Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवार 22 नोव्हेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर कसोटी सामन्याने होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु सध्या टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनची निवड.
कर्णधार रोहित शर्मा या कसोटीसाठी उपलब्ध नाही, तर पर्थ कसोटी सुरू होण्यापूर्वी वाका स्टेडियमवर गेले काही दिवस सराव करणाऱ्या टीम इंडियाला गिलच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला.
आता गिल पहिली कसोटी खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे त्याच्या जागी कोणाची निवड करायची हा मोठा प्रश्न आहे.
अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापनाने देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जो आधीच भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियात उपस्थित होता आणि त्याने खूप प्रभावित केले होते.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियात उपस्थित असलेला भारत अ संघ लवकरच भारतात परतणार आहे, परंतु देवदत्त पडिक्कल ऑस्ट्रेलियातच राहणार आहे.
अशा स्थितीत तो पर्थ कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
पडिक्कलने या वर्षी इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि एका डावात फलंदाजी केली, जिथे त्याने अर्धशतक झळकावले.