Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा अध्यक्ष निवडीच्या तारखे संदर्भात आज पुन्हा एकदा राज्यपालांना महाविकास आघाडीचे स्मरणपत्र

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Mar 2022 04:27 PM
भांडुपच्या ड्रीमस मॉलला पुन्हा आग

भांडुपच्या ड्रीमस मॉलला पुन्हा आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

Pune News Update : पुणे-मुंबई लोहमार्गावरील सिग्नल ऑपरेशन/रिले रूममध्ये लागली आग

पुणे-मुंबई लोहमार्गावरील सिग्नल ऑपरेशन/रिले रूममध्ये आग लागलेली आहे. दापोडी रेल्वे स्थानकावर ही घटना सायंकाळी साडे सातच्या सुमारास घडली. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. या दरम्यान धावणाऱ्या रेल्वे काही काळासाठी जागीच थांबविण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाची दोन वाहनं घटनास्थळी दाखल झाली असून आता आगीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा पुणे रेल्वे विभागाने केलाय, त्यामुळे पुढील अर्धा तासात रेल्वे पुढे मार्गस्थ होतील.

विधानसभा अध्यक्ष निवडीच्या तारखे संदर्भात आज पुन्हा एकदा राज्यपालांना महाविकास आघाडीचे स्मरणपत्र

Mahrashtra News : विधानसभा अध्यक्ष निवडीच्या तारखेसंदर्भात आज पुन्हा एकदा राज्यपालांना महाविकास आघाडीने स्मरणपत्र दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, धगन भुजबळ, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांच्या सहीने राज्यपाल यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे.  राजभवनावर जाऊन राज्यपाल यांना  स्मरणपत्र दिलं आहे. 

Kolhapur News Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आता लहान मुलांना मिळणार प्रवेश 

Kolhapur News Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात लहान मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 10 वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश बंद करण्यात आला होता. याबरोबरच दिवसाला आता 30 हजार भाविकांना  अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे. जोतिबा मंदिरात देखील दहा वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश मिळणार आहे.  

#BREAKING : पाकिस्तानात पेशावरमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 23 जखमी, पोलीसांची माहिती  

#BREAKING : पाकिस्तानात पेशावरमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटात किमान 23 जखमी, पोलीसांची माहिती  

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना 10 मार्चपर्यंत दिलासा

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना 10 मार्चपर्यंत दिलासा मिळाला आहे. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह विधानं केल्याच्या आरोपाखाली मालवणी पोलिस ठाण्यात राणे पितापुत्रांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. यानंतर राणे पितापुत्रांची अटकपूर्व जामीनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेतली. दरम्यान आता पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन न्यायालयाने पुढील सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब केली आहे. तूर्तास अटकेची कारवाई करणार नसल्याची हमी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

Rashmi Shukla : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा; 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर  कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश

Rashmi Shukla : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा , 25 मार्चपर्यंत कोणतीही कठोर  कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश


रश्मी शुक्लांनी आपल्या विरोधात दाखल  एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका  दाखल केली आहे. राजकीय सूडबुद्धीनं गुन्हा दाखल करण्यात आल्याचा शुक्ला यांचा आरोप आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिंडोशी कोर्टाकडून अंतरिम दिलासा

Pune : शॉर्ट घालून घराबाहेर फिरत असल्याने शेजाऱ्यांकडून आयटी इंजिनिअर तरुणींना मारहाण

Pune : शॉर्ट घालून घराबाहेर फिरत असल्याने शेजाऱ्यांकडून आयटी इंजिनिअर तरुणींना मारहाण करण्यात आली आहे. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनीयर तरुणी शॉर्ट घालून फिरत असल्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना चपलेने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रक्षकनगर मध्ये बुधवारी ही घटना घडली. याप्रकरणी एका 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून एकाच कुटुंबातील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सेंट्रल किचनचे उदघाटन; 25 हजार लोकांसाठी जेवण बनवले जाणार

Mumbai : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत भायखळा येथे अक्षया चैतन्य फाउंडेशन तर्फे सेंट्रल किचनचे उदघाटन झाले आहे. या सेंट्रल किचन मधून दर दिवसाला 25 हजार लोकांसाठी जेवण बनवले जाणार आहेत आणि ते जेवण मुंबई महानगरपालिकेच्या 5 रूग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक, त्यासोबत महापालिकेच्या साठ शाळांच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.


मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये मिड डे मील सोबत आता ब्रेकफास्ट देण्याचा सुद्धा नियोजन केला गेला आहे. त्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता ब्रेकफास्ट सुद्धा दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर,उपमहापौर सुहास वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव,आमदार यामिनी जाधव हे उपस्थित आहे.

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

Mumbai Kurla news : प्रदुषणामुळे हैराण झालेल्या माहूलकरांना आता कुर्ल्यात पुनर्वसन, कुर्ला येथील प्रिमियम मिलच्या जागेवरील एचडीआयएलच्या प्रकल्पात होणार पुनर्वसन

Mumbai Kurla news : प्रदुषणामुळे हैराण झालेल्या माहूलकरांना आता कुर्ल्यात पुनर्वसन, कुर्ला येथील प्रिमियम मिलच्या जागेवरील एचडीआयएलच्या प्रकल्पात होणार पुनर्वसन


यासाठी एमएमआरडीएच्या ताब्यात असलेली २६०० घरे मुंबई महानगरपालिकेला देण्याचे नगरविकास विभागाचे आदेश


पाण्याच्या पाईप लाईनच्या सुरसुरक्षेसाठी या रहिवाशांना माहूल या ठिकाणी पुर्नवसन केलं होतं


मात्र प्रदुषणामुळे या रहिवाशांनी अनेक आंदोलनं केली होती. त्यानंतर न्यायालयाने ताशेरे ही ओढले होते



पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वता या ठिकाणी जाऊन  अनेकदा पाहणी ही केली होती


त्या नंतर या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला आहे

यूक्रेन-रशियाच्या युद्धाचे ढग भारतीय शेअर बाजारावर अधिक गडद, सेन्सेक्सचा निर्देशांक 55 हजारांखाली

यूक्रेन-रशियाच्या युद्धाचे ढग भारतीय शेअर बाजारावर अधिक गडद, सेन्सेक्सचा निर्देशांक 55 हजारांखाली, सेन्सेक्समध्ये 800 हून अधिक अंकांची घसरण, तर निफ्टी देखील 238 अंकांनी कोसळला, भारतीय शेअर बाजारात मागील 8 सेशन्समध्ये मोठं अस्थिर वातावरण

Maharashtra Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात एका महिन्यात 205 शस्त्रक्रिया
Maharashtra Ahmednagar News :   कोरोनाच्या काळात बंद असलेला अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग 26 जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्यात आलाय...या विभागात एक महिन्याच्या कालावधीत तब्बल 205 शस्त्रक्रिया करण्यात आल्यात...कोरोना काळात दोन वर्षे कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णसेवा कमी झाल्या होत्या, त्या आता पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्यात... अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी दिली... जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे...त्यातच कोरोना काळात अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबल्या होत्या, मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून, रुग्ण भरतीचे प्रमाण देखील कमी झाले आहे...सध्या जिल्हा रुग्णालयात केवळ सात कोरोना रुग्ण भरती आहेत तर कोरोना सदृश 29 रुग्ण उपचार घेत आहेत...त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील इतर सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्याचं डॉ. घोगरे यांनी सांगितले...तसेच रुग्णालयात 60 खाटांचे अद्ययावत आयसीयू वॉर्ड देखील लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले...

 
Sanjay Raut News : शिवसेना खासदार संजय राऊत 10 वाजता मलिक कुटुंबाची भेट घेणार

Sanjay Raut News : शिवसेना खासदार संजय राऊत 10 वाजता मलिक कुटुंबाची भेट घेणार, कुर्ला येथील निवासस्थानी जाऊन मलिक कुटुंबाशी चर्चा करणार असल्याची 'एबीपी माझा'ला विश्वसनीय सूत्रांची माहिती

पार्श्वभूमी

दोन वर्षानंतर प्रथमच बारावीची ऑफलाईन परीक्षा, पेपर सोडविण्यासाठी साडे तीन तासाचा वेळ, प्रत्येक महाविद्यालयात परीक्षा केंद्रं


राज्यातील 14 जिल्हे आजपासून पूर्णपणे निर्बंधमुक्त, नाट्यगृहं-थिएटर्स-रेस्टॉरेंट पूर्ण क्षमतेने सुरु होणार, ठाणे-नवी मुंबई पालिका क्षेत्रातही निर्बंध शिथिल


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न 


एकाही कंत्राटदारानं कमिशन देऊन काम मिळवल्याचं म्हटलं तर राजकारण सोडेन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य


Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळं नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राजकारणातील भ्रष्टाचाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरींनी म्हटलं आहे की, जर एकही कंत्राटदाराने गडकरींना कमिशन देऊन काम मिळवल्याचे म्हटले. तर राजकारण सोडून देईल. पैसा कमावणं चूक नाही, मात्र राजकारण हे पैसा कमवण्याचे साधन नाही असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात काल रात्री आयोजित भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी ई लायब्रेरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, देशभरात 50 लाख कोटी रुपयांचे रस्त्याचे जाळे विणले. नागपुरात 86 हजार करोड रुपयांचे काम केले, पण एकही कंत्राटदाराकडून कमीशन घेतले नाही. जरी एक कंत्राटदाराने गडकरींना कमिशन देऊन काम मिळवल्याचे म्हटले, तर राजकारण सोडून देईल असे वक्तव्य गडकरी यांनी केले. 


शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; आज राज्यभर रास्तारोको  


वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; कल्याणमध्ये रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड!


'यूक्रेनमध्ये मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करा', महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे निर्देश


बेलारुसच्या सीमेवर रशिया-युक्रेनमध्ये दुसरी बैठक, युद्धभूमीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास दोन्ही देश तयार असल्याची माहिती


नागराज मंजुळेंचा झुंड आज प्रदर्शित होणार; अमिताभ बच्चन यांची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर


आजपासून मोहालीत भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला सुरुवात, विराट कोहली खेळणार कारकीर्दीतला शंभरावा कसोटी सामना

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.