एक्स्प्लोर

Mahavitaran Strike Live Updates : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी

Mahavitaran Strike Live Updates : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees)  संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.

Key Events
maharashtra mahavitaran strike live update Mahavitaran employees Strike Live start from today Mahavitaran Strike Live Updates : महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा यशस्वी
maharashtra mahavitaran strike live update

Background

Mahavitaran Strike Live Updates : महावितरणचे (Mahavitaran) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या (employees)  संपाला आजपासून सुरुवात झाली आहे. खासगीकरणाला (Privatization) विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं काही भागात वीज पुरवठा बंद झाल्यानं अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर विविध परिमंडलामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी विविध उपाययोजनांसह विभाग, मंडल व परिमंडल स्तरावर 24 तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल तसेच दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. 

महावितरणाच्या राज्यव्यापी संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांचा सहभाग 

महावितरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तीन जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा केली होती. खासगीकरणाला विरोध करण्यासाठीच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतलेला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 13 हजार कर्मचाऱ्यांचा संपात समावेश आहे. तर रायगडमध्ये 1 हजार 500 कर्मचारी संपात सहभागी.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली आहे. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महावितरण बंदचा फटका पुण्यालगतच्या भागाला

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम अनेक ठिकाणी दिसत आहे. पुण्यातील शिवणे, सनसिटी, वडगाव धायरी या परिसरात लाईट बंद आहे. वीज वितरण कर्मचारी संपावर असल्याने पहाटेपासून लाईट बंद असल्यानं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. 

 

15:57 PM (IST)  •  04 Jan 2023

देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्यातील बैठकीत यशस्वी

देवेंद्र फडणवीस आणि महावितरण कर्मचारी यांच्या बैठकीत यशस्वी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

आंदोलनाबद्दल बैठकीत चर्चा

संप मागे घेण्याबाबत तोडगा निघाला असं समजतेय.. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार

14:46 PM (IST)  •  04 Jan 2023

Kalyan Mahavitran Strike  : कल्याण परिमंडळाचे 95 टक्के अधिकारी कर्मचारी संपात सहभागी

Kalyan Mahavitran Strike  :  महावितरणच्या खासगीकरणा विरोधात महावितरणच्या कर्मचारी संघटनांनी राज्यव्यापी 72 तासांचा संप पुकारला आहे. या संपात 31 संघटनांनी सहभाग घेतला असून कल्याण परिमंडळ मधील सुमारे 95 टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे. आज कल्याणमधील महावितरण कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासगीकरणाचा विरोध केला. यावेळी दीड वाजता ऊर्जा मंत्र्यांसोबत कृती समितीची बैठक असून या बैठकीत योग्य तोडगा निघेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget