एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 03 June 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 03 June 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Background

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राज्यसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात सस्सीखेच सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवारानं माघार घेतली नाही तर ही लढत अटीतटीची होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार का हे आज स्पष्ट होईल.
 
गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन
भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज आठवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं असून या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. धनंजय मुंडेही गोपीनाथ गडावर दर्शनाला जाणार आहेत.

राज ठाकरेंच्या आदेशानुसार भोंग्याबाबत पत्रवाटप
राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्याबाबतचं पत्रवाटप होणार आहे. राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट करत मनसेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात 'मशिदीवरील भोंग्याचा निकाल लावायचाय, कामाला लागा', असं म्हटलंय. हे पत्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचवण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. 

मास्कबाबत येत्या 15 दिवसांत निर्णय
निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या, असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. काल राज्यात 1045 नवीन रुग्णांचे निदान झालं. तर, मुंबईत 704 रुग्णांचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच्या टास्कफोर्सच्या बैठकीत केलंय. मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या 97 टक्के रुग्ण आहेत अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.

मुक्ताईंच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आज सकाळी 10 वाजता मुक्ताईच्या पालखीचं प्रस्थान जळगावहून पंढरपूरकडे होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा संकटामुळे ही पालखी केवळ चाळीस वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूर रवाना झाली होती. यंदा मात्र कोरोनाचे निर्बंध नसल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. शेकडो दिंड्या, पालख्या आणि हजारो वारकरी संत मुक्ताईच्या पालखीसह पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहेत. 

काश्मीरमधील टार्गेट किलिंगवर अमित शाह यांनी उच्चस्तरिय बैठक बोलवली
काश्मीरमध्ये गोळीबाराच्या घटना सुरुच आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह टार्गेट किलिंगचा आढावा घेणार आहेत. काल मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बाहेरुन आलेल्या दोन नागरिकांवर गोळीबार केला आहे. दोघंही जखमी आहेत. काल कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली होती. गेल्या 21 दिवसांत काश्मीरमध्ये सात टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

आएनएस निःशंक आणि आयएनएस अक्षय सेवामुक्त होणार
भारतीय नौदलात पराक्रम, शौर्य गाजविण्याऱ्या आयएनएस निःशंक, आयएनएस अक्षय या दोन युद्धनौका सेवामुक्त होणार आहेत. भारतीय नौदलात 32 वर्षे गौरवशाली सेवा बजावणाऱ्या आणि भारत पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या या दोन युद्धनौकाना नेव्हल डॉकयार्ड येथे सूर्यास्ताच्या वेळी निरोप दिला जाणार आहे.

पुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस
पुणतांबा धरणे आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज मोफत दूध वाटप सह शिल्लक उसाची होळी करत शेतकरी सरकारचा निषेध करणार आहेत. याशिवाय पथनाट्यातून कृषीकन्या शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहेत. कृषीमंत्री दादासाहेब भुसे येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 
 
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींचा भव्य ग्राऊंड ब्रेकींग सेरेमनी
आज लखनऊ या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उद्योगपतींचा भव्य ग्राऊंड ब्रेकींग सेरेमनी होणार आहे. यावेळी सगळे बडे उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे

‘सम्राट पृथ्वीराज’ आज रिलीज 
अक्षय कुमार आणि मनुशी छिल्लरचा चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ आज रिलीज होणार आहे.

22:11 PM (IST)  •  03 Jun 2022

Nashik : नाशिकच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा उपअभियंता दीड लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात 

नाशिकच्या जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा उपअभियंता दीड लाखाची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला आहे. अमोल घुगे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा उप अभियंता अमोल घुगे उपअभियंता कामाची टक्केवारी घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. 

20:20 PM (IST)  •  03 Jun 2022

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक, सुधीर मुनगंटीवार यांचे निधन 

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे वयाच्या 93 व्या वर्षी नागपुरात निधन झाले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विदर्भातील जुन्या पिढीतील प्रख्यात डॉक्टर होते.  

19:40 PM (IST)  •  03 Jun 2022

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाकरता परवानगी अर्ज कोर्टात दाखल

नवाब मलिकही राज्यसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरिता परवानगी अर्ज सादर करणार

6 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात होणार सुनावणी

राज्यसभेच्या 6 जागांकरता 10 जूनरोजी विधानभवनात होणार मतदान

अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत

19:17 PM (IST)  •  03 Jun 2022

रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं ; प्रवीण दरेकरांचा टोला 

रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं. आता त्यांची सुरुवात झाली आहे. गोपीनाथ मुंडे आता हयात नाहीत. त्यांच्या संदर्भात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अजित पवार नेहमी म्हणतात वाद-विवाद करु नका त्यापेक्षा लोकांचे कामं करा. त्यामुळे तुम्ही देखील तसं काही करु नये. तुम्ही तुमच्या घरातील काळजी घ्या. सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्याच्या स्पर्धेत आहेत, त्यासाठी त्या अभिषेक करत आहेत. अजित पवार देखील त्याच रांगेत आहेत. त्यामुळे पवारांमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे तुम्ही आधी पक्क करा, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. 

16:27 PM (IST)  •  03 Jun 2022

Ashadhi Wari 2022 : आज रुक्मिणी मातेची पालखी सासरी पंढरपूरला निघणार

आषाढी एकादशीला दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. 400 वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे. कोरोना नंतर प्रथमच आज सायंकाळी 5 वाजता पायदळी पालखी निघणार आहे. 10 पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर येथील रुक्मिणीची माहेरची पालखी आहे. टाळ मृदंग, वीणाच्या गजरात भगवा पताका घेऊन आणि श्री नामाच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी होणार आहे. या पालखीचे जागोजागी स्वागत आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget