Lockdown Live Update | सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमामुळे गावावर विघ्न, छोट्याशा गावात 155 कोरोनाबाधित

Maharashtra Lockdown LIVE Updates: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कोणत्या भागात, शहरात काय काय निर्बंध घालण्यात आले आहेत, याबाबत प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Feb 2021 11:34 PM
लातूर शहरातील एमआयडीसी भागातील खासगी हॉस्टेलमधील 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासना खडबडून जागे झाले आहे. परवानगी नसतानाही शहरातील 170 पेक्षा जास्त खासगी हॉस्टेल सुरु असल्याने आता त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. काल रात्री उशिरा लातूर येथील एमआयडीसी भागातील एका खासगी हॉस्टेलमधील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आणि लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात भीतीचे वातावरण तयार झाले. प्रशासनही जागे झाले. त्यातच आज तपासणी केली असता त्याच्या हॉस्टेलमधील आणखी पाच विद्यार्थी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. जिल्हा प्रशासन आणि मनपाच्या पथकाने केलेल्या संयुक्त पथकाने शहरातील विविध 170 पेक्षा जास्त हॉस्टेलची तपासणी सुरु केली आहे. खासगी हॉस्टेल सुरु करण्याच्या बाबतीत कोणतेही निर्देश अद्याप आले नसतानाही हे हॉस्टेल सुरु असल्याचे आढळून आले आहे. आता त्यात 50 पेक्षा जास्त संख्या असल्यास आर्थिक दंड करण्यात येत आहे. यात सुधारणा नाही केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही माहिती अधिकारी देत आहेत. लातूर शहर हे संपूर्ण राज्यात शैक्षणिक हब म्हणून ओळखले जात आहे. दरवर्षी 25 हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. आता काय करावे असा प्रश्न हॉस्टेलचालकांसमोर आहे तर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील झाड़ेगाव या छोट्याशा गावात काही दिवासांपूर्वी एक सात दिवसाचा धार्मिक कार्यक्रम गावकऱ्यांनीच आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावकऱ्यासह बाहेरगावातून काही मंडळी सामील झाली होती. परंतु कोरोनाचे कोणतेही नियम न पाळल्यामुळे गावात संसर्ग पसरला आणि बघता बघता छोट्याशा गावात 155 जणांना कोरोनाची लागण झाली. आता गावाला प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आलं असून, गावात आरोग्य पथक, महसूल आणि पोलीस कर्मचारी कामाला लागले आहेत. गावातील प्रत्येकाची टेस्ट करण्यात येत आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम दोन हजाराच्या जवळपास आहे.आता अजून किती जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात हे समजेलच, पण नागरिकांनी कोरोना गेला असं समजून काळजी न घेतल्याने अख्खं गावच संकटात सापडलं आहे.
'कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा नव्याने नियमांचा प्रचार करा. लोकांपर्यंत पुन्हा नव्याने माहिती पोहोचवा. लोक नियम पाळतील याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची असेल. लोकांना त्यांचं नुकसान काय आहे ते पटवून द्या,' अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड-19 संसर्गाच्या आढावा बैठकीत केल्या.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परभणी जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातून विदर्भातील 11 जिल्ह्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व प्रवासी तसंच सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी हे आदेश काढले आहेत. शिवाय जिल्हाभरातील धार्मिक स्थळंही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ पाच जणांनाच दैनंदिन विधी पार पाडता येणार आहेत.
कोरोना पुन्हा फोफावू लागल्याने पिंपरी चिंचवडकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं असताना शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे यांनीच कोरोनाच्या नियमांना हरताळ फासलय. त्यांच्या सोबतीला भाजपच्या बहुतांश नगरसेविका देखील होत्या. सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे ही तिथं उपस्थित होती. भाजप आमदार लक्ष्मण जगतापांच्या वाढदिवसानिमित्त मिस ऍण्ड मिसेस फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. महापौरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेला सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे उपस्थित असल्याने चांगलीच गर्दी जमली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गर्दीच्या कार्यक्रम घेऊ नका असं आवाहन केलं होतं. चोवीस तासांच्या आतच या आवाहनाला पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे आणि भाजप नगरसेविकांनी केराची टोपली दाखवली आहे. बहुतांश महापौरांसह नगरसेविकांनी विना मास्क रॅम्प वॊक केला, तसेच सभागृहात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला. आता लोकप्रतिनिधी स्वतःच नियमांना हरताळ फासतायेत म्हटल्यानंतर स्पर्धक आणि प्रेक्षकांकडून कोणती अपेक्षा केली जाणार. त्यांनी देखील तोच कित्ता गिरविल्याच दृश्यातून स्पष्ट होतंय. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांची परवानगी होती. सभागृहाच्या पन्नास टक्के उपस्थिती ठेवणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. पालिकेत भाजप सत्तेत असल्याने प्रशासनाने देखील याकडे कानाडोळा केला. पण या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने, प्रशासनाला जाग आली. पालिकेच्याच रामकृष्ण मोरे सभागृहात सुरू असलेल्या कार्यक्रमस्थळी प्रशासनाने पथक पाठविण्याची तसदी घेतली आहे. पण कारवाई होणार का याबाबत शंका आहे.
राज्यात आज 5 हजार 210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज 5 हजार 035 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19, 99, 982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात सध्या एकूण 53 हजार 113 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.
कोरोना पुन्हा फोफावू लागल्याने पिंपरी चिंचवडकरांनी काळजी घेण्याची गरज आहे. असं असताना शहराच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे यांनीच कोरोनाच्या नियमांना हरताळ फासलंय. त्यांच्या सोबतीला भाजपच्या बहुतांश नगरसेविका देखील होत्या. सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरेही तिथे उपस्थित होती. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिस अॅण्ड मिसेस फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. महापौरांनी आयोजित केलेल्या स्पर्धेला सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहरे उपस्थित असल्याने चांगलीच गर्दी जमली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गर्दीचे कार्यक्रम घेऊ नका असं आवाहन केलं होतं. चोवीस तासांच्या आतच या आवाहनाला पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे आणि भाजप नगरसेविकांनी केराची टोपली दाखवली आहे. बहुतांश महापौरांसह नगरसेविकांनी विना मास्क रॅम्प वॉक केला, तसेच सभागृहात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. आता लोकप्रतिनिधी स्वतःच नियमांना हरताळ फासत आहेत म्हटल्यानंतर स्पर्धक आणि प्रेक्षकांकडून कोणती अपेक्षा केली जाणार. त्यांनी देखील तोच कित्ता गिरवल्याचं स्पष्ट झालं. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलिसांची परवानगी होती. सभागृहाच्या पन्नास टक्के उपस्थिती ठेवणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात संख्या अधिक असल्याचं दिसून आलं. पालिकेत भाजप सत्तेत असल्याने प्रशासनाने देखील याकडे कानाडोळा केला. पण या कार्यक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने, प्रशासनाला जाग आली. महापालिकेच्याच रामकृष्ण मोरे सभागृहात सुरु असलेल्या कार्यक्रमस्थळी प्रशासनाने पथक पाठवण्याची तसदी घेतली आहे. पण कारवाई होणार का याबाबत शंका आहे.
कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना, दुकानदारांना, हॉटेल व्यावसायिकांना वारंवार मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या नियमांचं पालन करण्यास सांगितलं जात आहे. मात्र नागरिक तसेच काही व्यवसायिकांचा बेजबाबदारपणा वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पुन्हा एकदा कठोर कारवाई सुरु केली आहे. महापालिकेच्या पथकाने विनामास्क फिरणाऱ्या, गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसात महापालिकेने साडेतीनशेहून अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली असून दीड लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.
महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट घेवून येणे आवश्यक आहे. ही टेस्ट 72 तास अगोदर केलेली असली पाहिजे. जिल्ह्यात बाहेरील राज्यातून कर्नाटकात येण्याच्या मार्गावर चेक पोस्ट सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी दिली.
गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्य रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसागणिक जवळपास शंभर रुग्ण हे वाढत असल्याचं दिसून आले असून आज तब्बल तीनशे एकोणीस इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने आणि गेल्या चोवीस तासात चौघांच्या मृत्यू झाल्याने प्रशासनाने ही गंभीर दखल घेत रात्रीच्या संचार बंदीसह प्रशासकीय काम काज आणि परीक्षा वगळता शाळा, कॉलेज हे पंधरा दिवसा साठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कोरोनाच्या नियंत्रणाच्या बाबत पाळा वयाचे नियम मोडणाऱ्या विरोधात कडक भूमिका घेत कारवाई चा बडगा उगारला जात आहे वाढती रुग्ण संख्या पाहता उपचारा बाबत ही प्रशासनाने सर्व सज्जता ठेवली आहे मात्र कोरोणाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून मास्क ,सोशल डीसतन्सिन आणि सनितायझर चा वापर करण्या सारख्या उपाययोजना साठी सहकार्य करण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमासह देवस्थान व पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याची माहिती दिली. 50 पेक्षा कमी व्यक्तीचा सहभाग, मास्क, सॅनिटायझर सुविधांचा वापर होतो की नाही याची कसून तपासणी केली जाणार आहे. सर्वांनी नियम पाळा, जिल्हा लॉकडाऊनमध्ये जायची पाळी आणू नका. आज झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. संदेश कांबळे उपस्थित होते. मास्क न वाटल्यास दंडात्मक कारवाई, कोरोना टेस्टिंग वाढवणे, मृत्यू दर कमी करणे, गर्दीवर नियंत्रण करणे. तसेच राजस्थान, गोवा, गुजरात, केरळ राज्यातून येणाऱ्या व्यक्तीची आर. टी. पी. सी. आर टेस्ट सक्तीची असेल.
नागपुरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेत प्रशासनिक अधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. त्यामध्ये नागपुरात तूर्तास लॉकडाऊन लावले जाणार नाही असे निर्णय घेतले गेले. मात्र, 7 मार्चपर्यंत सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक कठोर निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये दर शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्णय जाहीर करण्यात आले आहे. शिवाय सर्व आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद ठेवले जाणार आहे. 7 मार्चपर्यंत सर्व शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसही बंद ठेवले जाणार आहे. सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना 7 मार्चपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच गेल्या काही महिन्यात बंद करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर्सना पुन्हा निर्णय ही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी जबाबदार' ही नवी मोहीम जाहीर केली आहे. या अंतर्गत राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा, सभा समारंभ आंदोलने यावर निर्बंध लादले आहेत. तसेच या मोहिमे अंतर्गत पुढील आठ दिवसांत कोरोनाची संख्या वाढली नाही तर लॉकडाऊन होणार नाही असं म्हंटल आहे. यासोबतच मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं या बाबी देखील बंधनकारक केल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांत मोठी वाढ. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 673 कोरोना रुग्णांची नोंद. आज कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 30 हजार 197 वर.
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांत मोठी वाढ. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात तब्बल 673 कोरोना रुग्णांची नोंद. आज कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 30 हजार 197 वर.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात लागू केलेल्या कोविडच्या नियम आणि अटींचे पालन न करणाऱ्यांवर सध्या जिल्हा प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. काल रात्री उशिरा लग्न समारंभाच्या ठिकाणी जाऊन पालघरचे जिल्हाधिकारी डॉक्टर माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, यांच्यासह त्यांच्या टीमने बिरवाडी, सातपाटी, बोईसर अशा तीन ठिकाणी धडक कारवाई करत आयोजकांवर तसंच रिसॉर्ट मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू केल्यानंतर नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर अवघ्या दोन दिवसात 400 जणांवर कारवाई करण्यात आली असून 85 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, सॅनिटायझचा वापर तसेच कोरोनाच्या काळात लागू केलेल्या विविध नियम आणि अटींचं पालन करावं अस आवाहन उपजिल्हाधिकारी किरण महाजन यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे .
अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत असल्याने शनिवारी रात्री 8 वाजता पासून 36 तासांसाठी जिल्हात लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, अमरावतीमध्ये कोरोना रुग्ण संख्या ही आटोक्यात येत नसल्याने परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेल्याने अमरावती शहर मनपा हद्दीत आणि अचलपूर नगरपालिका हद्दीत आज रात्री 8 वाजतापासून आठवडाभरा पासून म्हणजे 1 मार्च सकाळी 8 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे आज रात्री 8 वाजतापासून लॉकडाऊनला सुरवात होत असल्याने आज अमरावती शहरातील सर्व बाजार पेठ, मॉल रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात गर्दी केली आहे. आज सकाळपासून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले आहे, यात कोरोना नियमांना हरताळ अमरावतीकरांनी पाळल्याचे भयाण दृश्य दिसले, त्यामुळे अमरावती जिल्हात 7 दिवसानंतर परत लॉकडाऊन वाढन्यात येणार का, कारण लोक अद्यापही कोरोना बाबद गंभीर नाहीत.
बुलढाणा जिल्ह्यातील पाच नगरपालिका क्षेत्रात म्हणजेच शहरी भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि देऊळगाव राजा ही नगरपालिका क्षेत्र कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषित केली आहेत. यातील निर्बंध अतिशय कडक असणार आहेत. त्यात रात्रीची संचारबंदी, खाजगी वाहनांना फिरण्यास बंदी इत्यादी नियम असणार आहेत.
सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी असेल. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान रात्रीची संचारबंदी असली तरी जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार आहेत. शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार आहेत.
कोरोनाचे वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्रा प्रशासनाने रद्द करताना एकही भाविकाला पंढरपूर शहरात न येऊ देण्यासाठी त्रिस्तरीय नाकेबंदी सुरु केली आहे. भाविकांची वाहने परत पाठवण्यास सुरुवात झाली आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर सोलापूर जिल्हा सीमेवर पहिली नाकाबंदी करण्यात आली असून दुसरी नाकाबंदी पंढरपूर तालुक्याच्या सीमेवर लावण्यात आली आहे. या दोन्ही नाकाबंदी चुकवून आलेली वाहने पंढरपूर शहराच्या सीमेवर अडवून त्यांची तपासणी केली जात आहे आणि भाविकांची वाहने पुन्हा परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. जी वाहने केवळ कळस दर्शन घेऊन लगेच परत जाणार आहेत अशा भाविकांच्या मोबाईल नंबरच्या नोंदी पोलीस ठेवत आहेत .
सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी असेल. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. दरम्यान रात्रीची संचारबंदी असली तरी जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार आहेत. शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार आहेत.

एकीकडे मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत महापालिका प्रशासन, सरकार कडक भूमिका घेताना दिसत आहे. मात्र अजूनही नागरिक हलगर्जीपणाने वागताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी गर्दी टाळण्याबाबत प्रशासनाच्या उपाययोजना दिसत नाहीत. मुंबईचे कुर्ला रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असल्याने या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी दिसते आहे. इथले फेरीवाले या गर्दीत भर टाकत तर आहेतच, त्याचबरोबर मास्कचा वापरही करत नाहीत. इथले मार्शल नुसतेच इथे फिरताना दिसतात मात्र मास्कबाबत हवी ती कारवाई करताना दिसत नाहीत. बाजूला असलेला बस डेपो, रिक्षा स्टॅण्ड यामुळे कुर्ला रेल्वे स्थानकाचा पूर्वेचा भाग हा कोरोनाचा स्प्रेडर ठरु शकतो.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी मंगल कार्यालये, धार्मिक कार्यक्रमासह देवस्थान व पर्यटन स्थळावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार असल्याची माहिती दिली. 50 पेक्षा कमी व्यक्तीचा सहभाग, मास्क, सॅनिटायझर सुविधांचा वापर होतो की नाही याची कसून तपासणी केली जाणार आहे. सर्वांनी नियम पाळा, जिल्हा लॉकडाऊन मध्ये जायची पाळी आणू नका. आज झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीमंत चव्हाण, डॉ श्रीपाद पाटील, डॉ संदेश कांबळे उपस्थित होते. मास्क न वाटल्यास दंडात्मक कारवाई, कोरोना टेस्टिंग वाढवणे, मृत्यू दर कमी करणे, गर्दीवर नियंत्रण करणे. तसेच राजस्थान, गोवा, गुजरात, केरळ राज्यातून येणाऱ्या व्यक्तीची आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची असेल.
मंत्रालयात पुन्हा कोरोनाचा विळखा, महसूल विभागातील आठ कर्मचारी कोरोना बाधित. एकच विभागातील इतके कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने खळबळ. महसूल विभागात आज 22 जण गैरहजर त्यातील 8 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
तळकोकणात गडगडाटासह अवकाळी पाऊस. जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जिल्ह्यात ढगाळ वातावरण झाल्याने आंबा, काजु पिकावर परिणाम. फळांचा राजा आंबा, काजुसह उन्हाळी पिकांनाही फटका.
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी नांदेड येथे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणारा 'संगीत शंकर दरबार' हा सांस्कृतिक महोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर स्थगित केला आहे.
शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर आणि योग्य अंतर या त्रिसूत्री नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

नागपूर - आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद तर मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद राहणार. 7 मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील. मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी नंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल. मंगल कार्यालयमध्ये 7 मार्चपर्यंत लग्न होणार नाही. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार आहेत.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केल. तसेच सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे. विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत मर्यादित.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केल. तसेच सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.


 


पुणे


पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे. विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत मर्यादित.


 


राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 


नाशिक


नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.


 


Corona Virus: शक्य असेल तिथं 'वर्क फ्रॉम होम' सुरु ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही


 


नागपूर


आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद तर मुख्य बाजार पेठ शनिवार व रविवारी बंद राहणार. 7 मार्च पर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहतील. मंगल कार्यालय 25 फेब्रुवारी नंतर 7 मार्च पर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल. मंगल कार्यालयमध्ये 7 मार्चपर्यंत लग्न होणार नाही. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार आहेत.


 


नांदेड


शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर आणि योग्य अंतर या त्रिसूत्री नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.


 


अमरावती विभाग


अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील. लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील. सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.


 


Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण


 


अमरावती- जिल्ह्यातील अमरावती आणि अचलपूर/परतवाडा शहरात आजपासून रात्री 8 वाजल्यापासून आठवडाभर लॉकडाऊन


 


अकोला- अकोला महापालिका क्षेत्र, अकोट आणि मुर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रात २३ फेब्रुवारीपासून आठवडाभर लॉकडाऊन


 


बुलडाणा- आजपासून पुढील आदेशापर्यंत शेगाव गजानन महाराजांचं मंदिर बंद


 


पंढरपूर-विठ्ठल मंदिर बुधवार सकाळपर्यंत बंद, शहरातही संचारबंदी लागू


 


औरंगाबाद


गेल्या काही दिवसांपासून शहरात चालणारे रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी पाहायला मिळतात. त्याच बरोबर रिक्षाचालक देखील मास्क वापरत नाहीत. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी आता विनामास्क रिक्षाचालकांना चालवणार्‍या आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. एकापेक्षा अधिक वेळा एखाद्या रिक्षाला दंड झाला तर ती रिक्षा जप्त करणार असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.