Ajit Pawar : परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ, पुण्यात मोठं नुकसान, राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज - अजित पवार
Ajit Pawar On Heavy Rain In Maharashtra : अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात जोरदार पावसाने झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली. काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar On Heavy Rain In Maharashtra : पुण्यात (Pune Heavy Rain) पावसानं मोठा धुमाकूळ घातला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांनी महाराष्ट्रात जोरदार पावसाने झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली. काय म्हणाले अजित पवार?
'या' 10 जिल्ह्यात यलो अलर्ट
अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव तर मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि लातूर या 10 जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाच, तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला, तसेच या पावसाचा परिणाम रब्बीच्या पिकांवरही झाला आहे. त्यामुळे आताच्या महाराष्ट्र सरकारने मागे जाहीर केलं होतं की, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार, मात्र अजूनही ते झालेले नाही.
अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त
अजित पवार पुढे म्हणाले, काल ते महाराष्ट्रातील विविध भागात पाहणी दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे. शेतकरी म्हणाले, आम्हाला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसून कोणाला विचारायला गेले तर कोणीही याची दखल घेत नाही. तसेच यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाल्याचं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. याबाबत त्वरित लक्ष देऊन राज्य सरकारने त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. अशी आमची मागणी आहे.
सरकार शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार? या योजनेचं नेमकं काय झालं? - अजित पवार
राज्य सरकारने दिवाळीमध्ये स्वस्तात धान्य देण्याच्या केलेल्या घोषणेवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, सरकारने शंभर रुपयांमध्ये दिवाळी गोड करणार असं सांगितलं होतं. शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार असं सांगितलं. त्याचं 513 कोटी रुपयांचं कंत्राटही दिलं पण अजूनही काही हालचाल दिसत नाहीये. या योजनेचं नेमकं काय झालं? नेमकं गौडबंगाल काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
''पुण्यात वाहतुकीच्या संदर्भात कोणाही लक्ष द्यायला तयार नाही''
पुण्यात मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने हजेरी लावली असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यात ही एक अडचण आणि वाहतुकीची अडचण कोणीही पाहायला तयार नाही. वाहतुकीच्या संदर्भात पोलिस यंत्रणांना विश्वासात घेऊन नागरिकांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने राज्य सरकारने कार्यवाही केली पाहिजे. असं अजित पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, दगडूशेठ मंदिरात शिरलं पाणी