Maharashtra Breaking News LIVE Updates : सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार, मुख्यमंत्र्यांची दांडी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Mar 2022 06:00 PM
सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम पार, मुख्यमंत्र्यांची दांडी

राज्य विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापान पार पडला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली आहे तर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.

Aurangabad: राज्यपालांवर कायदेशीर कारवाई करा; औरंगाबाद पोलीस आयुक्तांना निवेदन

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. तसे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने औरंगाबाद पोलीस आयुक्त यांना देण्यात आलं आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यावेळी उपस्थित होते. शिवाजी महाराजांची उंची जाणिवपूर्वक कमी करण्यासाठी राज्यपालांनी हे वक्तव्य केल्याचं शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

Beed News : आरोपी सतीश पवारला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बीड रजिस्ट्री कार्यालय परिसरात गोळीबार प्रकरणी आरोपी सतीश पवारला तीन तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड शहरातून सतीश पवारला ताब्यात घेतले आहे. आता पर्यंत या प्रकरणातील पहिली अटक आहे.  

Russia Ukraine War : युक्रेनमधील खारकीव्ह येथील बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

Russia Ukraine War :  युक्रेनमधील खारकीव्ह येथील बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

Maharashtra : शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणी वाढणार?

Shivsena Yashawant Jadhav : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाधव यांच्या काही शेल कंपन्या उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Satya Nadella Son Death : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना पुत्रशोक

Satya Nadella Son Death : सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft corp.) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) सत्या नडेला यांचा मुलगा झैन नडेला ( Zain Nadella) याचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. तो 26 वर्षांचा होता. तो जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराशी झुंज देत होता. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय?

Society for Worldwide Interbank Financial Telecommunication : सध्या संपूर्ण जगाच्या नजरा पूर्व युरोपवर खिळल्या लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात रशियानं युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) केल्यानंतर जागतिक राजकारणात झपाट्यानं बदल होत आहेत. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इतर अनेक देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध जाहीर केले आहेत. या निर्बंधांमध्ये रशियाला इंटरनॅशनल पेमेंट्स स्विफ्ट्स (SWIFT) पासून वेगळं करण्याचा देखील घाट घालण्यात आल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंत लादण्यात आलेल्या सर्व निर्बंधांपैकी रशियाला याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचं मानलं जात आहे. स्विफ्टपासून रशियाला वेगळं करण्याच्या या हालचालींना महासत्ता अमेरिका आणि त्याचे इतर मित्र देश अतिशय प्रभावी पाऊल मानत आहेत. पण बलाढ्य रशियाला वेठीस धरणारं स्विफ्ट्स नावाचं नावाचं ब्रम्हास्त्र नेमकं आहे तरी काय?


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

LPG Cylinder : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आजपासून 105 रुपयांनी वाढ

मार्च महिना सुरु होताच महागाईची झळ पुन्हा एकदा बसणार आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात आजपासून 105 रुपयांनी वाढ झालीय. या दरवाढीमुळे मुंबईत आता व्यावसायिक सिलेंडर 1963 रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर 2012 रुपयांनी मिळेल. गेल्या वर्षभरात सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन सातवं विमान दाखल

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. त्या अंतर्गत आज सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातून मुंबईत दाखल झालंय. या विमानातून 182 भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मुंबई विमानतळावर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मायदेशी परतताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. तर आपल्या लेकरांना पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावरच तिरंगा फडकवला.

P N Joshi Passed away : ज्येष्ठ बँकिंग अर्थतज्ञ पी एन जोशी यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ बँकिंग अर्थतज्ञ पी एन जोशी यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 1991 साली  युनायडेड वेस्टन बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी 11 वर्षे काम पाहिले

Sambhaji Bhide Controversial Statement : डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत : संभाजी भिडे

Sambhaji Bhide Controversial Statement : संभाजी भिडे आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. तसंच कोरोनात 105 टक्के लोकांचा भीतीनंच मृत्यू झाल्याचा दावा संभाजी भिडेंनी केलाय.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल


Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान मुंबईत दाखल झाले आहे. बुखारेस्ट, रोमानिया येथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मंत्री नारायण राणे विमानतळावर पोहोचले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे ही सातवी फ्लाईट आहे.


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनच्या बुखारेस्टमधून एअर इंडियाच्या आठव्या आणि नवव्या विमानानेही उड्डाण केले आहे. 218 भारतीयांसह हे विमान दिल्लीला रवाना झाले आहे. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली. 


Weather : उत्तर भारतात थंडी कायम, तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे


Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच जोरदार वारे वाहत असल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


दरम्यान, महाराष्ट्रात देखील तापमानात चढ उतार कायम आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.