबिक कलहातून संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी आणि भाऊ प्रवीण बियाणी यांनी परस्पर विरोधी तक्रार केली आहे. नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची आज काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान त्या हत्येचा छडा नांदेड पोलिसांनी आज काही दिवसांपूर्वी लावून नऊ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. परंतु हत्येचा छडा लागल्यानंतर बियाणी कुटुंबीयांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून आर्थिक कलह निर्माण झाला आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी; घरांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील भडगाव येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसामुळे अनेक झाडे कोसळून घरांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील घरांवरील छप्पर, कौले, पत्रे वादळी वाऱ्याने उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे घरातील वस्तूंसह अन्नधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी स्वतः पडलेली झाडं तोडून बाजूला केली. मात्र, झालेल्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

अनिल देशमुखांसोबत नवाब मलिकांचाही ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी कोर्टात अर्ज दाखल

अनिल देशमुखांसोबत नवाब मलिकांचाही ही राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या परवानगीसाठी कोर्टात अर्ज दाखल


दोन्ही अर्जांवर ईडीला उद्यापर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश


दोन्ही अर्जांवर 8 जूनरोजी होणार सुनावणी


नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत

Nandurbar Election Updates : धडगाव पंचायत समिती पोट निवडणुकीची मतमोजणी पूर्ण, काँग्रेस उमेदवार सोनिया सिफा वळवी 3349 मतांनी विजयी 

Nandurbar Election Updates : धडगाव पंचायत समिती पोट निवडणुकीची मतमोजणी पूर्ण, काँग्रेस उमेदवार सोनिया सिफा वळवी 3349 मतांनी विजयी 

सियाचीन येथे ऑपरेशन मेघदूत पार पाडत असताना जखमी झालेले विपुल इंगवले यांचं निधन, शहीद घोषित

सियाचीन येथे ऑपरेशन मेघदूत पार पाडत असताना शत्रूंशी दोन हात करताना जखमी झालेले विपुल इंगवले यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे दवाखान्यात निधन झाले. सैनिक दलाने त्यांना  शहीद घोषित केले आहे. विपुल यांचे पार्थिव काही वेळातच  यांचे पार्थिव त्यांच्या भोसे या गावात दाखल होत आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यविधी केला जाणार आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी सहा महिन्याची , आई वडिल एक भाऊ दोन बहिणी आहेत असा परिवार आहे. चार महिन्यापूर्वी ते जखमी झाल्यामुळे ते गावी होते. नंतर पुन्हा पुण्यातील मिल्ट्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.

कोर्टात अर्ज दाखल करण्यापूर्वी नवाब मलिक यांच्यावतीने ईडीकडे राज्यसभेच्या मतदानासाठी परवागनी मिळावी यासाठी अर्ज

कोर्टात अर्ज दाखल करण्यापूर्वी नवाब मलिक यांच्यावतीने ईडीकडे राज्यसभेच्या मतदानासाठी परवागनी मिळावी यासाठी अर्ज, नवाब मलिक यांच्यावतीने राज्यसभेच्या मतदानासाठी वकिलांमार्फत आज कोर्टात अर्ज दाखल करण्यात येणार, अनिल देशमुख यांच्या मार्फत कोर्टात अर्ज दाखल झाल्यानंतर आपला देखील अर्ज दाखल करुन घ्यावा अशी विनंती नवाब मलिक यांच्या वतीने करण्यात येणार, ईडीच्या भूमिकेवर नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मिळणार की नाही हे स्पष्ट होणार

Solapur Maharashtra News :  घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल टाक्यांमध्ये भरुन बेकायदा विक्री, सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी विद्या लोलगेंसह दोघांविरुध्द गुन्हा

Solapur Maharashtra News : सोलापूर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी विद्या लोलगेंसह दोघांविरुध्द गुन्हा


घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल टाक्यांमध्ये भरुन बेकायदा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी दाखल झाला गुन्हा


सोलापूर शहर गुन्हे शाखेच्यावतीने ही कारवाई


शहरातील सिध्देश्वर नगर येथे एका मंगल कार्यालयाशेजारी बेकायदेशीर गॅसच्या टाक्या ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली 


शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्या गोडाऊनवर धाड टाकली असता त्यात 40 भरलेल्या गॅस टाक्या तर रिकाम्या 39 टाक्या आढळून आल्या 


या धाडीत 1 लाख 38 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला


विद्या लोलगे मालक असलेल्या गॅस एजन्सीत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणारा जाकीर सय्यद या प्रकारणातला मुख्य आरोपी 


मात्र विद्या लोलगे यांच्या सांगण्यावरुण आणि सांगनमताने अवैध व्यवसाय सुरु असल्याचे निष्पन्न झाल्याने दोघाविरोधात गुन्हा 


गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांनी याबाबत फिर्याद दिली 


एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ सह भादंवि २८६, ३३६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल

Aurangabad: किराणा दुकानाला भीषण आग;घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल

Aurangabad: औरंगाबादच्या बिडकीन गावातील भाजी मंडई भागात एका किराणा दुकानात आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग एवढी भीषण होती की, पोलिसांकडून घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाकडून आगीवर नियत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर यात लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. 

Manali Satara Accident : मनाली येथे ट्रेनिंगसाठी गेलेल्या साताऱ्यातील बसला अपघात, ट्रेनिंग वरून परतत असताना अपघात 

Manali Satara Accident : मनाली येथे ट्रेनिंगसाठी गेलेल्या साताऱ्यातील बसला अपघात, ट्रेनिंगवरून परतत असताना घडले अपघात 


मंडी याठिकाणी बसला अपघात 


अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मॉटेनिअरिंगच्या अंतर्गत सातारा जिल्हा परिषदेने केले होते नियोजन 


बस मध्ये होते 51 ट्रेकर्स 


आठ ते दहा जणांना दुखापत  


सातारा जिल्हाधिकारी यांनी तातडीने मंडी येथील जिल्हाधिकाऱ्यांची साधला संपर्क


 जखमी आणि इतरांना घाटातून तालुक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू

Palghar News : पालघर येथील बचचू भाई  इंडस्ट्रीजमध्ये मोठी आग, आटोक्यात आणण्यात यश, मोठं नुकसान

Palghar News : पालघर येथील बचचू भाई  इंडस्ट्रीजमध्ये मोठी आग लागली असून येथील विनोद कूकवेर कंपनित भीषण आग लागली होती. भांडी बनवनारी कंपनी असून अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून कंपनीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. 


 

गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार

सकाळी 7 वाजता शेगावहून पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर,  दुपारी 'श्री क्षेत्र नागझरी' येथे आगमन आणि पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावच्या या दिंडीच हे 53 वर्ष आहे. 700 भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी 750 किमी व  पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशी ला पंढरपूर पोहचणार आहे.  

अनिल देशमुख, नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार?

अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल केला आहे. नवाब मलिकही अर्ज सादर करणार आङे आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात  सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

Maharashtra News : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, कोरोनाचे वाढते आकडे आणि राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होणार

Maharashtra News : आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काल राज्यात 1494 नवीन रुग्णांचं निदान झालंय. याच अनुषंगाने मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा होणार आहे.

Salman Khan : सलमान आणि सलीम खानना धमकीचं पत्र..'सिद्धू मुसेवाला' करण्याची धमकी

Salman Khan : सलमानचे वडिल सलीम खान यांना काल सकाळी जॉगिंगला गेले असता त्यांना ते बसलेल्या बेंचवर धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात सलमानचा मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरु आहे. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 

Shivrajyabhishek Din 2022 : आज शिवराज्याभिषेक दिन... आजचा सोहळा थाटामाटात साजरा होणार, रायगडावर शिवभक्तांची लगबग

Shivrajyabhishek Din 2022 : आज रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. . गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. यंदा मात्र रायगड पुन्हा दुमदुमणार  आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष, राजकीय घडामोडींवर नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आहे 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


आज रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा


आज रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. . गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. यंदा मात्र रायगड पुन्हा दुमदुमणार  आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष, राजकीय घडामोडींवर नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आहे 


सलमान आणि सलीम खानना धमकीचं पत्र..'सिद्धू मुसेवाला' करण्याची धमकी


 सलमानचे वडिल सलीम खान यांना काल सकाळी जॉगिंगला गेले असता त्यांना ते बसलेल्या बेंचवर धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात सलमानचा मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध सुरु आहे. सलमानच्या गॅलॅक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. 


आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, कोरोनाचे वाढते आकडे आणि राज्यसभा निवडणुकीवर चर्चा होणार 


आज दुपारी 4 वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. काल राज्यात 1494 नवीन रुग्णांचं निदान झालंय. याच अनुषंगाने मंत्रीमंडळ बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यावर चर्चा होणार आहे.


अनिल देशमुख, नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार? 


अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल केला आहे. नवाब मलिकही अर्ज सादर करणार आङे आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात  सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 


गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार


 सकाळी 7 वाजता शेगावहून पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यानंतर,  दुपारी 'श्री क्षेत्र नागझरी' येथे आगमन व पारस येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. शेगावच्या या दिंडीच हे 53 वर्ष आहे. 700 भाविकांसह सकाळी शेगाव येथील मंदिरातून ही दिंडी पायी 750 किमी व  पाच जिल्ह्यातून प्रवास करत आषाढी एकादशी ला पंढरपूर पोहचणार आहे.  


उत्तरकाशीत बस दरीत कोसळून 25 जणांचा मृत्यू


उत्तरकाशीत डामटाजवळ प्रवासी बस 200 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सगळे प्रवासी मध्य प्रदेशातील होते. मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश सरकारनंही प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केलीये.  बातमी चालतीये. 


ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्षं पूर्ण 


अमृतसर येथील ऑपरेशन ब्लू स्टारला 38 वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दल खालसाकडून अमृतसर बंदचं आवाहन करण्यात आलंय. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 


 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातच्या दौऱ्यावर 


 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. ते मेहसाणा येथे तिरंगा रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर नागिरकांना संबोधित करणार आहेत. 


 गायक केके यांचं शेवटचं गाणं रिलीज होणार


गायक केके यांचं शेवटचं 'धूप पानी बहने दे' हे शेवटचं गाणं आज रिलीज होणार आहे. हे गाणं केकेनं गायलं आहे, गुलजार यांनी लिहिलं आहे तर शांतनु मोइत्रा यांनी कंपोज केलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.